शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

नव्या नेतृत्वाचा फलटण तालुक्यात कस

By admin | Updated: February 8, 2017 22:54 IST

निवडणूक रंगतदार : राजघराण्याची पुढची पिढी राजकारणात; लक्षवेधी लढतीची उत्सुकता शिगेला

नसीर शिकलगार ल्ल फलटणफलटण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेतेमंडळींच्या पुढील पिढीने जिल्हा व तालुक्याच्या राजकारणात पदार्पण केले असून, नवीन नेतृत्वाची ही लढाई आरपारची होणार असल्याने या लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. कोणाला ही निवडणूक विजयी करणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.फलटण तालुक्यातील सर्व सत्तास्थाने राज्य विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हाती असून, त्यांना त्यांच्या राजकरणात दोन्ही बंधू संजीवराजे व रघुनाथराजे नाईक-निंबाळकर सलग सहाव्यांदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी रिंगणात असून, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले असल्याने त्यांनी तरडगावसारखा सेफ मतदारसंघ निवडला आहे. संजीवराजेंच्या पत्नी शिवांजलीराजे नाईक-निंबाळकर या ही सलग पाचव्यांदा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रिंगणात असून, त्या साखरवाडी जिल्हा परिषद गटातून रिंगणात आहेत. याच राजघराण्यातील आणखी एक व्यक्ती नव्याने राजकारणात प्रवेश करीत आहेत. रामराजेंचे बंधू रघुनाथराजे यांचे पुत्र विश्वजीतराजे हे आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात वाठार निंबाळकर पंचायत समिती गणातून करीत आहेत. नाईक-निंबाळकर यांच्या घराण्यातील चौथी पिढी राजकारणात येत आहे.दुसरे आणखी एक नाईक-निंबाळकर घराणे म्हणजे माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांच्या सून आणि कृष्णा खोरे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजित नाईक-निंबाळकर यांच्या पत्नी अ‍ॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर या गिरवी जिल्हा परिषद गटातून राष्ट्रीय काँग्रेसतर्फे जिल्ह्याच्या राजकारणात उतरत आहेत. पंचायत समितीच्या सदस्या म्हणून त्यांचा अनुभव असला तरी जिल्हा परिषदेची निवडणूक त्या प्रथमच लढवित आहेत.प्रतिष्ठेच्या गिरवी जिल्हा परिषद गटातील त्यांची अटीतटीची लढाई राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार रामदास कदम आणि भाजपाचे उमेदवार सह्याद्री कदम यांच्याशी होत आहे. सह्याद्री कदम हे फलटणचे माजी आमदार दिवंगत चिमणराव कदम यांचे पुत्र असून, त्यांची ही पदार्पणाची निवडणूक आहे. राजकारणाचा श्रीगणेशा सह्याद्री कदम निवडणुकीच्या माध्यमातून करीत असल्याने गिरवी गटातील निवडणूक राज्यात गाजण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे-पाटील यांचे पुत्र धनंजय साळुंखे-पाटील हे ही हिंगणगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रीय कॉँग्रेसतर्फे जिल्हा परिषदेची निवडणूक लढवित आहेत. यापूर्वी पंचायत समिती सदस्या म्हणून ते पहिल्यांदा सामोरे जात आहे.स्वराज संघटनेचे अध्यक्ष व युवा नेतृत्व दिगंबर आगवणे यांनीही कॉँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गिरवी गणातून पत्नी जयश्री आगवणे यांना निवडणूक रिंगणात उतरविले आहे. जयश्री आगवणे या पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश करीत असून, निवडणुकीची पूर्व तयारी त्यांनी बऱ्याच दिवसांपासून करीत जनसंपर्क वाढविला आहे. युवा नेतृत्वांची ही निवडणूक प्रतिष्ठेची व अस्तित्वाची ठरणार आहे.