नरेंद्र रानडे- सांगली -मोबाईलच्या आक्रमणामुळे सांगली जिल्ह्यात आठ वर्षांत भारत संचार निगमच्या (बीएसएनएल) दूरध्वनीची (लॅण्डलाईन) संख्या वेगाने घसरली आहे. २००६-०७ मध्ये जिल्ह्यात १ लाख ७४ हजार ४२३ ग्राहकांकडे दूरध्वनी संच होता; परंतु ‘कर लो दुनिया मुठ्ठीमे’ म्हणत आलेल्या मोबाईलच्या झंझावातामुळे सध्या केवळ ७४ हजार ७६६ ग्राहकांकडेच दूरध्वनीचा संच राहिला आहे. भारतात दूरध्वनीचे आगमन १८८२ मध्ये झाले. परंतु त्याचा वापर अत्यंत मर्यादित होता. १९८१ च्या सुमारास खऱ्याअर्थाने दूरध्वनीच्या वापरास सुरुवात झाली. त्याकाळी चाळीत अथवा सदनिकेत एखाद्याच घरी संच असे. कालांतराने बहुतांशी मध्यमवर्गींयांच्या घरी हमखास ‘दूरध्वनी’ संच दिसू लागला. कालांतराने भ्रमणध्वनी संच (मोबाईल) आल्याने दूरध्वनी संचाची उपयुक्तता कमी होत गेली. अनेकांनी दूरध्वनीची कनेक्शन बंद करून मोबाईल जवळ केला. सांगली जिल्ह्यात आठ वर्षांत मोबाईल कनेक्शनच्या संख्येत वेगाने वाढ होत गेली आणि दूरध्वनी संच घटले. मात्र घरी दूरध्वनी संच घेतल्याशिवाय ब्रॉडबँडची सेवा मिळत नसल्याने अनेकांनी नाईलाजाने घरी दूरध्वनी संच केवळ ‘इनकमिंग’साठीच वापरण्यास प्रारंभ केला आहे. एसटीडी दूरध्वनी संच सेवा ज्या पध्दतीने कालबाह्य झाली, त्याच मार्गावर सध्या दूरध्वनी संचाची वाटचाल सुरू असल्याचे आठ वर्षांतील आकडेवारीवरून दिसते. ग्राहक संख्या वर्षदूरध्वनी मोबाईल २००६-०७१७४४२३६६९१२२००७ -०८१५६५७६ ८७६६६२००८-०९१३२५३९११०६२३२००९-१०११७९५०१२८३८६२०१०-१११०४६४२१६०८६०२०११-१२ ९५९२४१५१६२६२०१२-१३ ८४४२४१६७१७२२०१३-१४ ७४६५७१६२४९३ब्रॉडबँडचे ग्राहक वाढलेइंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे ब्रॉडबँड कनेक्शनच्या संख्येत वाढ झाली आहे. २००६-०७ मध्ये ९२५ दूरध्वनी संच असणाऱ्यांनी ब्रॉडबँडचे कनेक्शन घेतले होते, तर २०१३-१४ मध्ये १६ हजार ३९२ इतकी संख्या झाल्याचे सांगितले.
सांगलीकरांचा ‘लॅण्डलाईन’ला रामराम!
By admin | Updated: December 26, 2014 23:47 IST