शहरं
Join us  
Trending Stories
1
धैर्य राखून वाचविले! त्या विमानाच्या दोन्ही पायलटना विमानोड्डाणास मनाई; डीजीसीएचे आदेश
2
रमेशचा २९ वेळा, तर द्रौपदीबाईंचा २८ वेळा मृत्यू! ११ कोटींचा 'स्नेक स्कॅम', इनसाइड स्टोरी ऐकून चक्रवाल! 
3
संयुक्त राष्ट्र परिषदेत पाकिस्तानला नागरिकांच्या सुरक्षेबद्दल कळवळा; भारताने उत्तर देत पाकच्या तोंडाला लावला टाळा!
4
'कान्स'च्या रेड कार्पेटवर चमकली आलिया भट, दोन्ही लूकमधून वेधलं लक्ष; चाहते म्हणाले...
5
टाटा स्टीलच्या वरिष्ठ मॅनेजरने दोन मुली, पत्नीला संपविले; एकाच खोलीत आढळले चौघांचे मृतदेह
6
अ‍ॅपल ऐकली नाही...! ट्रम्प संतापले, रातोरात २५ टक्के टेरिफ लादले; युरोपियन युनियनवर ५० टक्के...
7
पाकला ड्रोन पुरवणाऱ्या तुर्कीमधील कंपनी देते पुणे, मुंबई मेट्रो तिकिटे; अद्यापही काम सुरूच
8
आजचे राशीभविष्य २४ मे २०२५ : आजचा दिवस वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगण्याचा
9
ऑनलाइन जुगार कायदा थांबवू शकत नाही; सुप्रीम कोर्टाने व्यक्त केली हतबलता, केंद्राला विचारणा
10
परंपरा बदलली; अखेरच्या दिवशी न्या. अभय ओक यांचे तब्बल ११ खटल्यांत न्यायदान
11
माजी नगरसेवकांना देणार शिंदेसेना ‘व्हिटामिन एम’; निवडणुकीपूर्वी विकासकामांसाठी देणार निधी
12
राहुल गांधी यांचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना तीन सवाल; सरकारवर प्रश्नांचा भडिमार सुरूच
13
पाकिस्तानची गुरगुर सुरूच; तुम्ही पाणी बंद कराल, तर आम्ही तुमचा श्वास बंद करू, भारताला धमकी
14
बांगलादेश पुन्हा पेटणार?; सरकार अन् लष्करात संघर्ष, युनूस यांचा राजीनामा देण्याचा विचार
15
अमेरिकेत उत्पादन न केल्यास आयफोनवर २५ टक्के टॅरिफ! डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
16
ट्रम्प यांचे मनसुबे उधळले; हार्वर्ड प्रवेशबंदी स्थगित, भारतीय विद्यार्थ्यांना बसणार होता फटका
17
समृद्धी, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी; २४ दिवसांनी आदेश
18
गडचिरोलीतील नक्षलवादाचे लवकरच उच्चाटन; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
19
लाडक्या बहिणींसाठी आता ‘आदिवासी’ विकास विभागाचे ३३५ कोटी ७० लाख; आदेश काढला
20
उद्धवसेनेने युतीसाठी राज ठाकरे यांना प्रस्ताव पाठवावा!; आता मनसे नेत्यांचे आवाहन

रस्त्यावरील आठवडा बाजार हटविण्याचा निर्णय

By admin | Updated: April 27, 2016 00:44 IST

जिल्हाधिकाऱ्यांची महापालिकेत बैठक : प्रसंगी जमावबंदी; चौक, रस्ते रुंदीकरणावर झाडाझडती

