पलूस : राजकीय जीवनात वसंतराव पुदाले दादांची साथ अतिशय मोलाची ठरली. त्यांचा स्वभाव अतिशय विनम्र, सोशिक असून त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन लोकांची कामे केली आहेत. निष्पक्षपातीपणे जनतेची सेवा केली आहे. आगामी पलूस नगरपरिषदही मोठ्या फरकाने जिंकायची आहे. त्यासाठी दादांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार असून आतापासूनच कामाला लागा, असे आवाहन माजी वनमंत्री आ. डॉ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी येथे केले.जिल्हा परिषद व पलूस पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांचे स्नेहसंमेलन व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंतराव पुदाले यांना मानपत्र प्रदान सोहळा अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. बाबूराव गुरव होते. सभापती विजय कांबळे यांनी स्वागत केले. यावेळी महेंद्र लाड, खाशाबा दळवी, गणपतराव पुदाले, आनंदराव मोहिते, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी रमेश जोशी प्रमुख उपस्थित होते. माजी सभापती मुक्ता दिवटे यांनी मानपत्राचे वाचन केले. पुदाले यांच्या राजकीय वाटचालीचा आढावा घेतला. डॉ. कदम यांच्याहस्ते साहित्यरत्न पुरस्कार सुभाष कवडे, ज्ञानेश्वर कोळी, तर उद्योगरत्न पुरस्कार संभाजीराव येसुगडे, कृषिरत्न प्रल्हाद सितापे, विनय निकम, संदीप पाटील, विष्णू चौगुले यांना, तर समाजभूषण चंद्रकांत कापसे व डॉ. प्रतापराव कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात बाबूराव गुरव म्हणाले की, पलूस तालुका सध्या महाराष्ट्रात प्रथम क्रमांकाचा तालुका आहे. कारण या ठिकाणी प्रशासनात गतिमानता, नियोजन आहे. यावेळी ए. डी. पाटील, सतीश पाटील, निशाताई पाटील, पांडुरंग सूर्यवंशी, विक्रम पाटील, अनिल शिंदे, पलूस सहकारी बँकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, विविध संस्थांचे अधिकारी, सरपंच, उपसरपंच सदस्य उपस्थित होते. विजय कांबळे, उपसभापती रंजना पवार, सुहास पुदाले, यास्मिन पिरजादे, गटशिक्षणाधिकारी बी. एन. जगदाळे, नंदकुमार चव्हाण, डॉ. रागिणी पवार, एम. व्ही. गायकवाड, प्रकाश पाटील, राहुल रोकडे यांनी संयोजन केले. सुहास पुदाले यांनी आभार मानले, विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. दुपारच्या वेळेत शिक्षकांचा विविध गुणदर्शनपर कार्यक्रम झाला. यावेळी श्वेता बिरनाळे, रावसाहेब वाकळे, विकास गावडे उपस्थित होते. (वार्ताहर)
पलूस नगरपरिषदेसाठी आता कामाला लागा
By admin | Updated: February 15, 2015 23:53 IST