शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

कोरोनातील काळीजखुणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2021 04:25 IST

- वैजनाथ महाजन --------------------- एंट्रो साध्या साध्या गोष्टींतूनही आपणास निरामय जगण्याची सवय लागत असते. कोरोना काळात अशी एकमेकांना मदत ...

- वैजनाथ महाजन

---------------------

एंट्रो

साध्या साध्या गोष्टींतूनही आपणास निरामय जगण्याची सवय लागत असते. कोरोना काळात अशी एकमेकांना मदत करणारी असंख्य माणसे आपल्या अवतीभोवती होती. हा जसा सदाचाराचा भाग झाला, तसाच आपणास लोकांमधील राक्षसी प्रवृत्तीचाही विदारक आणि तितकाच उग्र वाटावा असाही अनुभव आला. जेव्हा असे एखादे सार्वत्रिक संकट कोसळते, तेव्हा सारेच खडबडून जागे होत असतात, असा सार्वत्रिक अनुभव आहे. गत वर्षात काेराेनाने जगासमाेर जे काही आव्हान उभे केले, ते पाहता भविष्यात आपली वाटचाल कशी सुरू ठेवायची याचा परोपरीने विचार करण्याची गरज आहे. कोरोनातील काळीजखुणा आपणास हेच सांगत नाहीत काय?

--------------

जेव्हा एखादी महामारी समस्त मानवजातीला घेरून टाकत असते, त्यावेळी त्याबरोबर काही ना काही नवे पण समस्त मानव जातीसमोर येत असते. जेव्हा १८८२ मध्ये पहिल्यांदा प्लेगची साथ आली, तेव्हा आपणा सर्वांना प्रथमता--- संसर्ग म्हणजे काय? ते समजून आले. त्यानंतर १९३८ मध्ये प्रथमच हिवतापाची साथ आली आणि साध्या हिवतापाने हजारो माणसे मरण पावली. कारण तोपर्यंत वैद्यक शास्त्राने याबाबत कोणतेही संशोधन केले नसल्याने उपाय सापडणे कठीण होते. आज लक्षात येते की, प्लेगचे आता संपूर्ण जगातून उच्चाटन झाले आहे आणि हिवताप अत्यंत सर्वसामान्य झाला आहे. बऱ्याचवेळा आपल्याकडे असे म्हटले जाते की, ‘मागच्यास ठेच पुढचा शहाणा’ तसेच आपण आता कोरोनाकडे मागे वळून पाहत असताना असे लक्षात येते की, कोरोनाने आपणाला खूपच सावध आणि सजग बनविले आहे. त्यामुळे आपण आपल्या परीने आपणास स्वयंशिस्त लावून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. नाहीतर यापूर्वी आपण कधी वारंवार हात धूत होतो? पण आता अनेक लोकांनी ही शिस्त पाळण्यास सुरुवात केली आहे. हा, नाही म्हटले तरी फैलावलेल्या आणि फैलावत असलेल्या कोरोनाचाच प्रभाव म्हणावा लागतो.

अनेक छोट्या-छोट्या देशात तोंडावर मुखपट्ट्या लावून घराबाहेर पडण्याची पद्धत रूढच होती; पण आपणाकरिता मात्र ती सर्वस्वी नवीन होती. त्यामुळे मास्क लावणे आणि त्याची सवय लावून घेणे याकरिता थोडा सार्वजनिक वेळ द्यावाच लागला आणि आता आपण त्याबाबतीतही उत्तमरीत्या मास्क लावून बाहेर पडण्याची शिस्त लावून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत. अशा साध्या साध्या गोष्टीतून काय साध्य होते, असा प्रश्न अनेकवेळा समाजात डोके वर काढत असतो; पण अशा साध्या साध्या गोष्टीतूनही आपणास निरामय जगण्याची सवय लागत असते हे कसे नजरेआड करता येईल? आता राहिला प्रश्न बिघडलेल्या नातेसंबंधांचा आणि नव्याने घडून आलेल्या नातेसंबंधाचा. माझ्या बघण्यात आलेला काहीसा धक्कादायक आणि काहीसा तितकाच सुखावणारा असा बदल.. एक हॉटेलचालक आहेत. त्यांनी आपल्या तालुक्याच्या ठिकाणाहून ४० कोरोना रुग्ण जिल्हा रुग्णालयात नेऊन ठणठणीत बरे केले आणि ते सुद्धा एका गाडीत अगदी शेजारी-शेजारी बसून त्यांच्याशी गप्पा-टप्पा करत त्यांना परत आपल्या तालुक्याच्या गावी घेऊन येत असत. या कृश प्रकृती हाॅटेलचालकाला आजतागायत कोरोनाची साधी बाधाही झालेली नाही. या बाबतीत त्याला असे वाटते की, मी ज्या निरपेक्ष भावनेने या रुग्णांची सेवा केली, त्यांच्याच सदिच्छेमुळे माझी प्रकृती ठणठणीत राहिली.

