शहरं
Join us  
Trending Stories
1
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
2
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
3
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
4
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
5
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
6
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
7
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
8
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
9
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
10
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टिकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
11
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
12
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
13
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
14
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम
15
चातुर्मासातील पहिली कामिका एकादशी: श्रीविष्णूंचे ‘या’ स्वरुपात करा पूजन; पाहा, सोपा व्रतविधी
16
“शिवसेना-ठाकरे ब्रँड तुमचे राहिलेले नाही, काँग्रेस बरोबर गेलात तेव्हाच संपला”; भाजपाची टीका
17
कुत्रा चावलाच नाही, तरीही अख्ख्या गावाने घेतले रेबीजचे इंजेक्शन, छत्रपती संभाजीनगरमधील प्रकार
18
DCM एकनाथ शिंदेंचे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहिणार; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची घोषणा
19
MRI मशीनने व्यक्तीला एका झटक्यात गिळले, तडफडून मृत्यू, एक छोटीशी चूक ठरली जीवघेणी  
20
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

५९ हजार हेक्टर क्षेत्रातील पिके वाळली

By admin | Updated: September 10, 2015 00:37 IST

जिल्ह्यातील स्थिती : ७७ हजार हेक्टरवर पेरणीच नाही; खरीप हंगामाची भरपाई रब्बीत निघणार का?

सांगली : जिल्ह्यातील ३ लाख २७ हजार ५८८ हेक्टर खरीप पेरणी क्षेत्रापैकी २ लाख ५० हजार ४६४ हेक्टरवर पेरणी झाली. यापैकी ३५ हजार २५७ हेक्टरवरील पिके शंभर टक्के वाया गेली आहेत. तसेच २४ हजार ५८४ हेक्टरवरील पिकेही वाळली असल्यामुळे तीही वाया जाण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. तसा अहवालही त्यांनी तयार केला असून, शासनाकडून मात्र सांगली जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीचा कोणताही अहवाल मागविला नाही. यामुळे खरीप पिके वाया जाऊनही जिल्ह्याला शासनाकडून कोणत्याही प्रकारची भरपाई मिळण्याची शक्यता दिसत नाही. जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाचे वेळेत आगमन झाले. पण, त्यानंतर पाऊस फारसा झालाच नसल्यामुळे खरीप पिके वाया गेली. खरीप ज्वारीचे जिल्ह्यात ८७ हजार २६० हेक्टर क्षेत्र आहे. त्यापैकी ६१ हजार ६१० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. जवळपास २५ हजार ६५० हेक्टरवर पेरणीच झाली नाही. तसेच ३ हजार ३६९ हेक्टर क्षेत्रातील पिके पूर्णत: करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडले नाही. ५ हजार ८६० हेक्टर क्षेत्रातील पिकेही वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. सध्या परतीच्या मान्सूनने जिल्ह्यात हजेरी लावली असली, तरी खरीप पिके शेतकऱ्यांच्या पदरात पडणार नाहीत, हे निश्चित आहे. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यात बाजरीच्या पेरणीचे क्षेत्र जास्त आहे. या तीनही तालुक्यात मान्सूनचा पाऊसच झाला नसल्यामुळे एकूण ६४ हजार १९० हेक्टर क्षेत्रापैकी ३१ हजार ४८३ हेक्टर क्षेत्रावरच बाजरीची पेरणी झाली. ३२ हजार ७०७ हेक्टर क्षेत्रावर पेरणीच झाली नाही. पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी २० हजार ५८८ हेक्टरवरील पिके वाळून गेली आहेत. ५ हजार ३३१ हेक्टरवरील पिके वाळून जाण्याच्या मार्गावर आहेत. बाजरीच्या पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी केवळ ७ हजार हेक्टरवरीलच पिके शेतकऱ्यांच्या हाती लागणार आहेत. म्हणजेच बाजरीच्या उत्पादनात ९० टक्के घट येण्याची शक्यता आहे. ऊस, भाजीपाल्याबरोबरच जिल्ह्यातील शेतकरी मका पिकाकडे वळला आहे. म्हणूनच जिल्ह्यात मक्याचे सरासरी १८ हजार ४७० हेक्टर क्षेत्र असताना खरीप हंगामात २७ हजार ८०७ हेक्टरवर पेरणी झाली होती. यापैकी जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भागातील ४ हजार ४३० हेक्टरवरील पिके वाया गेली आहेत. तसेच ३ हजार ४५६ हेक्टर क्षेत्रातील पिके वाळण्याच्या मार्गावर आहे. तूर, उडीद, मूग, इतर कडधान्ये, भुईमूग, सोयाबीन आदी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. खरीप हंगामातील पिकांचे जवळपास ५० ते ५५ टक्के नुकसान झाले आहे. तरीही राज्य शासनाने येथील पिकांच्या नुकसानीचा अहवाल शासनाने मागविला नाही. परंतु, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पिकांच्या नुकसानीचा अहवाल तयार केला आहे. अहवाल शासनाने मागविला की लगेच त्यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. शासनाने खरीप पिकांच्या नुकसानीचा अहवालच मागविला नसेल, तर शेतकऱ्यांना मदत मिळण्याची अपेक्षाच दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही शासनाच्या मदतीपासून त्यांना वंचित राहावे लागण्याची शक्यता आहे. सरकारच्या या भूमिकेबद्दल शेतकऱ्यांतून तीव्र शब्दात नाराजी व्यक्त होत आहे. या प्रश्नावर शेतकरी संघटनाही आवाज उठवित नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडणार आहेत. (प्रतिनिधी)