शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

जतच्या राजकारणाशी देणे-घेणे नाही

By admin | Updated: April 10, 2015 23:47 IST

पी. आर. पाटील : राजारामबापू साखर कारखान्याची बदनामी नको

इस्लामपूर : राजारामबापू साखर कारखान्याने राज्य बँकेकडून सिक्युरिटायझेशन अ‍ॅक्टखाली जत-तिप्पेहळ्ळी साखर कारखाना विकत घेतला आहे़. निविदा मंजूर झाल्यानंतर आम्ही मुदतीत ४७ कोटी ८६ लाख भरले़ जत तालुक्यातील उपलब्ध उसापैकी ७५ टक्के ऊस जत-तिप्पेहळ्ळी युनिटमध्ये गाळप केला आहे. अशी वस्तुस्थिती असताना जतच्या स्थानिक राजकीय वादात विनाकारण आमच्या कारखान्यास ओढण्यात आले, हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष पी़ आऱ पाटील यांनी दिली.जतचे माजी आमदार उमाजी सनमडीकर, विक्रम सावंत, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पी़ एम़ पाटील यांनी राजारामबापू कारखान्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांना प्रत्युत्तर देताना पाटील बोलत होते़ कारखान्याने साटेलोटे करून जत-तिप्पेहळ्ळी कारखाना विकत घेतला. तिसरा गळीत हंगाम सुरू असतानाही ४८ कोटीपैकी फक्त ११ कोटीच भरले आहेत़, तसेच तालुक्यातील फक्त पाच टक्केच ऊस राजारामबापू कारखान्याने गाळप केला आहे, हे सर्व आक्षेप खोटे आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.पाटील म्हणाले, जेव्हा आम्ही जत साखर कारखाना राज्य बँकेकडून विकत घेतला, तेव्हा बँकेत आणि जत कारखान्यात लोकनियुक्त संचालक मंडळ नव्हते, तर शासननियुक्त प्रशासक होते़ त्यामुळे कोणाही व्यक्तीशी साटेलोटे करण्याचा, कोणाचा आशीर्वाद असण्याचा संबंध येतो कोठे? राज्य बँकेने वर्तमानपत्रात जाहिरात देऊन निविदा मागविली होती. आम्ही ती निविदा भरली आणि आमची बोली जास्त असल्याने आम्हास कारखाना विकत दिला़ आम्ही १३ फेब्रुवारी २0१२ रोजी निविदेसोबत ४ कोटी ७८ लाख बयाणा रक्कम भरली होती़ आमची निविदा मंजूर झाल्यानंतर ४८ तासात म्हणजे १५ फेब्रुवारी २0१२ रोजी २५ टक्केतील उर्वरित रक्कम ७ कोटी १८ लाख भरले़ त्यानंतर उर्वरित ७५ टक्के रक्कम ३५ कोटी ८९ लाख ५0 हजार २१ नोव्हेंबर २0१२ रोजी भरल्याने राज्य बँकेने आम्हास २२ नोव्हेंबर २0१२ रोजी कारखान्याचा ताबा दिला़ याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, इरिगेशन कमिटीचे अध्यक्ष ए़ टी़ पाटील, कार्यकारी संचालक आऱ डी़ माहुली, शेती अधिकारी आबासाहेब पाटील उपस्थित होते़ (वार्ताहर)पुढील हंगामासाठी उसाच्या नोंदी सुरूसध्याच्या गळीत हंगामात जत तालुक्यात दीड लाख टन ऊस उपलब्ध होता़ त्यातील ७५ टक्के ऊस आम्ही जत युनिटमध्ये गाळला आहे़ पुढच्या गळीत हंगामासाठी आताच आमच्याकडे ५00 हेक्टर उसाची नोंद झाली असून अद्याप नोंदी चालू आहेत़ आम्ही आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच संस्था राजकारणविरहित चालवत आहोत़ आमचा जतच्या स्थानिक राजकारणात संबंध नाही. जतच्या नेत्यांनी एकमेकावर आरोप-प्रत्यारोप करताना तालुक्याच्या विकासाचे केंद्रबिंदू असलेल्या संस्थांना त्यात ओढू नये, असा सल्लाही यावेळी पाटील यांनी दिला़