शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरेंच्या दौऱ्यावेळी शिवसेनेत गटबाजीचा झेंडा

By admin | Updated: May 3, 2016 00:41 IST

दोन स्वतंत्र रॅल्या : डिजिटल फलकांवरही झाली नेत्यांची विभागणी, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम

सांगली : गटबाजीचे दीर्घकाळाचे ग्रहण घेऊन चालणाऱ्या सांगली जिल्ह्यातील शिवसेनेत उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्तही पुन्हा गटबाजी उफाळली. दोन वेगवेगळ््या रॅल्या आणि डिजिटल फलकांवरील नेत्यांच्या विभागणीने येथील गटबाजी अधोरेखित केली आहे. गटबाजीचे निशाण फडकविले जात असतानाच ठाकरेंनी भर सभेत पश्चिम महाराष्ट्रातील शिवसेनेला सातत्याने मिळत असलेल्या अपयशावर बोट ठेवले. अंतर्गत गटबाजीचा शिवसेनेचा सिलसिला जुना आहे. शिवसेनेचे पदाधिकारी बदलले, तरी गटबाजी कायम राहिली. ठाकरेंचा १ मे रोजीचा महाराष्ट्र दिनाचा दौराही या गटबाजीवर उतारा ठरू शकला नाही. दौऱ्याच्या नियोजनासाठी सांगलीच्या सर्किट हाऊसवर झालेल्या बैठकीत तात्पुरते ‘मिले सूर मेरा तुम्हारा’चे गीत गाण्यात आले. जुळलेले हे सूर ठाकरेंच्या आगमनावेळी पुन्हा बिघडले. मारुती चौकातून एक स्वतंत्र रॅली ठाकरेंच्या स्वागतासाठी निघाली. यामध्ये संभाजी पवारांचा गट सहभागी होता. दुसऱ्या गटाने थेट ठाकरेंना घेऊन त्यांची थाटात रॅली काढली. त्यावेळी शिवसेनेचा आणखी एक गट तसेच शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते दिसून आले. ठाकरेंच्या दौऱ्यानिमित्त लागलेले फलकही गटबाजीला अधोरेखित करीत होते. वसंतदादा घराण्याला टक्कर देऊन राज्याच्या राजकारणात आपला ठसा उमटविणाऱ्या माजी आमदार संभाजी पवार यांनी विधानसभेवेळी शिवसेनेत प्रवेश केला असला, तरी शिवसेनेच्या जिल्ह्यातील मुख्य प्रवाहापासून त्यांना दूरच रहावे लागले. आजही पवारांच्या गटाचे शिवसेनेतील अस्तित्व स्वतंत्र आहे. भाजपमध्ये असताना राज्यातील अनेक नेत्यांकडून त्यांच्याप्रती आदरभाव व्यक्त होत होता. शिवसेनेत ज्या अपेक्षेने त्यांचा प्रवेश झाला, त्या अपेक्षांची पूर्तता होताना दिसत नाही. म्हणूनच पवार गटातील कार्यकर्ते सध्या सेनेतील राजकारणामुळे नाराज दिसत आहेत. संपर्कप्रमुख नितीन बानुगडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची फौज मोठी असली तरी, ती पूर्ण नाही. ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमधूनही विद्यमान आमदार अनिल बाबर, माजी आमदार संभाजी पवार असे दिग्गज नेते गायब होते. (प्रतिनिधी)गटबाजीची कारणमीमांसा होणार कधी?पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेला सातत्याने मिळत असलेल्या अपयशावर ठाकरे यांनी बोट ठेवले. सांगली जिल्ह्यापुरता विचार केला, तर शिवसेनेच्या अपयशामागे गटबाजी हेसुद्धा एक प्रबळ कारण आहे. याची कारणमीमांसा होताना आणि त्यातून सुधारणा होताना दिसत नाही. त्यामुळेच अपयशाचा सिलसिला कायम आहे.