शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

घोटाळ्याचा बोजा उतरणार, व्याज मानगुटीवरच

By admin | Updated: June 29, 2016 23:58 IST

जिल्हा बॅँक : चौकशी अधिकाऱ्यांकडून कार्यवाही होणार, दिलासा मिळाल्यानंतरही चिंता कायम राहण्याची चिन्हे

सांगली : जिल्हा बॅँकेतील ४ कोटी १८ लाख रुपयांच्या घोटाळा प्रकरणातून २ कोटी १६ लाख रुपयांचा आक्षेप रद्द केला जाणार आहे, मात्र त्या रकमेवरील व्याज यात अडकलेल्या तत्कालीन संचालकांना लागू होणार आहे. त्यामुळे बोजा हलका झाला, तरी व्याजाचे भूत मानगुटीवर लटकणार असल्याने संचालकांची चिंता वाढणार आहे. वसंतदादा कारखान्याकडून या प्रकरणातील २ कोटी १६ लाख रुपयांचा धनादेश वठल्याने त्याबाबतचे पत्र संचालकांनी बँकेकडून घेतले आणि ते चौकशी अधिकाऱ्यांकडे सादर केले. बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील यांनीही चौकशी अधिकाऱ्यांना संबंधित रक्कम जमा झाल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे हा बोजा आता कमी होणार आहे. जिल्हा बँकेचे २००१-०२ ते २०११-१२ या कालावधीतील प्रधान कार्यालयाचे रंगकाम व दुरुस्ती, अमृतमहोत्सवी कार्यक्रमातील खर्च, नोकरभरती, इमारत बांधकामासाठी केलेला खर्च, बँक गॅरंटी शुल्क परत देण्याचा व्यवहार, बचत गट संघास दिलेले मानधन, निवृत्त अधिकाऱ्यांवर केलेला पगाराचा खर्च, जादा दराने केलेली सीसीटीव्ही खरेदी, एकरकमी परतफेड योजनेतील सवलत, संचालक मंडळांचा अभ्यास दौरा अशा अनेक नियमबाह्य गोष्टी निदर्शनास आल्या होत्या. यातून ४ कोटी १८ लाख रुपयांचा ठपका तत्कालीन संचालक, अधिकारी यांच्यावर ठेवण्यात आला होता. चौकशी अधिकारी श्रीधर कोल्हापुरे यांनी ४० माजी संचालक, तीन माजी कार्यकारी संचालक, ११ अधिकाऱ्यांसह १६ वारसदार अशा ७० जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे.आक्षेपांमध्ये सर्वात मोठा आक्षेप वसंतदादा कारखान्याच्या बँक गॅरंटी शुल्काचा आहे. त्यामुळे याप्रकरणी अडकलेल्या विद्यमान संचालकांनी वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांच्याशी चर्चा करून, ही रक्कम परत बँकेकडे भरण्याची मागणी केली होती. त्यानुसार कारखान्याने ही रक्कम जमा केली. संचालकांनी रक्कम जमा झाल्याबाबत बँकेचे पत्र घेऊन ते चौकशी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. चौकशी अधिकाऱ्यांनी बँकेकडे विचारणा केल्यानंतर अध्यक्षांनी रक्कम जमा झाल्याचे सांगितले. त्यामुळे हा बोजा उतरविला जाणार आहे. मात्र आक्षेप घेतल्यापासून या रकमेवरील रितसर व्याज आकारले जाणार आहे. त्याबाबत चौकशी अधिकाऱ्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे बोजा उतरताना व्याजाची चिंता आता संचालकांना सतावणार आहे. (प्रतिनिधी)चौकशी थांबलेलीच...उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या घोटाळाप्रकरणी चौकशीस स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे न्यायालयीन निकाल लागल्यानंतरच यासंदर्भातील कारवाई होणार आहे. व्याज लागू करण्याचे संकेत चौकशी अधिकाऱ्यांनी दिले असले तरी, व्याज आकारणीस संचालकांचा विरोध होण्याची चिन्हे आहेत. संचालकांकडून व्याजाच्या आकारणीस विरोधव्याज आकारणीच्या मुद्याबाबत काही संचालकांनी विरोध केला आहे. अशी नोटीस प्राप्त होताच आम्ही त्यास विरोध करू. वास्तविक बॅँक गॅरंटी वसुलीची जी गोष्ट राज्य बॅँकेला शक्य झाली नाही, ती सांगली जिल्हा बॅँकेने करून दाखविली असताना पुन्हा त्यात व्याजाचा मुद्दा उपस्थित करणे चुकीचे आहे, असे काही संचालकांनी सांगितले.