सांगली : महापालिका हद्दीत रस्त्यावरच आठवडा बाजार भरविले जातात. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यासाठी रस्त्यावरील आठवडा बाजार स्थलांतरित करण्याचा निर्णय मंगळवारी महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. महापालिकेने पर्यायी जागेची व्यवस्था केल्यानंतर आठवडा बाजार हलविले जाणार असून, प्रसंगी बाजार परिसरात जमावबंदी आदेश लागू करण्याची तयारीही जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी दर्शविली. येत्या महिन्याभरात आठवडा बाजार हटविण्याच्या कार्यवाहीला सुरूवात होणार आहे. जिल्हाधिकारी गायकवाड यांनी मंगळवारी महापालिकेच्या रस्ता व चौक रुंदीकरण, विद्युत खांब स्थलांतरणाबाबत बैठक घेतली. या बैठकीला महापौर हारूण शिकलगार, उपमहापौर विजय घाडगे, स्थायी समिती सभापती संतोष पाटील, गटनेते किशोर जामदार, प्रभाग सभापती बाळासाहेब काकडे, सभापती मृणाल पाटील, माजी महापौर कांचन कांबळे, माजी उपमहापौर प्रशांत पाटील- मजलेकर, विष्णू माने, जिल्हा पोलिसप्रमुख सुनील फुलारी, वाहतूक शाखेचे निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांच्यासह वीज महावितरण व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. दीड महिन्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी चौक व रस्ता रुंदीकरणासह विविध विषयांवर बैठक घेतली होती. त्याचा आढावा आजच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीत रस्त्यावर भरणाऱ्या आठवडा बाजाराबाबतही चर्चा झाली. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आठवडा बाजार हलविले पाहिजेत, यावर सर्वांचेच एकमत झाले. महापौर शिकलगार यांनी, बाजार हलविताना त्यांना पर्यायी जागा द्यावी लागेल, त्यासाठी नगररचना विभागाने बाजाराच्या जवळच पर्यायी जागेची निश्चिती करावी. जागा निश्चित झाल्यानंतर बाजाराचे स्थलांतर करण्याची कार्यवाही हाती घ्यावी, अशी सूचना केली. जिल्हाधिकारी गायकवाड यांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, जागा निश्चित झाल्यानंतर त्याची पाहणी करू, तेथे सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊन आठवडा बाजार हलविण्यात येतील, महिन्याभरात ही कार्यवाही महापालिकेने पूर्ण करावी, अशी सूचना त्यांनी केली. तसेच बाजार हटविताना होणारा विरोध लक्षात घेऊन, प्रसंगी कलम १४४ प्रमाणे जमावबंदी आदेशही लागू केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या ५० चौक व १५ रस्त्यांच्या रुंदीकरणावर बैठकीत चर्चा झाली. सांगली कॉलेज कार्नर, स्फूर्ती चौक, विजयनगर चौक या प्रमुख चौकांच्या रुंदीकरणासाठी तातडीने मार्किंग करण्याचे आदेशही त्यांनी दिले. बहुतांश चौकात अतिक्रमणे झाली आहेत. वीज वितरणचे खांब चौकाच्या मध्यावरच आहेत. दूरध्वनीचे खांबही तसेच आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत असल्याचा अहवाल सादर करण्यात आला. (वार्ताहर)+मिरजेच्या नगररचनाचे अधिकारी मुर्दाडजिल्हाधिकारी गायकवाड यांच्या उपस्थितीत महिन्याभरापूर्वी झालेल्या बैठकीत ५० चौक व १५ रस्त्यांच्या रुंदीकरणाबाबत सद्यस्थितीचा अहवाल तयार करण्याचे आदेश महापालिकेच्या नगररचना विभागाला देण्यात आले होते. त्यानुसार सांगलीच्या नगरचना विभागाने शहरातील चौक व रस्त्यांवरील अतिक्रमणे, भूसंपादनाबाबत कार्यवाही याबाबत छायाचित्रासह सादरीकरण केले. याउलट मिरजेच्या अधिकाऱ्यांनी काहीच अहवाल दिला नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. पुढील बैठकीपूर्वी चौक व रस्ता रुंदीकरणाचे मार्किंग करून सद्यस्थिती सादर करावी, अशी सूचनाही त्यांना करण्यात आली.