शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

सांगलीचे कारागृह नव्या जागेत हलविणार

By admin | Updated: August 9, 2015 00:46 IST

मीरा बोरवणकर : जागेचा शोध सुरू

सांगली : सांगलीच्या कारागृहाची इमारत फार जुनी आहे. कारागृहाला लागून शाळा व टोलेजंग इमारती आहेत. शाळेचे छत व इमारतींवरून कारागृहातील सर्व चित्र दिसते. सुरक्षिततेच्यादृष्टीने हे धोक्याचे आहे. त्यामुळे कारागृहासाठी नवीन जागेचा शोध सुरू आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची मदत घेतली आहे, अशी माहिती कारागृह महानिरीक्षक मीरा बोरवणकर यांनी सांगलीत शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली. मीरा बोरवणकर दोन दिवसांपासून सांगली दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी स्वतंत्रपूर (ता. आटपाडी) येथील खुल्या कारागृहाची पाहणी केली. त्यानंतर शनिवारी सकाळी सांगली जिल्हा मध्यवर्ती कारागृहास भेट दिली. अधीक्षक एम. एस. पवार यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड उपस्थित होते. बोरवणकर यांनी कारागृहाची पाहणी करून कैद्यांशी चर्चा केली. कारागृहात नेमक्या काय त्रुटी आहेत? त्यावर काय केले पाहिजे, याविषयी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. बराच वेळ त्यांच्यात ही चर्चा सुरू होती. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, सांगली, आटपाडी, कोल्हापूर व सातारा या कारागृहांना भेट देऊन पाहणी केली आहे. प्रशासन, कैदी, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या अडचणी समजावून घेतल्या आहेत. विशेषत: कैद्यांच्या राहण्याची स्थिती कशी आहे, याची माहिती घेतली आहे. आटपाडीच्या स्वतंत्रपूर कारागृहातील कैद्यांना दारिद्र्यरेषेखालील योजनेतून धान्य पुरविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तेथील कैद्यांसाठी राहण्याची व्यवस्थाही सुधारण्यात येईल. सांगलीसह अनेक कारागृहांना सुरक्षिततेच्यादृष्टीने धोका निर्माण झाला आहे. काही ठिकाणी कुंपन भिंतींची उंची कमी आहे, तर काही ठिकाणी कारागृहाच्या परिसरात नागरी वस्ती वाढली आहे. सांगलीत कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न गंभीर आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाची २५ खोल्यांची वसाहत पडून आहे. ती कर्मचाऱ्यांसाठी घेणार आहे. (प्रतिनिधी) राज्यातील कारागृहांत सुरक्षिततेबाबत त्रुटी राज्यातील काही कारागृहांत सुरक्षिततेबाबत त्रुटी आहेत. तेथे संबंधित जिल्हा पोलीसप्रमुखांकडून लेखापरीक्षण करून घेण्यात आले आहे. लेखापरीक्षणातून कारागृहांत त्रुटी आढळून आल्या आहेत. आढळलेल्या त्रुटी तातडीने दूर करीत आहोत. अजूनही काही कारागृहांत लेखापरीक्षणाचे काम सुरू आहे.