शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

कऱ्हाडात नऊशे जणांच्या कमरेला पिस्तूल!

By admin | Updated: August 18, 2015 00:50 IST

उपविभागातील धक्कादायक वास्तव : स्वसंरक्षणासाठी घेतलाय अनेकांनी परवाना; राजकीय नेते, बिल्डरांचा समावेश; दोनशे शेतकरीही बंदूकधारी

संजय पाटील, कऱ्हाड : कऱ्हाड हा संवेदनशील उपविभाग. येथे अनेक गुन्हेगारी कारवाया घडतात. या गुन्हेगारी वृत्तींचा सामना अनेकवेळा सामान्यांनाही करावा लागतो. हे करीत असताना स्वत:जवळ शस्त्र बाळगण्याची वेळही अनेकांवर येते. सध्या कायदेशीर सोपस्कार पार पाडून तब्बल ८७० जणांनी आपल्या कमरेला पिस्तूल अडकवलंय. एकट्या कऱ्हाड उपविभागात ही धक्कादायक परिस्थिती आहे. पैसा, मालमत्ता, पूर्ववैमनस्य किंंवा संघर्षाच्या माध्यमातून अनेकवेळा काहीजणांवर जीवघेणा प्रसंग येतो. संबंधित व्यक्तीभोवती गुन्हेगारी कारवायांचा फास आवळला जातो. गुन्हेगारी वृत्ती पैसा, मालमत्ता किंवा संघर्षाच्या कारणावरून संबंधित व्यक्तीच्या जिवावरही उठतात. त्यामुळे या गुन्हेगारी कारवायांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी काहीवर शस्त्र बाळगण्याची वेळ येते. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व परिस्थितीची पडताळणी केल्यानंतर प्रशासनाकडून अशा अर्जदारांना शस्त्र बाळगण्याचा रितसर परवाना दिला जातो; मात्र असा परवाना देतानाही प्रशासनाकडून संबंधित व्यक्तीची सखोल चौकशी होते. त्याने ज्या कारणास्तव शस्त्राच्या परवान्याची मागणी केली आहे, त्या कारणाचीही खातरजमा केली जाते. तसेच त्या व्यक्तीची कौटुंबिक पार्श्वभूमी, उत्पन्न, एकूण मालमत्ता, दैनंदिन उलाढाल, आयकर दाता याचीही चौकशी होते. सध्या परवान्याची ही कार्यवाही आणखी कडक करण्यात आली आहे. कऱ्हाड उपविभागाचा विचार करता येथे कायदेशिररीत्या स्वत:सोबत शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या तब्बल ८७० आहे. त्यामध्ये राजकीय नेत्यांसह, बिल्डर, उद्योजकांचा जास्त समावेश आहे. संबंधितांनी सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडून शस्त्र स्वत:सोबत ठेवण्याचा परवाना घेतला आहे. शस्त्र बाळगणाऱ्यांची ही संख्या आश्चर्यकारक नसली तरी धक्कादायक निश्चितच आहे. मुळातच गत काही महिन्यांपासून कऱ्हाड शहरासह परिसरातील गुन्हेगारी कारवाया प्रचंड वाढल्या आहेत. खून, मारामारी यासारख्या घटनांनी कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. अशातच ८७० जणांमध्ये विविध कारणास्तव असुरक्षिततेची भावना असेल तर ते धक्कादायकच म्हणावे लागेल. दोनशे शेतकऱ्यांकडे बंदूक वन्य श्वापद किंवा रानटी प्राण्यांपासून पिकाचे नुकसान होत असेल तर शेती संरक्षणासाठी म्हणून प्रशासनाकडून शेतकऱ्यांना शस्त्र बाळगण्याचा परवाना दिला जातो. या परवान्यावर शेतकरी सिंंगल किंवा डबल बारची बंदूक वापरू शकतात. कऱ्हाड उपविभागात बंदूक बाळगणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २०९ आहे. वनविभागाचा अहवाल महत्त्वाचा शेती संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याचा परवाना देताना वनविभागाने दिलेला अहवाल महत्त्वाचा ठरतो. परवान्यासाठी शेतकऱ्याला प्रांत कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा लागतो. त्यानंतर प्रांताधिकारी हा अर्ज पडताळणीसाठी संबंधित विभागातील तलाठ्याकडे पाठवितात. त्या शेतकऱ्याच्या शेतीचे वन्य पशुकडून नुकसान होत असल्याबाबत तलाठी व वनविभागाने अहवाल दिल्यास इतर आवश्यक पडताळणीनंतर संबंधित शेतकऱ्याला शस्त्र बाळगण्याचा परवाना दिला जातो. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कार्यवाही स्वसंरक्षणार्थ शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळविण्यासाठी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करावा लागतो. अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रांची खातरजमा केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हा प्रस्ताव पडताळणीसाठी संबंधित उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात येतो. पोलिसांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर तो पोलीस अधीक्षकांकडे व तेथून जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येतो. या प्रक्रियेनंतरच संबंधिताला शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळतो. परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण स्वसंरक्षण किंवा शेती संरक्षणासाठी शस्त्र बाळगण्याच्या घेतलेल्या परवान्याचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. नूतनीकरण न केल्यास संबंधितावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. तसेच शस्त्राचा गैरवापर केल्यास संबंधित परवाना रद्द अथवा काही कालावधीसाठी निलंबितही केला जातो.