शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

पोषण आहारातून तूरडाळ गायब

By admin | Updated: November 9, 2015 23:28 IST

भाववाढीचा फटका : अंगणवाड्या, प्राथमिक शाळांमध्ये चवळीचा वापर

गजानन पाटील - संख वाढत्या महागाईचे चटके जत तालुक्यातील शाळकरी मुलांनाही जाणवू लागले आहेत. तूरडाळीचे दर गगनाला भिडले असल्याने शालेय पोषण आहारातून तूरडाळीचे वरण गायब झाले आहे. तूरडाळीऐवजी चवळीचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. तांदूळ व धान्य पुरवठादाराने चवळी पुरवण्यास सुरुवात केली आहे. सध्या बेचव चवळीचे वरण, आमटी खाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.केंद्र शासन व राज्य शासनाकडून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत १ ली ते ५ वी पर्यंतच्या प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ४५० उष्मांक व १२ ग्रॅम प्राथिनेयुक्त व ६ वी ते ८ वीपर्यंतच्या उच्च प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी ७०० उष्मांक आणि २० ग्रॅम प्रथिनेयुक्त आहार देण्यात येतो. या योजनेत केंद्र शासनाकडून प्रतिदिन प्रतिविद्यार्थी प्राथमिक वर्गासाठी १०० ग्रॅम आणि उच्च प्राथमिक वर्गासाठी १५० ग्रॅम तांदूळ पुरविण्यात येतो.अन्न शिजविण्यासाठी दरदिवशी प्रतिलाभार्थी ३.५९ पैसे आणि ५.३८ रुपये खर्च दिला जात होता. आता त्यात केंद्र सरकारने ५ टक्के दरवाढही केली आहे. ग्रामीण भागातील शाळास्तरावर शालेय पोषण आहार योजनेंतर्गत पाककृतीच्या अंमलबजावणीत २०११ च्या शासन निर्णयानुसार तुरडाळीचा समावेश करण्यात आला होता. पण पुरवठादाराने दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बाजारात तुरडाळीचा दर्जा चांगला नसल्याचे कारण समोर करुन तूरडाळीऐवजी मुगाच्या डाळीचा पाककृतीत समावेश करण्यास सांगितले.धान्याच्या पुरवठ्याची जबाबदारी जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांकडे आहे. त्यांनी जिल्हा परिषदेला पत्र पाठवून मंजुरी मागितली होती. जिल्हा परिषदेने त्यासाठी नुकतीच मान्यता प्रदान केली आहे. सध्या तूरडाळीचा दर गगनाला भिडला आहे. बाजारात २२० रुपयेपर्यंत दर वाढला आहे.कमी पटसंख्या असलेल्या शाळा व विशेषत: दुर्गम भागातील शाळा मुलांना खाण्यासाठी लागणारा मसाले भात शाळेतच शिजवतात. गावातील महिला बचत गट किंवा संस्थांकडूनच भात शिजवून घेतला जातो. कंत्राटदारांकडून शाळेतील पटसंख्येच्या प्रमाणात तांदूळ, तेल, डाळ, मीठ, मिरचीसह आवश्यक तो माल महिन्या-महिन्याला पोहोच केला जातो. बाजारात दर वाढला म्हणून शालेय पोषण आहारातून तूरडाळ हद्दपार झाली आहे. मुलांना तूरडाळ वरण मिळणार नाही. मुले भात खाणार नाहीत. शासनाने पूर्वीप्रमाणे तूरडाळच पुरवावी. - विलास शिंदे, पालकशिक्षकही वैतागलेमुलांना तूरडाळीऐवजी चवळीची भाजी मिळणार आहे.पोषण आहारात विविधता असावी, अशी अपेक्षा असताना एकीकडे खिचडी खाऊन कंटाळलेले विद्यार्थी आणि दुसरीकडे शिकविण्यासोबत आहाराकडे लक्ष देण्याच्या कामामुळे वैतागलेले आहेत.महागाई : चवळीच्या वरणाला चवच नाहीतूरडाळ व चवळी डाळ या दोन्ही डाळींच्या प्रथिनमूल्यांमध्ये फरक नसला तरी, चवीत फरक आहे. तूरडाळीचे वरण चवीला चविष्ट आहे, तर चवळीच्या डाळीचे वरण, आमटी सपक आहे. अशा परिस्थितीत तूरडाळ चांगली, पण महागडी म्हणून चवळी वापरण्याचा ठेकेदाराचा हट्ट बालकांना पचणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तूरडाळ१८०रूपये किलोगेल्या काही दिवसात दरामध्ये काहीशी घसरण झाली असली तरी, अजूनही १६० ते १८० रुपये किलो दराने तूरडाळीची विक्री होत आहे. संबंधित पुरवठादाराने बाजारात चांगल्या दर्जाची तुरडाळ उपलब्ध नसल्याचे कारण सांगितले असले तरी, सणासुदीच्या काळात महागलेली तूरडाळ पुरविणे शक्य होणार नाही. हे ओळखून चवळीचा पर्याय स्वीकारल्याचे दिसत आहे.