शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
2
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
3
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
4
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
6
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
7
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
9
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
10
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
11
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
12
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
13
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
14
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
15
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
16
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
17
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
18
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
19
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
20
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार

नरवाड-बेडगच्या धडक योजनेला घरघर

By admin | Updated: February 21, 2015 00:16 IST

पाणीपट्टी आवाक्याबाहेर : एकेकाळी शेतीला संजीवनी ठरलेल्या योजना आज ‘कोमात’

दिलीप कुंभार- नरवाड मिरज तालुक्यातील नरवाड आणि बेडगच्या पाणीपुरवठा धडक योजनेला घरघर लागल्याने लाभार्थ्यांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.गेल्या ३० ते ४० वर्षांपूर्वी नरवाड आणि बेडगच्या शेती क्षेत्राला पाणी देण्यासाठी आबासाहेब शिंदे (म्हैसाळकर) यांच्या पुढाकाराने धडक योजना सफल झाली. दुष्काळाने होरपळलेल्या बेडग आणि नरवाडला धडक योजना संजीवनी ठरली. कालांतराने हीच धडक योजना शासनाने वसंतदादा साखर कारखान्याकडे वर्ग केली. धडक योजनेमुळे नरवाड आणि बेडगची शेती सुजलाम् सुफलाम् झाली. साखर कारखान्यावेळी ही योजना नेटाने राबविली, मात्र म्हैसाळ प्रकल्पाच्या वेळोवेळी झालेल्या आवर्तनामुळे धडक योजनेकडील नोंदी वेगाने कमी होत गेल्या. शेतीला पाणी देण्याचे क्षेत्र (नोंदी) कमी होत गेल्याने पाणीपट्टी आवाक्याबाहेर गेली. शेतीतून मिळणारे उत्पन्न आणि पाणीपट्टी याचा ताळमेळ बसविताना शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले.परिणामी याचा फटका शेतीस पाणीपुरवठा करणाऱ्या धडक योजनेला पूर्णपणे बसल्याने गेल्या ४० वर्षांपासून म्हैसाळला कृष्णा नदीतून नरवाड ते बेडगपर्यंतच्या सिमेंट पाईप्स जीर्ण होऊन गळतीचे प्रमाण अधिक झाले.सद्यस्थितीत संबंधित धडक योजनेवरील सर्व साहित्य गंजले असून, पाणी बंदमुळे पोटलाईन टाकण्यासाठी वापरण्यात आलेल्या सिमेंट पाईप गायब होत आहेत. धडक योजनाच बंद पडल्याने योजनेवर कारखान्याने कोणतीही सुरक्षिततेची उपाययोजना केली नसल्याने या योजनेचे बारा वाजले आहेत. २० जानेवारी २०१३ ला विद्युत वितरण कंपनीने थकित वीज बिलामुळे धडक योजनेचा वीजपुरवठा तोडला आहे. यामुळे म्हैसाळ प्रकल्पाचे खंडित झालेले आवर्तन आणि बंद पडलेली धडक योजना या दोन्ही कचाट्यात शेतकरी अडकला आहे. अशीच स्थिती कायम राहिल्यास शेतकऱ्यांची पिके वाळून जाणार आहेत. लाभार्थी संख्या घटलीनरवाड धडक योजनानरवाड धडक योजना १२ जुलै १९८५ ला राज्य सरकारकडून सांगलीच्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याकडे वर्ग करण्यात आली. यावेळी १५० शेतकरी या योजनेचे सभासद होते, तर ३८५ एकरहून अधिक क्षेत्र ओलीताखाली आले होते, तर २०१३ अखेर केवळ २० शेतकरी लाभार्थी राहिले असून योजनेकडे केवळ ४० एकर क्षेत्राची नोंद राहिली आहे. बेडग धडक योजनाबेडग धडक योजनेकडे १९८५ मध्ये १४० सभासद होते, तर ४०० एकर क्षेत्र ओलिताखाली आले होते, मात्र २०१३ मध्ये केवळ १५ लाभार्थी उरले असून केवळ ३५ एकर जमिनीची नोंद उरली आहे. ‘म्हैसाळ’ योजनेचे पाणी मिळू लागल्यानंतर जादा पाणीपट्टीमुळे शेतकऱ्यांनी धडक योजनेकडे पाठ फिरवली आहे. परिणामी योजनाच अडचणीत आली आहे.