शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
3
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
4
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
5
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
6
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
7
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
8
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
9
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
10
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
11
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
12
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
13
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
14
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
15
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
16
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
17
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
18
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
19
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
20
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार

पाणीपट्टी अन थकबाकी वसुलीत विश्वासार्हता हवी

By admin | Updated: January 18, 2016 23:34 IST

आकारणीबाबत शेतकरी संभ्रमात : टंचाईतून वीज बिल भरावे

दादा खोत -- सलगरे -टंचाई निधीतून अगर शासनाने वीज बिल भरून ही योजना चालणार नाही. शेतकऱ्यांनीच या योजनेकडे सकारात्मकदृष्टिकोनातून पाहणे गरजेचे आहे. वर्षभर पाणी सोडण्याची शाश्वती शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. पाटबंधारे विभागाकडून यशस्वी योजना चालविण्यासाठी या पाण्याचे निश्चित लाभार्थी कोण, याचा सर्व्हे होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या पाणी मागणी अर्जावर पाणीपट्टीचे अगर पाणी सोडण्याचे नियोजन न करता, संभावित पाणी उपयोजित लाभक्षेत्राचा सर्व्हे होऊन त्यावर पाणीपट्टी आकारणे आवश्यक आहे. शिवाय हेक्टरी संभावित पाणीपट्टी किती आहे, याबाबतही शेतकरी संभ्रमावस्थेत आहेत.संभावित पाणीपट्टी आणि पाणी आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर करणे, ते प्रत्येकलाभक्षेत्रापर्यंत पोहोचवणे याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून केल्यास शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वती मिळेल आणि त्यानुसार पिकांचे नियोजनही त्यांना करता येईल. सिंचनासाठी शेतकऱ्यांना इतर पर्यायी मार्गासाठी पैसे खर्च करण्याची गरज राहणार नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडणार नाही. थकबाकी भरण्याची कुवत त्यांच्यामध्ये निर्माण होणार आहे.ग्लोबल होण्याची भाषा करणाऱ्या शासनाला अजूनही दुष्काळातील शेतीला योजना तयार असूनही पाण्याचे योग्य नियोजन करता आले नाही. पाटबंधारे विभागाच्या काटेकोर नियोजनासाठी शासनाने आणि लोकप्रतिनिधीनी लक्ष वेधले पाहिजे. ज्या मूळ हेतूसाठी योजना तयार झाली, त्याचा विसर राज्यकर्त्यांना पडता कामा नये. राज्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना दुष्काळाचे (निधीचे) लालूच दाखवून वर्षातून एखादा महिना आवर्तन देऊन, लोकांची दिशाभूल करणे थांबविणे गरजेचे आहे. योजना यशस्वी होण्यासाठी पाटबंधारे विभागाने पुढील बाबींचा विचार गांभीर्याने केला पाहिजे. (क्रमश:)वर्षभर पाण्याची पाटबंधारे विभागाकडून शाश्वती दिली गेली पाहिजे. शेतकऱ्यांमध्ये योजनेविषयी विश्वासार्हता अजूनही आली नाही. सात-बारावर बोजा चढविण्यासारख्या धमक्या प्रशासनाने थांबवून, पाणी नियोजन आणि पाणीपट्टी थकबाकी वसुलीबाबत शेतकऱ्यांमध्ये विश्वासार्हता वाढविणे गरजेचे आहे.- आबासाहेब साळुंखे,माजी सरपंच, कोगनोळी.लाभक्षेत्र निश्चित करावेयोजनेअंतर्गत येणाऱ्या निश्चित लाभक्षेत्राचा शोध घेणे.लाभक्षेत्र निश्चित केल्यानंतर संभावित पाणीपट्टी जाहीर करणेपाण्याच्या आवर्तनाचे वेळापत्रक जाहीर करणेपाणीपट्टीचे निश्चित देयक तयार करून ते लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करणे.