शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

जैवविविधता कायम राखून विकास साधावा

By admin | Updated: July 28, 2016 01:17 IST

कस्तुरीरंगन यांचे आवाहन : लोकांशी संवाद साधून सरकारने अहवालाबाबत निर्णय घ्यावा

कोल्हापूर : पश्चिम घाटातील जैवविविधतेला धक्का न लावता, ती कायम राखत याठिकाणी सेवा-सुविधांचे जाळे आणि विकास साधण्यास हरकत नाही. या घाटात जे वास्तव दिसले ते अहवालातून मांडले असून तो समतोल आहे. या अहवालाच्या अंमलबजावणीचा निर्णय सरकारने लोकांशी संवाद साधून घ्यावा, असे आवाहन भारतीय अवकाश संशोधन केंद्राचे (इस्रो) माजी अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन यांनी बुधवारी येथे केले.अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था (आयएसटीई) व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय व्याख्यानमालेच्या प्रारंभानिमित्त डॉ. कस्तुरीरंगन कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डॉ. कस्तुरीरंगन म्हणाले, पश्चिम घाटात सहा राज्यांतील सुमारे पाच कोटी लोक राहतात. त्यांचा उदरनिर्वाह या घाटातील जैवविविधतेवर अवलंबून आहे. त्यामुळे जैवविविधतेच्या सुरक्षेचे कारण सांगून त्यांच्यावर गंडांतर आणता येणार नाही. सरकारने येथील जैवविविधतेच्या सुरक्षेसाठी संबंधित लोकांना साक्षर केले पाहिजे. त्यांना अपारंपरिक ऊर्जास्रोतांच्या वापरासाठी प्रवृत्त केले पाहिजे. पर्यावरणाला बाधा पोहोचणार नाही, अशा स्वरूपातील रोजगारनिर्मिती करण्यावर भर देणे आवश्यक आहे. विविध घटक, बाबींचा अभ्यास करून पश्चिम घाटाबाबतचा समतोल अहवाल तयार केला. यासाठी तज्ज्ञांची मदत, नवतंत्रज्ञानाचा वापर आणि स्थानिक लोकांशी संवाददेखील साधला. संबंधित अहवाल सरकारला सादर केला. मार्गदर्शक सूचनांसह त्याची अंमलबजावणी करण्याचे काम सरकारचे आहे. सरकारने लोकांशी संवाद साधून याबाबतचा निर्णय घ्यावा. अवकाश संशोधनाबाबतच्या केंद्र सरकारच्या भूमिकेबद्दल त्यांनी सांगितले की, अवकाश संशोधनाला सरकारचा पाठिंबा आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मंगळयानाच्या प्रक्षेपणानंतर पंतप्रधान स्वत: अवकाश संशोधन केंद्रात आले आणि त्यांनी मी तुमच्या पाठीशी असल्याचे संशोधकांना सांगितले. सरकारने बहुतांश मंत्र्यांना अवकाश संशोधन केंद्राला आवश्यक ती सर्व मदत करण्याची सूचना केली आहे. विद्यापीठाच्या पातळीवर नवनवीन आणि समाजोपयोगी संशोधन करण्यावर भर देण्यात यावा. या पत्रकार परिषदेस ‘आयएसटीई’चे अध्यक्ष प्रतापसिंह देसाई, विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे, तंत्रज्ञान विभागाचे संचालक जयदीप बागी, व्ही. डी. वैद्य, प्राचार्य महादेव नरके, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)एपीजे अब्दुल कलाम यांनी ऊर्जा दिलीडॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना देश महासत्ता व्हावा असे वाटत होते. त्याचे विवेचन त्यांनी उत्तमरीत्या करून ठेवले असल्याचे डॉ. कस्तुरीरंगन यांनी सांगितले. ते म्हणाले, यासाठी प्रारंभी त्यांनी सन २०२० मध्ये देश महासत्ता होणार, या घोषणेद्वारे युवापिढीला ऊर्जा दिली. महासत्ता होण्यासाठी बारावीपर्यंत अद्ययावत व कौशल्यपूर्ण शिक्षण मिळावे. यात भाषा, प्रांत, संस्कृती अडथळा ठरू नये अशी त्यांची इच्छा होती. विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीदेखील ज्ञानाने अद्ययावत राहावे. त्यातून त्यांनी विद्यार्थ्यांना घडवावे. आरोग्य, पर्यावरण क्षेत्रांसह राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यात विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर त्यांचा भर होता. कृषी व जलसंधारणात देश महासत्ता बनावा, अशी त्यांची इच्छा होती.