शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

गुळाला दर नसल्यामुळे गुऱ्हाळघरे अडचणीत

By admin | Updated: November 27, 2014 00:18 IST

गळितासाठी शेतकरी धजेनात : आरळा, कणदूरपर्यंत ४५ गुऱ्हाळ ठिय्ये

पुनवत : शिराळा तालुक्यातील वारणा पट्ट्यात आणि विशेषत: कणदूरमध्ये गुऱ्हाळघरे नुकतीच सुरू झाली आहेत. मात्र हंगामाच्या सुरूवातीलाच गुळाला चांगला दर नसल्याने, शेतकरी गुऱ्हाळातील गळिताकडे पाठ फिरवू लागले आहेत. ऊस दराचा निर्णय झाल्यानंतरच गुळाच्या दरात वृध्दी होईल, असे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.शिराळा तालुक्यात साधारणत: दिवाळीनंतर गुऱ्हाळांचा गळीत हंगाम सुरू होतो. यावर्षी परवाच्या अवकाळी पावसामुळे गुऱ्हाळघरे उशिरा सुरू झाली आहेत. काही गुऱ्हाळघरे सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. वारणा पट्ट्यात आरळ्यापासून ते कणदूरपर्यंत सुमारे ४० ते ४५ गुऱ्हाळ ठिय्ये आहेत. प्रतिवर्षी एकेका गुऱ्हाळघरात सुमारे २५ ते ३० लोकांना रोजगार मिळतो. गेल्यावर्षी कणदूर येथील शेतकऱ्यांच्या गुळाच्या कलमांना ५ हजार ते ६ हजार ८०० पर्यंत दर मिळाला. गुळमोदकांनाही गतवर्षी ८ हजारपर्यंत दर मिळाला आहे. मात्र व्यापाऱ्यांच्या गुळदराच्या धोरणावर शेतकऱ्यांची नाराजी आहे. व्यापाऱ्यांनी फक्त एखाद्या कलमाला वाढीव दर न देता सरासरी दर वाढवला पाहिजे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. उसाचा दर निश्चित नसल्याने गुळाचा दरही जेमतेमच आहे. शेतकरी गुळाच्या गळिताकडे सध्या तरी पाठ फिरवू लागले आहेत. (वार्ताहर)आदनाचे गणितएका आदनाला २ टन ऊस लागतो. या गळितातून ८ ते ९ रवे पडतात. एका आदनाचा गुऱ्हाळ खर्च १८०० रुपये असून, त्या गुळाला बाजारपेठेत २५०० ते ३००० पर्यंत दर मिळाला, तर शेतकऱ्यांना अजिबात परवडत नाही. शेतकऱ्यांनी गुळाची विक्री शेरणी रुपात केली, तर त्याला एका आदनापासून ४००० ते ४२०० रुपये मिळतात.