शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

शासकीय वसतिगृह नव्हे, छळछावणीच!

By admin | Updated: November 28, 2014 23:47 IST

आटपाडीतील स्थिती : विद्यार्थी, पालकांत संताप

अविनाश बाड - आटपाडी तालुक्यात सध्या कुठेही पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकर सुरू नसला तरी चार वर्षांपासून येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय मुला-मुलींच्या वसतिगृहात आठवड्यातून दोन वसतिगृहांसाठी एक टॅँकर मागविला जातो. वसतिगृहातील मुले-मुली पाण्यासाठी वसतिगृहाबाहेर भटकंती करत आहेत. गेले वर्षभर मुलांच्या ताटात भाजी दिलेली नाही. गावापासून तीन-चार कि. मी. दूर अंतरावर समाजकल्याण विभागाने तब्बल साडेसात कोटी रुपये खर्चून जणू वसतिगृहे नव्हे, तर छळछावण्याच बनविल्या आहेत.माणगंगा साखर कारखान्याजवळ कौठुळी फाट्यावर समाजकल्याण विभागाने मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र दोन वसतिगृहांच्या आणि मुलींसाठी स्वतंत्र दोन वसतिगृहांच्या इमारती बांधल्या आहेत. वास्तविक तिथून फक्त जवळ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहे. सगळी शाळा-महाविद्यालये आटपाडीत आहेत. मुलांच्या वसतिगृहाची क्षमता ८४ एवढी, तर मुलींसाठी ६४ मुली राहतील एवढी आहे. आता प्रत्यक्षात वसतिगृहात ६४ मुले, तर ५० मुली राहात आहेत. मात्र, मुलांच्या आणि मुलींच्या वसतिगृहाच्या इमारतीमध्ये भिंत बांधलेली नाही. इमारती जवळ-जवळ आहेत. आठवी ते पदवीपर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी येथे राहात आहेत. संरक्षक भिंत नसल्याचा गैरफायदा काही टारगट मुले घेत असल्याची तक्रार आहे.दोन वर्षांपूर्वी मुलींच्या वसतिगृहातील अधीक्षकाने ‘प्रताप’ केल्याने एका मुलीच्या नातेवाईकांनी त्याला प्रसाद दिला होता. तक्रारीनंतर मुलींच्या वसतिगृहात महिला अधीक्षिकेची नेमणूक करण्यात आली होती. मार्च महिन्यापासून एस. एस. थोरात हे एकच अधीक्षक दोन्हीही वसतिगृहांचा भार (?) सांभाळत आहेत. ते दोन्हीही वसतिगृहात अनेक दिवस हजरच नसतात.पाण्याअभावी इथे स्वच्छतेचाही अभाव आहे. आठ दिवसांतून एकदा टॅँकर मागविला जातो. एक टॅँकर दोन वसतिगृहातील खाली उघड्यावर ठेवलेल्या टाक्यात सोडला जातो. तेच अंघोळीचे पाणी आणि पिण्याचेही पाणी. मुलांच्या अनेक तक्रारी आहेत. पण समाजकल्याण विभागाचे वरिष्ठ निरीक्षक कधी तपासणी करायला गेलेच नाहीत. मुलांच्या आणि मुलींच्याही वसतिगृहातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडले आहेत. स्वयंपाक करणारे काही कर्मचारी व्यसनी आहेत.अशा समस्यांच्या गर्तेत राहून मुले-मुली स्वत:चे करिअर घडविणार? हा प्रश्न आहे. शाळा-महाविद्यालयांपासून वसतिगृहापर्यंत तीन-चार कि. मी. रस्त्याने उन्हातान्हात पायपीट करून वसतिगृहात गेल्यावरही मुला-मुलींना अत्यंत कटू अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. गुंडालाच दिलाय जेवणाचा ठेका! गेले वर्षभर मुलांना नियमानुसर जे तिथे फलकावर लिहिले आहे, त्याप्रमाणे जेवण दिले नाही. गेल्या १५ दिवसांपूर्वी जेवणाचा ठेकेदार बदलला आहे. मुंबईच्या एका कंपनीने ठेका घेतला असून आटपाडीच्या वसतिगृहाचा ठेका सांगलीतील एका गुंडाला दिल्याचे तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे फळे नासलेली आणि कुजक्या भाज्या पुरवल्या जात असल्या तरी, विद्यार्थ्यांना मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे.