शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

ताला-सुरांवर रंगरेषांची बरसात

By admin | Updated: July 28, 2016 00:57 IST

पावसाळी अक्षरांची ढगफुटी : जागतिक कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांची कार्यशाळा

सांगली : ढगाळ वातावरण... पावसाने घेतलेली थोडीशी विश्रांती... मात्र, तरीही शांतिनिकेतनमध्ये रंगरेषांच्या माध्यमातून बरसात सुरू होती. ‘पावसाळी अक्षरांच्या ढगफुटी’चा खराखुरा अनुभव देणाऱ्या जागतिक कीर्तीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या कार्यशाळेत ताला-सुरांची साथ आणि त्यावर रंगरेषांची मुक्तहस्ते उधळण... असा अनोखा संगम नवोदित चित्रकारांना बुधवारी पाहावयास मिळाला. पालव यांच्या सहजसुंदर सादरीकरणामुळे कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी सर्वजण भारावले होते. शांतिनिकेतन येथील कलाविश्व महाविद्यालयाच्यावतीने अच्युत पालव यांच्या कॅलिग्राफी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेत पावसाळी अक्षरांची ढगफुटी पेंटिंग्ज, अंब्रेला कविता आणि पावसाळी गप्पा ही संकल्पना राबविण्यात आली आहे. याला पुरेपूर दाद देत पालव यांनी उपस्थित नवचित्रकारांमधूनच गायकाचा शोध घेत, त्याने सादर केलेल्या पावसाळी गाण्यांवर पालव यांचा ब्रश कागदावर बरसात करत होता. ‘रिमझिम गिरे सावन...’, ‘चिंब भिजलेले’ या गाण्यांवर त्यांनी केलेले सहजसुंदर सुलेखन उपस्थितांना सुखावून गेले. कार्यशाळेच्या सुरूवातीलाच त्यांनी ‘फ्रीलान्स’ प्रकारातून कागदावर रंगांची उधळण करत रेखाटलेले चित्र दाद घेऊन गेले. ‘तू, मी आणि पाऊस’ याला तर उपस्थित तरूणांनी अक्षरश: शिट्ट्या वाजवून डोक्यावर घेतले. घराच्या दारावरील नावाच्या पाट्या, लग्नाची पत्रिका आणि सर्वांचे आकर्षण असलेल्या छत्रीवरील चित्रकलेला मोठा प्रतिसाद मिळाला. केवळ एकापाठोपाठ चित्र अथवा सुलेखनच न करता, पालव यांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या मागणीनुसार इतरही अनेकविध चित्रे रेखाटली. दुपारच्या सत्रात छत्र्यांवर कला सादर करताना त्यांनी त्याचे व्यावसायिक महत्त्वही सांगितले. कलाक्षेत्रात पैसा, मान, सन्मान मिळतो, फक्त आपली कामावर श्रध्दा कायम असली पाहिजे, असे सांगत, पाऊस म्हणजे आनंद असतो. त्यामुळे काळ्या छत्र्या घेऊन पावसाला निषेध का दाखवायचा? असा मिश्किल सवालही त्यांनी केला. त्यानंतर स्वत: व उपस्थित चित्रकारांनी रेखाटलेल्या रंगीबिरंगी छत्र्या हाती घेत दुपारी शहरातून फेरी काढण्यात आली. कार्यशाळेची सुरूवात शांतिनिकेतनचे संचालक गौतम पाटील, शरद आपटे यांच्याहस्ते करण्यात आली. कलाविश्व महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब पाटील यांनी स्वागत केले. यावेळी प्रमोद चौगुले, सत्यजित वरेकर, सुरेश पंडित, गजानन पटवर्धन, भाऊसाहेब ननावरे आदी उपस्थित होते. महेश पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. दोन दिवस चालणाऱ्या या कार्यशाळेत गुरूवारी सकाळी पंत जांभळीकर खुल्या दालनात कॅलिग्राफी कार्यशाळा होणार आहे. (प्रतिनिधी)मनमोकळेपणाने व्यक्त व्हा...कोणत्याही क्षेत्रापेक्षा नावलौकिक, प्रसिध्दी मिळवून देणारे कलाक्षेत्र असतानाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची चिंता व्यक्त होत असली तरी, कलेकडे ओढाही वाढत चालला आहे. त्यामुळे आपण जोपासलेल्या कलेमध्ये जिवंतपणा व संवेदनशीलता ठेवत काम केल्यास यश नक्की मिळते, असे अच्युत पालव यांनी सांगितले. त्यांनी ‘कॅलिग्राफी व कलाक्षेत्रापुढील आव्हाने’ यावर सविस्तर मत मांडले. कॅलिग्राफी हा पाश्चात्य देशातील कलाप्रकार असला तरी, तिची परंपरा सांगलीतीलच म्हणावी लागेल. काण रघुनाथ कृ. जोशी यांनी सुलेखन कला जोपासली. पूर्वीपासून ही कला असली तरी, त्याचा प्रसार झालेला दिसत नाही. कोणत्याही चित्रातील, संदेशातील भावना महत्त्वाची असल्याचेही त्यांनी सांगितले. चित्रकला विषय अभ्यासक्रमातून न वगळता शासनाने जाणीवपूर्वक या कलेचे संवर्धन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.