संजय कदम - वाठार स्टेशन -ग्रामीण अर्थव्यवस्थेची आधारवाहिनी असलेल्या विकास सेवा सोसयटीमध्ये प्रत्येकाचीच भूमिका महत्त्वाची असते. असे असतानाही सोसायटीच्या सचिवाचा मान मात्र, निराळाच असतो. यामुळे अडला-नडला शेतकरी सततच सचिवाच्या संपर्कात येतो. आणि सोसायटीच्या कर्जाची वाट पाहतो. शेतकऱ्याप्रमाणेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी ५ वर्षासाठी या संस्थेत प्रतिष्ठेने उठ-बस करतात. परंतु, संस्थेच्या ध्येय धोरणांची माहिती त्यांनाही नसते. अगदी याचा फायदा घेवून देऊर-दहिगाव सारख्या सोसायटीत ३ कोटी पर्यंतची अफरातफर होते. खरेतर यात केवळ सचिव हाच सूत्रधार नाही तर इतर अनेक चेहरे उजेडात येण्याची गरज आहे. सोसायटी सचिवांनी कर्जमागणी सभासदांची कर्जप्रकरणे ही जिल्हा बँकेच्या धोरणाप्रमाणे ही प्रकरणे , ७/१२ खाते उतारे तपासून तसेच या सभासदाची खातरजमा करणे गरजेचे असते. तसेच या कर्ज मागण्याऱ्या सभासदास कमाल मर्यादा (कम) प्रमाणे कर्ज देण्याची गरज असते. या गोष्टीबाबत देऊर-दहिगाव विकास सेवा सोसायटीत या नियमांचे पालन झाले का? हे पहाणे गरजेचे आहे. त्यामुळे या बँकेच्या विकास अधिकाऱ्यांनी येथील ५५ लाखांच्या दुबार प्रकरणाला संमती कशी देण्यात आली हे शोधणे गरजेचे आहे.सोसायटीत निवडून आलेल्या संचालक मंडळाची जबाबदारी तरी सचिवाच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची असली तरी सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येकवर्षी या सहकारी संस्थेचे आॅडीट तपासणाऱ्या लेखा परिक्षकांनी ५ वर्षात या संस्थांत नक्की कश्याच्या तपासण्या केल्या. जर या लेखा परिक्षकांनी सोसायटीचे लेखापरिक्षण करताना अफरातफरीबाबतच्या सूचना वेळोवेळी दिल्या असल्या तर ही परिस्थितीच निर्माण झाली नसती. या प्रकरणात लेखापरिक्षकांच्या तपासणी कामाबाबतही संशय निर्माण होत आहे. दोषी सर्वांवरच कारवाई व्हावी...देऊर-दहिगाव सोसयटी अपहारात सचिव हे मुख्य दोषी दाखवण्यात आले असलेतरी सचिवावर नियंत्रण ठेवणाऱ्या लेखापरिक्षक, जिल्हा बँकेचे विकास अधिकारी यांना या प्रकरणातून वाचवण्याचाच प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अपहार प्रकरणात जे दोषी त्या सर्वांवरच कारवाई व्हावी, ही भूमिका घेणे गरजेचे आहे.
अडला नारायण धरी सचिवाचे पाय!
By admin | Updated: December 4, 2014 23:46 IST