शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

आरटीओ कार्यालय बंद शाळेतच!

By admin | Updated: September 5, 2014 00:09 IST

अखेर शिक्कामोर्तब : जागेचे करारपत्र करण्याची प्रक्रिया सुरू

सचिन लाड - सांगली -गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या सांगलीच्या आपटा पोलीस चौकीजवळील महापालिकेच्या शाळा क्रमांक आठच्या इमारतीमध्येच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) होणार आहे. शाळेची इमारत कार्यालयासाठी द्यावी, अशी मागणी आरटीओ हरिश्चंद्र गडसिंग यांनी महापालिका आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे सहा महिन्यांपूर्वी केली आहे. भाडे किती द्यायचे, या मुद्यावर जागेचा प्रश्न प्रलंबित होता. मात्र तोही प्रश्न आता सुटला असून, येत्या महिन्याभरात आरटीओ कार्यालय शहरात मध्यवर्ती ठिकाणी सुरू होईल.राज्यातील सर्व आरटीओ कार्यालये स्वत:च्या व प्रशस्त इमारतीमध्ये आहेत. केवळ सांगलीचेच कार्यालय अडगळीच्या भाड्याच्या जागेत व शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. गडसिंग यांनी गतवर्षी सांगली कार्यालयाचा कार्यभार स्वीकारला. कार्यालयाची अवस्था पाहून त्यांनी कार्यालयासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र जागा देण्याची मागणी केली होती. मात्र त्यावर कोणताही निर्णय झाला नाही. सावळी (ता. मिरज) येथील वादग्रस्त जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ट बनला आहे. त्यामुळे या जागेचा नाद सोडला आहे. सध्याचे कार्यालय अडगळीत असून, नागरिकांच्या गैरसोयीचे आहे. गडसिंग ३१ आॅक्टोबर २०१४ रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. तत्पूर्वी जागेचा प्रश्न मिटावा, कार्यालयाची स्वतंत्र जागा असावी, सर्व कारभार एकाच छताखाली असावा, लोकांची गैरसोय होऊ नये, अशी त्यांची अपेक्षा होती. यासाठी ते कार्यालयास स्वतंत्र जागा मिळविण्यासाठी धडपडत होते. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचेही याकडे दुर्लक्ष आहे. महिलांसाठी कार्यालयात कोणतीही सुविधा नाही. कोणी लहान मुलांसोबत आले, तर त्यांना बसण्याची व्यवस्था नाही. शौचालयाची व्यवस्था नाही. यामुळे वाहन चालविण्याचा परवाना काढण्यास येणाऱ्या महिलांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. कार्यालयाचा सर्व कारभार संगणकीकृत झाला असला तरी, तो पत्र्याच्या शेडमध्येच सुरू आहे. माधवनगर रस्त्यावरील चिंतामणीनगर व जुना बुधगाव रस्त्यावरील समाजकल्याण कार्यालयाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती बांधून रिकाम्या आहेत. यापैकी कोणतीही जागा देण्याची मागणी गडसिंग यांनी केली होती. परंतु कोणताही निर्णय होत नसल्याने, महापालिकेच्या बंद असलेल्या शाळेची इमारत तरी द्यावी, अशी त्यांनी आयुक्तांकडे मागणी केली होती. शाळेची इमारत साडेचार हजार चौरस फूट आहे. ती कार्यालयासाठी पुरेशी ठरणार आहे. भाडे किती देणार? सध्याचे कार्यालय माधवनगर रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीत भाड्याच्या जागेत आहे. या जागेला महिन्याला अठरा ते वीस हजार रुपये भाडे दिले जाते. बंद शाळेची जागा मिळाल्यास तेवढेच भाडे देण्याची तयारी गडसिंग यांनी दर्शविली होती. मात्र पालिकेने एक लाख रुपये भाडे मागितले. भाड्याची रक्कम जादा असल्याने या प्रश्नावर निर्णय झाला नव्हता. चार दिवसांपूर्वी पालिकेने भाड्याच्या रकमेत तडजोड केली, परंतु ही तडजोड कितीवर झाली, याचा आकडा समजू शकला नाही. हा विषय मिटला असून, करारनामा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, येत्या महिन्याभरात नवीन जागेत जाऊ, असे गडसिंग यांनी सांगितले. ू्रहापालिका व आरटीओ यांच्यात जागेच्या भाड्याबाबत करारपत्र होणार आहे. त्याचा मसुदा तयार आहे; पण त्यावर अद्याप महापौर कांचन कांबळे, गटनेते किशोर जामदार यांच्या सह्या झालेल्या नाहीत. प्रशासनाकडून आज दिवसभर पदाधिकाऱ्यांची प्रतीक्षा केली गेली, पण पदाधिकारी महापालिकेकडे न आल्याने पत्रावर सह्या होऊ शकल्या नाहीत.