शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

पोलीस संरक्षणात सोमवारपासून टोलवसुली; कंपनीची तयारी पूर्ण

By admin | Updated: August 9, 2015 00:45 IST

बांधकाम खात्याकडे अर्ज : शासनाकडून कोणतीही चर्चा नाही; टोलविरोधी कृती समितीची आंदोलनाची तयारी

बांधकाम खात्याकडे अर्ज : शासनाकडून कोणतीही चर्चा नाही; टोलविरोधी कृती समितीची आंदोलनाची तयारी सांगली : जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार अशोका बिल्डकॉन कंपनीने टोलवसुलीसाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांकडे त्यांनी शुक्रवारी अर्ज दिला असून, सोमवारपासून टोलवसुलीचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाकडून सांगलीतील टोलसंदर्भात अद्याप कंपनीशी कोणतीही चर्चा झालेली नाही. सांगलीतील टोलवसुली सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यादृष्टीने कंपनीने सर्व तयारी पूर्ण केली आहे. सांगलीवाडी आणि बायपास रस्त्यावरील जुना बुधगाव रस्त्यावरील टोल सुरू होणार आहे. त्यामुळे शुक्रवारी कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस यांना संरक्षणाच्या मागणीचा अर्ज व न्यायालयीन आदेशाची प्रत दिली आहे. न्यायालयीन आदेशाप्रमाणे आता त्यांना पोलीस संरक्षण द्यावे लागणार आहे. त्यामुळे सोमवारपासून टोलवसुलीचा निर्णय कंपनीने घेतला आहे. त्यासाठी नाक्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. शासनाच्यावतीने सोमवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार असून, त्यासाठीची तयारी झाली आहे. मात्र, यापूर्वी उच्च न्यायालयाने एकदा त्यांची याचिका फेटाळली असल्यामुळे याचिकेवर काय निर्णय होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. न्यायालयीन लढाईपेक्षा कंपनीला नुकसानभरपाई देऊन शासनाने हा विषय मिटवावा, अशी मागणी सांगलीकर जनतेतून होत आहे. कृती समितीच्या बैठकीतही याच मागणीने जोर धरला होता. नुकसानभरपाईच्या विषयावर मात्र शासनाने अद्याप कोणतेही पाऊल उचलले नाही. कंपनीशी कोणतीही चर्चा झालेली नाही. त्यामुळे न्यायालयाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत टोलवसुली सुरूच राहील, अशी चिन्हे आहेत. ठिय्या आंदोलनाचा निर्णय कंपनीने सोमवारपासून टोलवसुली चालू केली, तर कृती समितीमार्फत टोलविरोधात ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येईल. वाहनधारकांना टोल न भरण्याचे आवाहन केले जाईल. कोणत्याही परिस्थितीत टोल सुरू राहणार नाही, यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक सतीश साखळकर यांनी दिली. पोलीसप्रमुखांकडे निवेदन सर्वपक्षीय कृती समितीच्यावतीने रविवारी दुपारी १२ वाजता जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांना निवेदन दिले जाणार आहे. टोलसाठी पोलिसांनी संरक्षण देऊ नये, अशी मागणी याद्वारे केली जाणार असल्याचे साखळकर यांनी सांगितले. संघर्षाची चिन्हे एकीकडे कंपनीने न्यायालयीन निर्णयानुसार टोलवसुली सुरू करण्याची तयारी केली आहे, तर दुसरीकडे टोलविरोधी सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलनाची तयारी केली आहे. शासनस्तरावर न्यायालयीन लढाईच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या सर्व घडामोडींमुळे संघर्षाची चिन्हे दिसू लागली आहेत. अधिकाराचा मुद्दा निविदामधील कलम ३.७.११ नुसार प्रकल्पाच्या निविदेसोबत उद्योजकांकडून मिळालेल्या व अंतिमरीत्या मंजूर करण्यात आलेला रोकड प्रवाह गणिती तक्त्यात नमूद व्याजदर रिझर्व्ह बॅँकेच्या प्राईम लेंडिंग दरानुसार बदलण्याचा व त्यानुसार प्रकल्प सवलत कालावधीत सुधारणेचा अधिकार प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यास देण्यात आला आहे. या नियमाचा उल्लेख न्यायालयीन लढाईत संबंधित शासकीय अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे केला नसल्याची तक्रार कृती समिती करीत आहे. नव्याने दाखल होणाऱ्या याचिकेत हा मुद्दा प्रकर्षाने मांडावा, अशी मागणी करण्यात आली आहे.