शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

जि. प. समित्या निवडीत ‘भाऊसाहेब’च पडले भारी

By admin | Updated: May 1, 2016 00:26 IST

समित्यांच्या निवडी बिनविरोध : सावंत यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन

सांगली : जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य समितीवर अनेकांचा डोळा होता. परंतु, अखेरच्या क्षणी सभापती भाऊसाहेब पाटील यांनी दोन्ही समित्या मिळविण्यात यश मिळविल्यामुळे जिल्हा परिषदेत सगळीकडे ‘भाऊसाहेब’च भारी पडले, अशी चर्चा होती. बांधकाम समितीवर डोळा ठेवून बसलेले सभापती संजीवकुमार सावंत यांच्याकडे शेवटी कृषी व पशुसंवर्धन समिती राहिली आहे. उपाध्यक्ष रणजित पाटील यांना अर्थ व शिक्षण समित्या मिळाल्यामुळे ते समाधानी आहेत. या पदाधिकाऱ्यांचा अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. उपाध्यक्ष रणजित पाटील, सभापती भाऊसाहेब पाटील आणि संजीवकुमार सावंत यांच्यामध्ये बांधकाम समिती मिळविण्यासाठी धडपड सुरू होती. नेत्यांकडून दबाव टाकून समित्या फोडण्याचाही प्रयत्न झाला. परंतु, सध्याच्या समित्यांमध्ये फोडाफोड केल्यास सहा समित्या वाटपाचा गोंधळ निर्माण होणार, हे नेत्यांनाही माहीत होते. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच समित्या ठेवण्याचे निश्चित झाले. माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील (आबा) समर्थक भाऊसाहेब पाटील यांनी पूर्वीप्रमाणे बांधकाम व आरोग्य समिती मला मिळाली पाहिजे, असा दावा केला होता. त्यानुसार त्यांनी समित्या वाटपापूर्वीच बांधकाम व आरोग्य समिती सभापतींच्या दालनाचा ताबा घेतला होता. अखेर विषय समित्या वाटपासाठी शनिवारी जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा बोलाविली होती. या सभेच्या अध्यक्षस्थानी रेश्माक्का होर्तीकर होत्या. यावेळी समित्यांचे वाटप करताना अध्यक्षा होर्तीकर यांनी बांधकाम व आरोग्य या दोन समित्या सभापती भाऊसाहेब पाटील यांच्याकडे देण्यात येत असल्याचे जाहीर केले. यावेळी संजीवकुमार सावंत यांच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी दिसत होती. उपाध्यक्ष रणजित पाटील यांनी मात्र मला अर्थ समिती आणि अन्य कोणतीही समिती दिल्यास काही हरकत नसल्याचे सांगितले. यामुळे त्यांना अर्थ आणि शिक्षण समिती देण्यात आली. सावंत यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समिती देण्यात आली. सर्व सभापतींनी समितीचा कारभार लगेच सुरूही केला.