शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 00:36 IST

श्रीनिवास नागे । लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : ‘एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ ही त्यांची टॅगलाईन, तर ‘७५ ...

श्रीनिवास नागे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : ‘एकमेका साहाय्य करू, अवघे होऊ श्रीमंत’ ही त्यांची टॅगलाईन, तर ‘७५ हजार गुंतवा आणि एका वर्षात पावणेतीन लाख कमवा’, ही कॅचलाईन! त्यात राजकीय धेंडांसोबतची ऊठबस. मग ‘हुरळली मेंढी, लागली लांडग्याच्या मागं’ अशी सगळ्या गुंतवणूकदारांची गत झाली. बघता-बघता कडकनाथ कोंबडीपालनात ‘रयत अ‍ॅग्रो’चा बोलबाला झाला. मग ती ‘महारयत अ‍ॅग्रो’ झाली. आठ ते दहा हजारजणांनी गुंतवणूक केली आणि तिथंच फसगत झाली. वर्ष-सहा महिन्यातच अंडी-कोंबड्यांचा उठाव थांबला. अर्थचक्रालाच खीळ बसली... त्यातून समोर आली पाचशे कोटीची फसवणूक!सध्या बहुचर्चित बनलेल्या या फसवणूक प्रकरणाची व्याप्ती महाराष्टÑ-कर्नाटकपुरती मर्यादित नसून गुजरात, तेलंगणा, छत्तीसगडपर्यंत पोहोचली आहे. कडकनाथ जातीच्या कोंबडीचा भुलभुलैय्या आणि दक्षिण महाराष्टÑातील ‘रयत’ या नावाची चलती वापरून घेत ‘रयत अ‍ॅग्रो’ या कंपनीच्या महाठग संचालकांनी लोकांना फशी पाडले. त्यासाठी ‘७५ हजार गुंतवा आणि एका वर्षात पावणेतीन लाख कमवा’, ही वरवर साधीसोपी वाटणारी योजना राबवली.सुरुवातीला केवळ ७५ हजार रुपये गुंतवायचे. तेही दोन टप्प्यात. ४० हजार रुपये बुकिंग करताना, तर उरलेले ३५ हजार रुपये तीन महिन्यांनंतर. त्याबदल्यात कडकनाथ जातीचे २०० पक्षी, खाद्य, औषधे, खाद्याची भांडी मिळायची. गुंतवणूकदाराने स्वत:च्या शेडमध्ये ही पिले सांभाळायला सुरुवात केल्यानंतर तीन महिन्यांनी कंपनी त्यातल्या ८० कोंबड्या घेत असे. त्यावेळी गुंतवणूकदाराकडे १०० मादी व २० नर शिल्लक ठेवण्यात येत. चार महिन्यांपासून या कोंबड्या अंडी देऊ लागल्यानंतर पुढील सहा महिने कंपनी सुरुवातीची २००० अंडी सरासरी ५० रुपये, नंतरची २००० अंडी ३० रुपये, तर अखेरची ३५०० अंडी २० रुपये दराने खरेदी करत असे. त्यातून गुंतवणूकदाराला दोन लाख तीस हजार रुपये मिळत. दहाव्या महिन्यांपर्यंत टिकलेल्या कोंबड्या ३७५ रुपये दराने खरेदी करण्याची हमी देण्यात आली होती. त्यातून सुमारे ४५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळत असे. असे अवघ्या दहा महिन्यांत २ लाख ७५ हजार रुपये मिळवण्याचे आमिष दाखवण्यात आले.‘रयतअ‍ॅग्रो’च्या संचालकांची राजकीय धेंडांसोबतची ऊठबस कामी आली. ‘बॅकिंग’ मिळालं. मग कंपनीचे मुख्य कार्यालय सांगली जिल्ह्णातल्या इस्लामपूरमध्ये थाटले गेले. तेथेच व्यवहार आणि करार व्हायचे. हळूहळू कंपनीची १५ कार्यालये झाली. इस्लामपूर-कोल्हापूरपासून पार नागपूर-औरंगाबाद-पुणे-बेळगावपर्यंत. गावखेड्यापासून मोठ्या शहरांपर्यंतच्या हॉटेल्स, ढाब्यांवर ‘कडकनाथ’ कोंबड्यांना खवैय्यांची मोठी पसंती असल्याची पुस्ती जोडली गेली. काहींनी शेतीला जोडधंदा म्हणून, काहींनी पूर्णवेळचा धंदा म्हणून, तर काहींनी आयुष्याची पुंजी एकत्र करून पैसे गुंतवले. शेड उभी केली...वर्षभरापूर्वी आणल्या गेलेल्या या योजनेतून सुरुवातीच्या काळात काही जणांना अंडी-पक्षी खरेदीतून कंपनीने परतावा दिला. ज्यांनी कमवले, तेच कंपनीचे स्टार प्रचारक झाले. त्यातल्या काहींना तर एजंट म्हणून नेमण्यात आले. त्यांनी ‘माऊथ पब्लिसिटी’ केली. गुंतवणूकदार वाढले... आणि त्यानंतर कंपनीचे सगळेच व्यवहार लांबू लागले. गेल्या चार महिन्यांत तर ते थांबलेच. कारण अंडी-पक्ष्यांचे उत्पादन अमाप आणि उठाव कमी!डिसेंबरपासून घरघरकंपनीने सुरुवातीला पक्षी आणि खाद्य व्यवस्थित पुरविले. अंड्यांचे पैसे वेळेवर दिले. मुदतीनंतर पक्षी उचलले. ते पाहून बुकिंग वाढले. परंतु फेब्रुवारीपासून ‘कडकनाथ’ला घरघर लागली. कंपनीने खाद्यामध्ये अनियमितता आणली. अंडी नेली, पण त्याचे पैसे दिले नाहीत. गुंतवणूकदारांनी दोन-तीन महिने स्वत:च्या पैशाने खाद्य घातले. सध्या कंपनीच्या सगळ्याच कार्यालयांना टाळे लागले आहे.