शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
4
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
5
यामाहाची FZ किती रुपयांनी स्वस्त झाली? जुना काळ आठवला..., फसिनो, आर१५ वर किती जीएसटी कमी झाला...
6
धैर्याला सॅल्यूट! देशातील पहिली ट्रान्सजेंडर फोटो जर्नलिस्ट; आता मागते भीक पण स्वप्न आहेत मोठी
7
Reels बनवण्यासाठी अस्वलाला पाजलं कोल्ड ड्रिंक, VIDEO व्हायरल झाल्यावर जे घडलं ते पाहून...
8
१० टक्के पगारवाढ, लॉयल्टी बोनस अन् समायोजन...! एनएचएम कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे
9
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
10
GST कपातीनंतर 4 लाखांपेक्षाही स्वस्तात मिळतेय ही मारुती SUV; देते 34 km पर्यंत मायलेज; बघा, व्हेरिअँट निहाय सूट...
11
अर्शद वारसी नव्हे, तर 'जॉली एलएलबी'साठी या मराठमोळ्या अभिनेत्याला होती पहिली पसंती, आता होतोय त्याला पश्चाताप
12
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
13
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
14
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
15
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
16
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
17
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
18
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
19
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
20
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?

एटीएम घोटाळा कोरेगावात

By admin | Updated: August 7, 2015 23:20 IST

पंधराजणांवर गुन्हा : ८० लाख हडप केल्याचा अंदाज

कोरेगाव : सातारा शहर आणि तालुक्यापाठोपाठ कोरेगाव आणि खटाव तालुक्यातील पाच एटीएम यंत्रांमध्ये पैशांचा भरणा न करता सुमारे ७९ लाख ९६ हजार ८०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी १५ जणांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा शहर आणि परिसरातील एटीएम यंत्रांमध्ये पैशांचा भरणा न करता कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सायंटिफिक सिक्युरिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, लि. मुंबईचा सातारा येथील शाखाधिकारी अजय दिलीप हगवणे (रा. पांडेवाडी, पो. भोगाव, ता. वाई) याच्यासह ९ कर्मचारी आणि ६ साथीदारांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रहिमतपूर शाखेतील एटीएम केंद्रावर १३ लाख २० हजार ५०० रुपये, चिमणगाव शाखेतील केंद्रावर २६ लाख १९ हजार रुपये, पेठ किन्हई शाखेतील केंद्रावर ४ लाख ५० हजार ६०० रुपये, पुसेगाव शाखेतील केंद्रावर १८ लाख १४ हजार ४०० रुपये, पुसेगाव येथील केंद्रावर १७ लाख ९२ हजार ३०० रुपये असे एकूण ७९ लाख ९६ हजार ८०० रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक (ग्राहक सेवा वितरण) अशोक प्रभू, रा. डोंबिवली-कल्याण यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सातारारोड पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक जर्नादन धुमाळ तपास करत आहेत. (प्रतिनिधी)गुन्हा दाखल झालेले असेपोलिसांनी कंपनीचा सातारा शाखेचा व्यवस्थापक अजय हगवणे याच्यासह कंपनी कर्मचारी नामदेव नवघणे (रा. वासोळ)े, वैभव साळुंखे (रा. बोरगाव), अभिजित बोरस्कर (रा. वडगाव), शेखर गायकवाड (रा. पांडेवाडी), शशांक यादव (रा. करंजे-सातारा), जितेंद्र शेडगे (रा. बोरगाव), सागर खरात (रा. आसरे), निखिल नावडकर (रा. सोनगाव) व त्यांचे सहकारी तुषार चंद्रकांत साळुंखे (रा. बोरगाव), सचिन जाधव (रा. काशिळ), अमित जाधव (रा. अतित), अतुल साळुंखे (रा. बोरगाव), कुमार उर्फ बबलू सकटे (रा. बोरगाव, हल्ली नागठाणे), विराज ऊर्फ अमोल प्रताप कुंदप (रा. बोरगाव) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.