शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

डाळी कडाडलेल्याच!

By admin | Updated: August 18, 2016 23:34 IST

‘बजेट’ कोलमडले : घाऊक दरात घट, किरकोळ बाजारात दर ‘जैसे थे’च

शीतल पाटील - सांगली --गगनाला भिडलेल्या डाळींच्या किमती आता पाऊसमान चांगले झाल्याने घाऊक (होलसेल) बाजारपेठेत उतरू लागल्या आहेत. गेल्या महिन्याभरात डाळींच्या किमतीत २० ते २५ रुपयांनी घट झाली आहे. मात्र किरकोळ (रिटेल) बाजारात डाळींचे दर कडाडलेलेच आहेत. अजूनही तूरडाळ १६० रुपये किलोनेच विक्री केली जात आहे. परिणामी सर्वसामान्यांच्या ‘किचन’चे ‘बजेट’ कोलमडले आहे.पश्चिम महाराष्ट्रात दरवर्षी सरासरीइतका पाऊस पडत असला तरी, शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे ओढा वाढला आहे. त्याचा परिणाम डाळींच्या उत्पादनावर झाला आहे. पूर्वीच्या काळी घरापुरते का होईना, डाळींचे उत्पादन घेतले जात होते. आता बदलती जीवनशैली आणि ‘रेडी टू कुक’ पद्धतीमुळे बाजारपेठेतून धान्य, डाळी खरेदीकडे कल वाढला आहे. सांगलीच्या मार्केट यार्डात वर्षाच्या सुरुवातीलाच डाळींचे दर कडाडले. घाऊक बाजारात (होलसेल) तूरडाळ ११० ते ११५ रुपयांच्या घरात पोहोचली. व्यापाऱ्यांकडून डाळ खरेदी करून किरकोळ दुकानांद्वारे ती ग्राहकाला मिळेपर्यंत तिचा दर १६० रुपयांपर्यंत गेला. केवळ तूरडाळच नव्हे, तर मूगडाळ, हरभराडाळ व मसूरडाळीच्या किमतीही वाढल्या. अगदी महिन्याभरापूर्वी घाऊक बाजारात तूरडाळ ११० ते ११५ रुपये किलो दराने विक्री होत होती. हरभराडाळीचे दरही महिन्याभरापूर्वी ११० रुपयांपर्यंत होते, पण जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली. राज्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. त्यामुळे घाऊक खरेदी करणाऱ्या मिल मालकांना यंदा बाजारात डाळींच्या उत्पादन वाढीचा अंदाज आला. साठा करून ठेवलेली डाळ आता बाजारपेठेत येऊ लागली आहे. परिणामत: घाऊक बाजारात डाळींचे दर उतरण्यास सुरुवात झाली आहे. तूरडाळ व मूगडाळीचे दर २० ते २५ रुपयांनी उतरले असले तरी, हरभराडाळीचे दर मात्र कडाडले आहेत. चार महिन्यांपूर्वी ५५ ते ६० रुपये किलो दराने हरभराडाळ विक्री होत होती. सध्या तिचा दर ९० ते ९५ च्या घरात पोहोचला आहे. सणासुदीच्या दिवसांचा हा परिणाम आहे. घाऊक बाजारात डाळींच्या दरात घसरण झाली असली तरी, किरकोळ बाजारात मात्र आजही चढ्या दरानेच डाळींची विक्री होत आहे. तूरडाळ ११० ते १६०, मूगडाळ ८० ते ९०, मसूरडाळ ८० ते ८५ व हरभराडाळ १०५ ते १६० रुपये दराने विक्री होत आहे. लातूरमधून सर्वाधिक डाळीची आवकसांगलीच्या वसंतदादा मार्केट यार्डात मुख्यत: मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान या राज्यांतून डाळी येतात. लातूर जिल्ह्यातून सर्वाधिक डाळीची आवक होते. शिवाय मुंबईतून परदेशातून आयात केलेल्याही डाळी येतात. याव्यतिरिक्त मध्य प्रदेशातील इंदूरहून चणाडाळ, राजस्थानहून मूगडाळ, जळगावमधून मटकीची सांगलीत आवक होते. शासनाने डाळींचा साठा करण्यावरही व्यापाऱ्यांना बंधने घातली आहेत. एका व्यापाऱ्याला सर्व डाळींचा मिळून ३५०० क्विंटल इतकाच साठा करता येतो. सांगलीच्या बाजारपेठेत इतका डाळीचा साठा कोणीच ठेवत नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. शिधापत्रिकेवर १०३ रुपये तूरडाळजिल्ह्यात शिधापत्रिकेवर मात्र तूरडाळीचा दर १०३ रुपये इतका आहे. घाऊक बाजारात तूरडाळीचा दर ९० ते ९२ रुपये इतका असला तरी, किरकोळ दुकानात याच डाळीचा दर १२० ते १३० रुपयांच्या घरात आहे. जिल्ह्यात अंत्योदय कार्डधारकांची संख्या ३५ हजार ६०५, तर दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांची संख्या ५९ हजार आहे. एका कार्डधारकाला एक किलो तूरडाळ दिली जाते. जिल्ह्यासाठी दरमहा एक हजार क्विंटल तूरडाळ लागते. जुलैअखेरपर्यंत डाळींच्या किमती वाढल्या होत्या. वर्षभरात दरात चढ-उतार होत आहे. पावसाच्या आगमनावर डाळींच्या किमती अवलंबून आहेत. जुलै महिन्यात सर्वत्र पावसाने चांगली हजेरी लावली. त्यामुळे भविष्यात डाळींचे उत्पादन वाढण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम त्यांच्या किमतीवर होत असून, सध्या घाऊक बाजारात डाळींचे दर कमी झाले आहेत. - सुरेश हिडदुगी, व्यापारी