कोरोना काळात अशी एकमेकांना मदत करणारी असंख्य माणसे आपल्या अवतीभोवती होती. हा जसा सदाचाराचा भाग झाला, तसाच आपणास लोकांमधील राक्षसी प्रवृत्तीचाही विदारक आणि तितकाच उग्र वाटावा असाही अनुभव आला. शहरात राहणाऱ्या एका कथित सुशिक्षित कुटुंबाने प्रत्यक्ष गावाकडून आलेल्या वृद्ध आई-बापाच्याकरिता आपल्या घराची कवाडे बंद करून घेतली आणि त्या वृद्ध दाम्पत्याला आल्यापावली हतबल होऊन गावी परतावे लागले; पण ज्यावेळी शहरातील त्यांच्याच या मुलाला जेव्हा कोरोनाची बाधा झाली, तेव्हा त्या वृद्ध आई-वडिलांनी मात्र गावाकडच्या आपल्या खोपटाचे दार मात्र मुलाकरिता उघडे ठेवले आणि त्याला गावाकडे पूर्ण बरा करून पुन्हा शहरात धाडले. यातून या मुलाने आणि सुनेने काही बोध घेतला की नाही हे कळण्यास काही मार्ग नाही; पण आता हे लक्षात येत आहे की, तथाकथित सुशिक्षितांच्यातही संकुचित भावना आणि वृत्ती भलतीच बळावलेली दिसते. कारण आता नागरी जीवनात राहणारी मंडळी टाचेपुरती वहान कापण्यास अत्यंत सफाईदारपणे शिकू लागली आहेत आणि त्यातच धन्यता मानू लागली आहेत. जेव्हा असे एखादे सार्वत्रिक संकट कोसळते, तेव्हा सारेच खडबडून जागे होतो; पण एकमेकांची विचारपूस करणे मात्र अगदी सोईस्करपणे विसरून जात असतात. खरेतर जेव्हा कोरोनासारखी झपाट्याने पसरणारी एखादी महामारी माणसाचा पिच्छा सोडण्यास तयार नाही, तेव्हा सर्वांकरिता नव्या सार्वजनिक सत्यधर्माची गरजपण त्याचवेळी निर्माण होतो? असते. त्यातूनच प्रत्येकाचा प्रत्येक दुसऱ्याकरिता हात पुढे येणे अगत्याचे असते. आपल्याकडे बोलीभाषेत असे म्हटले जाते की, ‘होणारे न चुके जरी ब्रम्हातया आडवा’ तेव्हा आपण अशावेळी केवळ काठावर बसून कोणालाही असे हात मार, तसे पाय मार असे सांगण्यातून फारसे काही साध्य होतो? नसते, तर आपणही प्रवाहातील एक आहोत, असे समजून आपल्या व्यक्तिगत जगण्याला थोडी मुरड घालून सार्वजनिक जीवनात वावरणे फार फार गरजेचे असते. अशावेळी ज्यासी अपंगीता काही त्यासी हृदयी धरण्याची गरज निर्माण झालेली असते. अशा गरजेला जागणे हाच खरा मानवता धर्म असतो. ज्या शास्त्रज्ञाचे हृदयसुद्धा बॅटरीवर चालत असे ते जगविख्यात शास्त्रज्ञ स्टिफन हाॅकिंग यांनीसुद्धा अखेरच्या क्षणापर्यंत मानवजातीच्याच कल्याणाचा विचार केला. आणि तो विचार सांगण्याकरिता ते प्रत्यक्ष मुंबईनगरीत येऊन गेले होते. आपण निदान हा सारा पूर्व इतिहास समजून घेऊन भविष्यात आपली वाटचाल कशी सुरू ठेवायची याचा परोपरीने विचार करण्याची गरज आहे. कोरोनातील काळीजखुणा आपणास हेच सांगत नाहीत काय?

- वैजनाथ महाजन