शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

कॉँग्रेस, राष्ट्रवादीचा टक्का गेला कुठे?

By admin | Updated: October 20, 2014 22:34 IST

विधानसभा निवडणूक : राष्ट्रवादीला ४ टक्के, कॉँग्रेसला २५ टक्के मतदान

अविनाश कोळी -सांगली -राष्ट्रवादी आणि भाजपच्या छुप्या पाठिंब्याची उघड चर्चा आता सांगली जिल्ह्यात रंगली आहे. कॉँग्रेस नेत्यांनी याबाबत उघड टीका केली आहे. या टीकेला आता आकड्यांचा आधारही लाभताना दिसत आहे. महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीचे तब्बल १८ नगरसेवक असतानाही सांगली, मिरज मतदारसंघात मिळून राष्ट्रवादीला सरासरी केवळ चार टक्के मतदान मिळाले आहे. ज्या चार मतदारसंघात राष्ट्रवादीवर भाजपला मदत केल्याचा आरोप होत आहे, त्या सांगली, मिरज, जत, पलूस-कडेगाव मतदारसंघातील राष्ट्रवादीला पडलेल्या मतांची सरासरी ही केवळ साडेसहा टक्के इतकीच आहे. त्यामुळे संशयाला आता अधिक बळ मिळत आहे. सांगली जिल्ह्यात कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीला जबरदस्त धक्का देत भाजपने चार जागा मिळविल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, सहकारी संस्था यामध्ये कुठेही भाजपचे फारसे अस्तित्व नसताना अचानक भाजपची ताकद वाढण्यामागे कोणते कारण असावे, याचे कोडे आता राजकीय तज्ज्ञांनाही पडले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी ग्रामीणसह शहरी भागातील अशा संस्थांमध्ये क्रमांक एकवर मानली जात आहे. कॉँग्रेसचेही जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागात प्राबल्य आहे. तरीही या दोन्ही पक्षांची वाताहत करून भाजपने कोणत्या शक्तीच्या आधारावर मुसंडी मारली, हा प्रश्नही आता अनेकांना सतावत आहे. निकालाचे आकडे बाहेर पडल्यानंतर अनेकांना आश्चर्याचे धक्के बसले. यात सर्वात आश्चर्यकारक आकडे हे राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे होते. माजी मंत्री जयंत पाटील यांना सर्वाधिक ६३ टक्के, तर आर. आर. पाटील यांना ५३ टक्के मते मिळाली. उर्वरित सहा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या मतांची सरासरी केवळ १४ टक्के इतकी आहे. पलूस-कडेगावमध्ये राष्ट्रवादीच्या सुरेखा लाड यांना केवळ ०.३७ टक्के मते मिळाली. सांगली, मिरज मतदारसंघांचा विचार केला तर, या दोन्ही शहरात मिळून राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक आहेत. याशिवाय त्यांच्याकडे अपक्ष ६ नगरसेवकांची ताकद आहे. म्हणजे २४ नगरसेवकांची ताकद असूनही राष्ट्रवादीची मते गेली कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सांगली शहरातही राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे. तरीही त्यांचे उमेदवार सुरेश पाटील यांना २ टक्केच मते मिळू शकली. पक्षाची प्रत्यक्ष ताकद आणि विधानसभेच्या त्यांच्या उमेदवारांना मिळालेली मते यांचा ताळेबंद जुळत नाही. मोठी तफावत या आकड्यांमध्ये दिसून येत आहे. भाजपला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी, नेत्यांनी तसेच कार्यकर्त्यांनी केलेल्या छुप्या मदतीच्या टीकेला आता बळ मिळू लागले आहे. काँग्रेसची अवस्थाही तशीच आहे. काँग्रेस सांगली, मिरज मतदारसंघात एकसंधपणे लढली नसल्याचे चित्र दिसत आहे. या दोन्ही मतदारसंघात काँग्रेसला मिळालेल्या मतांची सरासरी २५ टक्के आहे. मिरजेतील काँग्रेसच्या नगरसेवकांची व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची संख्या अधिक असतानाही याठिकाणी केवळ १६ टक्के मतेच काँग्रेसच्या पदरात पडली आहेत.विधानसभानिहाय राष्ट्रवादीचा टक्कासांगली २.४३मिरज ५.९५पलूस-कडेगाव ०.३७जत १७.९७खानापूर १८.३७शिराळा ३७.६७तासगाव५३.११इस्लामपूर ६२.९१