सागर गुजर
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : कोरोना होऊ नये म्हणून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. लसींच्या तुटवड्यामुळे या मोहिमेला पाहिजे तशी गती नाही. लसीकरणासाठी केंद्रावर मोठी गर्दी होत असून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडतो आहे. या लसीकरणाच्या सोहळ्यात कोरोनाचा प्रसाद वाटप सुरू आहे.
जिल्हा प्रशासनाने कोरोना लसीकरणाची तयारी केली असली तरी ठरावीक केंद्रावरच लस उपलब्ध केली जाते. सातारा शहरांमध्ये क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, गोडोली येथील शासकीय रुग्णालय तसेच सातारा शहरातील कस्तुरबा रुग्णालय लसीकरण मोहीम सुरू आहे. लोक ऑनलाइन नोंदणी करून लसीकरण केंद्रावर जातात. लस मिळेल या अपेक्षेने उन्हातानात थांबतात. लस मिळाली नाही तर परत घरी फिरतात.
प्रशासनाने लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये यासाठी जी उपाययोजना करायला पाहिजे ती झालेली नाही. आता १८ ते ४४ वयोगटातील लोकांना लसीकरण करण्यात येत असल्याने या गर्दीमध्ये आणखी भर पडली आहे. त्या गर्दीमध्ये खोकला, सर्दी या किरकोळ आजारांसाठी सोबतच उच्च रक्तदाब, मधुमेह झालेलेदेखील आहेत. वास्तविक अशा रुग्णांना लसीकरणासाठी बाहेर यावे लागते, त्यामुळे त्यांना जास्त धोका आहेत.
सर्व लसीकरण केंद्रावर प्रचंड मोठी गर्दी होत असल्याने सोशल डिस्टंसिंग फज्जा उडतो आणि लोक दिवस दिवस एका ठिकाणी एखादा सोहळा असल्यासारखे थांबतात. जिल्हा रुग्णालयातील टाकला असता तरी त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही याचीदेखील सोय नसल्याने लोकांना उभे राहून करावी लागते. सोशल डिस्टंसिंग राहून या ठिकाणी कोणीही सूचना करत नसल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर वागू शकतो.
चौकट
लसी मिळवण्यासाठी वशिलेबाजी
लस मिळवण्यासाठी लोक ऑनलाइन नोंदणी करत आहेत. मात्र अनेक जण लोकप्रतिनिधी अथवा राजकीय संघटनेच्या माध्यमातून आपले पितळ पांढरे करून घेत आहे. दिवस दिवस रांगेत घेणाऱ्यांना मिळत नाही, मात्र काही जणांना रांगेत उभे न राहता लस मिळते ही वस्तुस्थिती आहे.
कोट..
गेल्या दोन दिवसांपासून लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारत आहे. प्रशासन वशिलेबाजी करणाऱ्यांना लसीकरणात प्रथम स्थान देत आहे. कोरोनाच्या काळात घराबाहेर पडायचे नसताना आम्हाला प्रशासकीय हलगर्जीपणामुळे रस्त्यावर यावे लागत आहे.
- महेश पाटील
फोटो ओळ : सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातमधील लसीकरण केंद्रावर सोमवारी लोकांची अशी तुफान गर्दी झाली होती. (छाया : जावेद खान)