शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
4
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
5
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
6
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
7
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
8
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
9
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
10
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
11
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
12
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
13
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
14
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
15
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
16
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
17
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
18
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
19
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
20
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत

माजी संचालकांचा जीव टांगणीला

By admin | Updated: April 10, 2015 23:46 IST

जिल्हा बँक निवडणूक : अपात्रतेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी; जिल्ह्याचे लक्ष

सांगली : जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २३ माजी संचालकांचा जीव सोमवारपर्यंत टांगणीला लागला आहे. मुंबई उच्च न्यायालयात शुक्रवारी होणारी सुनावणी लांबणीवर गेली आहे. त्यामुळे दिग्गज नेते गॅसवर असून सोमवारी न्यायालय काय निर्णय देते, याकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे. जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी ४८२ अर्ज दाखल झाले होते. गुरुवारी अर्जांची छाननी करताना चौकशी शुल्काची जबाबदारी निश्चित केलेल्या २३ माजी संचालक व एका मृत संचालकाचे वारस अशा २४ जणांंचे अर्ज बाद ठरले. सहकार विभागाने केलेल्या लेखापरीक्षणात ४ कोटी १८ लाखांचा गैरव्यवहार स्पष्ट झाला आहे. या प्रकरणाची चौकशी शुल्काची जबाबदारी तत्कालीन ४० माजी संचालकांवर निश्चित करण्यात आली आहे. सहकार विभागाने हा निर्णय गत आठवड्यात घेतला होता. या निर्णयामुळे माजी संचालकांना जिल्हा बॅँकेची निवडणूक लढविणे मुश्किल झाले आहे. १७ माजी संचालकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणीची तारीख होती. त्यामुळे ११ वाजता होणारी छाननी ३ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली होती. मात्र सुनावणी एक दिवस लांबणीवर गेल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रितसर छाननी प्रक्रिया पार पाडून २३ माजी संचालकांना अपात्रतेचा धक्का दिला होता. उच्च न्यायालयात शुक्रवारी सकाळी अकरा वाजता सुनावणी होणार होती. पण सरकारी वकील उपस्थित न झाल्याने दुपारी सव्वातीन वाजता सुनावणी ठेवण्यात आली. सरकारी वकिलांनी जिल्हा बँकेच्या चौकशी शुल्क जबाबदारीला स्थगिती देण्याचा दावा द्विसदस्यीस न्यायपीठासमोर चालविता येणार नाही, एकसदस्यीय न्यायपीठासमोर सुनावणी व्हावी, त्यासाठी ही याचिका एकसदस्यीय खंडपीठाकडे वर्ग करावी, असे मत मांडले. त्यामुळे संचालकांच्या याचिकेवरील सुनावणी सोमवारपर्यंत लांबणीवर गेली आहे.दरम्यान, दुसऱ्या फळतील इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या नेत्यांचे अर्ज अवैध झाले तरच दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना संधी मिळणार आहे. यामुळे अनेक इच्छुकांनी नेत्यांचे अर्ज बाद व्हावेत, अशीच प्रार्थना केली आहे. (प्रतिनिधी)सहकार आयुक्तांकडे सोमवारी अपीलनिवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी महाराष्ट्र सहकार अधिनियम १९७३ क (अ) ३ नुसार सहकारी संस्थांतील संचालकांवर खर्चाची जबाबदारी निश्चित झाली असेल, तर त्यांना निवडणुकीसाठी अपात्र ठरवावे, या कायद्याच्या आधारे २३ संचालक व एक वारस अशा २४ जणांचे अर्ज अवैध ठरविले होते. कोल्हापूर विभागीय सहनिबंधक राजेंद्रकुमार दराडे यांनी या संचालकांवर चौकशी शुल्काची जबाबदारी निश्चित केली आहे. या प्रक्रियेविरोधात माजी संचालक सहकार आयुक्तांकडे सोमवारी अपील करणार आहेत. त्याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.सव्वाचार कोटीच्या नुकसानीप्रकरणी १७ ला युक्तिवादसांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील चार कोटी १८ लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी शुक्रवारी अकरा आजी-माजी अधिकाऱ्यांनी खुलासा सादर केला. बँकेच्या निर्णयप्रक्रियेशी आमचा संबंध नसल्याने आरोपमुक्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली. आतापर्यंत १५ संचालकांसह २८ जणांनी म्हणणे सादर केले असून, येत्या १७ एप्रिलपासून तोंडी युक्तिवाद सुरू होणार आहे. त्यानंतर आरोप निश्चितीची प्रक्रिया होईल, असे बँकेच्या सूत्रांनी सांगितले. जिल्हा बँकेचे २00१-0२ ते २0११-१२ या कालावधीतील बँकेच्या प्रधान कार्यालयाचे रंगकाम व दुरुस्ती, अमृतमहोत्सवी कार्यक्रमातील खर्च, नोकरभरती, बँक गॅरंटी शुल्क परत देण्याचा व्यवहार, बचत गट संघास दिलेले मानधन, निवृत्त अधिकाऱ्यांवर केलेला पगाराचा खर्च, जादा दराने केलेली सीसीटीव्ही खरेदी, एकरकमी परतफेड योजनेतील सवलत, अशा अनेक नियमबाह्य गोष्टी निदर्शनास आल्या होत्या. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० मधील कलम ८८ नुसार जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनी चार कोटी १८ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चितीसाठी चौकशी सुरू केली आहे. त्यासाठी ४० माजी संचालक व तीन तत्कालीन कार्यकारी संचालक, मृत संचालकांचे १७ वारसदार व अकरा आजी-माजी अधिकारी अशा ७१ जणांना नोटीस दिली होती. आतापर्यंत १५ संचालक, दोन माजी कार्यकारी व्यवस्थापक व अकरा आजी-माजी अधिकाऱ्यांनी म्हणणे मांडले आहे. अधिकाऱ्यांनी या गैरव्यवहारप्रकरणी हात झटकले आहेत. बँकेतील कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार आम्हाला नसल्याने या आरोपातून मुक्त करावे, असे म्हणणे कोल्हापुरे यांच्याकडे सादर केले.