शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

करपल्या वेलीवर उमलले टवटवीत फूल

By admin | Updated: December 1, 2014 00:20 IST

संसार ‘एचआयव्ही’ संसर्गितांचा : चाळीस विवाह यशस्वी

मोहन मस्कर-पाटील - सातारा  --चाळीसहून अधिक ‘एचआयव्ही-एड्स’ संसर्गितांना त्यांच्या आयुष्यात नवीन जोडीदार मिळाल्यामुळे करपल्या वेलीवर आता टवटवीत फूल उमलले आहे. विशेष म्हणजे यापैकी सहा दाम्पत्यांनी आवश्यक ती काळजी घेतल्यामुळे त्यांच्या पोटी जन्मलेली नवजात बालके ‘एचआयव्ही निगेटिव्ह’ आहेत. एचआयव्ही संसर्गितांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमुळेच हे सारे काही शक्य झाले आहे. ‘एचआयव्ही-एड्स’चा संबंध थेट लैंगिकतेशी आल्यामुळे त्याच्याविषयी समाजात चांगले बोललेच जात नाही. याचा परिणाम असा होतो की, संसर्गितांच्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि ‘कलंक’ तसेच ‘भेदभाव’ या दोन गोष्टीमुळे संसर्गित मुख्य प्रवाहात यायला तयार होत नाही. मात्र, करुणा पवार आणि सुनीता पवार, मनोज वाघमारे यांनी संसर्गितांसाठी काम करताना त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची योजना आखली आणि त्याचे पुढचे पाऊल म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या वेलीवर विवाहाचे फुल उमलविण्याची मोठी कामगिरी त्यांनी पार पाडली. बाधित पुरुष, महिला अथवा तरुण, तरुणींना वैवाहिक जीवन जगता यावे, जगण्याची उमेद कायम राहावी म्हणून त्यांनी एचआयव्ही संसर्गितांच्या विवाह मेळाव्याचे आयोजन केले. गेली आठ वर्षे हा उपक्रम सुरू असून केवळ एचआयव्ही-एड्स संसर्गितांच्या औषधोपचारांची काळजी न घेता त्यांना सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेत आणण्यासाठी यानिमित्ताने प्रयत्न केले गेले. विशेष म्हणजे, हे विवाह टिकून आहेत आणि सर्वच्या सर्व दाम्पत्य आपला संसार सुखाने करत आहेत. करुणा पवार यांची ‘एनएसपी प्लस सातारा’ आणि सुनीता पवार यांची ‘साद फाऊंडेशन’ या दोन संस्था ‘एचआयव्ही-एड्स’ संसर्गितांसाठी कार्यरत आहेत. त्यांनाही ‘कलंक’ आणि ‘भेदभाव’ या प्रक्रियेतून जावे लागले आहे. संसर्गितांसाठी ‘नांदा सौख्यभरे’ हा उपक्रम राबवून त्यांच्या आयुष्यात जगण्याची नवी उमेद निर्माण केली. ‘एनएसपी’ आणि ‘साद’च्या माध्यमातून झालेले राजेंद्र-कविता, माधुरी-संदीप, योगिता-विजय, अंकिता-सोमनाथ, राहुल-अर्चना, अजित-कल्पना, अर्चना-अजित, जयश्री-राहुल, तानाजी-विद्या, यांचे विवाह यशस्वी ठरले असून, सर्वचजण आपला संसार सुखाने करत आहेत. सहा संसर्गित दाम्पत्य आई-बाबा बनले असून त्यांच्या पोटी जन्मलेली बालके निरोगी आहेत.नवजात बालके राहिली ‘एचआयव्ही’पासून दूरसातारा जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत ८४० ‘एचआयव्ही’ संसर्गित गर्भवती माता आढळल्या. यापैकी पाच वर्षांतील गर्भवती संसर्गित महिलांची संख्या ३८० आहे. यापैकी ३६६ मातांच्या पोटी जन्मलेली बालके निरोगी तर १४ संसर्गित जन्मली आहेत. ‘एचआयव्ही’ संसर्गित १०० गर्भवती मातांच्या ३० मुलांना संसर्गाची शक्यता असते. यापैकी ५ मुलांना गर्भातच तर १५ मुलांना प्रसूतीदरम्यान आणि १० मुलांना स्तनपानातून संसर्ग होण्याची शक्यता असते. या तीनही टप्प्यांत जर काळजी घेतली तर नवजात बालक ‘एचआयव्ही’पासून दूर राहू शकते. ‘एचआयव्ही-एड्स’ ग्रामीण भागातही विस्तारतोय. ‘एचआयव्ही’ ज्या कारणाने होतो, त्यापैकी संसर्गित गर्भवती मातेपासून तिच्या नवजात बालकास होण्याची एक शक्यता असते. मात्र, तीन टप्प्यांत योग्य काळजी घेतली तर बालक निरोगी जन्मते. विशेष म्हणजे, सातारमध्ये याची सक्षमपणे अंमलबजावणी झाल्याने ३६६ नवजात बालके ‘एचआयव्ही’मुक्त आहेत.जिल्ह्यातील गेल्या दहा वर्षांतील एचआयव्ही-एड्स संसर्गितसालसर्वसाधारणगभर्वतीएकूण२00४४६९८0५४९२00५५४६११४६६0२00६४९४९७५९१२00७१५९११0९१७00२00८२२६१९0२३५१२00९२१२८९९२२२७२0१0२१९४९२२२८0२0११२0५२८६२१३८२0१२१८८३४२१९२५२0१३१६६0३७१६९७२0१४९३0२६९५६एकूण१६२0८८७२१७0८0मनोजची उणीव भासते...‘साद’च्या माध्यमातून सुनीता पवार आणि त्यांचे पती मनोज वाघमारे तर ‘एनएसपी’च्या माध्यमातून करुणा पवार यांनी संसर्गितांसाठी आपले आयुष्य वेचले. संसर्गित पुरुष-महिला पुन्हा अथवा तरुण-तरुणींना वैवाहिक जीवन अनुभवता यावे, जगता यावे म्हणून ‘नांदा सौख्यभरे’ या संकल्पनेअंतर्गत संयुक्तपणे विवाह मेळाव्यांचे आयोजन केले. गेले आठ वर्षे त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. मात्र, तीन वर्षापूर्वी मनोज यांचे निधन झाले आणि या संसर्गितांच्या आयुष्याच्या जीवनात नवी बीजे रोवणारा तारा निखळला. ...अन् मिळाला आईचा अधिकारयोगिता-विजय (नावे बदललेली आहेत) या एचआयव्ही-एड्स संसर्गितांच्या विवाहाला आता आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा संसार अतिशय सुखात चालला आहे. विजयला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आहे. ती आता बारावीत आहे. विशेष म्हणजे विजयने विवाह केल्यामुळे त्याच्या मुलीला आता आई मिळाली आहे तर पत्नी योगिताला कोणीतरी ‘आई’ म्हणते, याचा फार मोठा आनंद आहे.