शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

सावधान! बोगस विमा पॉलिसी सुरू आहे...

By admin | Updated: December 26, 2014 23:48 IST

एजंटांचा वाहन मालकांना गंडा : अपघातानंतर बोगसगिरीचा होतोय भांडाफोड

अशोक डोंबाळे - सांगली -बोगस गुणपत्रे-प्रमाणपत्रे देऊन हजारोंना पदवीधर करणाऱ्या ‘गावडे विद्यापीठा’चा ‘आदर्श’ घेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील (आरटीओ) काही एजंटांनी वाहनांच्या बोगस विमा पॉलिसीच्या प्रमाणपत्रांची चलती सुरू केली आहे. वाहनांच्या वार्षिक तीस ते पस्तीस हजाराच्या विमा हप्त्याची नामांकित कंपनीची पॉलिसी केवळ तीन ते चार हजारात दिली जात आहे. पैसे वाचविण्यासाठी काही वाहनमालक जाणीवपूर्वक बोगस पॉलिसी घेत आहेत, तर काही वाहन मालकांची एजंटाकडून फसवणूक झाल्याचे अपघातानंतर उघडकीस येत आहे. विशेष म्हणजे ही बोगसगिरी तपासण्याची कोणतीही व्यवस्था आरटीओ कार्यालयाकडे नाही.नवे वाहन खरेदी करताना विमा उतरवणे अनिवार्य आहे. शिवाय जुन्या वाहनांची खरेदी-विक्री आणि वाहनांचा परवाना नूतनीकरण यासाठीही उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने विम्याची सक्ती केली आहे. त्यावर डोकेबाज एजंटांनी बोगस विम्याचा उपचार शोधून काढला आहे. विमा पॉलिसींची चलती लक्षात घेऊन एजंटांनी बोगसगिरी सुरू केली आहे. नामांकित विमा कंपनीच्या पॉलिसीची पावती घेऊन ती संगणकाद्वारे स्कॅन केली जाते. संगणकावरील तांत्रिक करामतींद्वारे फोटो शॉपीमध्ये मूळ विमा कंपनीच्या पॉलिसीचा क्रमांक आणि व्यक्तीचे नाव बदलून तेथे बोगस क्रमांक आणि वाहन खरेदीदाराचे नाव टाकले जात आहे. हा बदल करण्यासाठी केवळ पाच ते दहा रुपये खर्च येतो. ट्रक, ट्रॅक्टर अशा मोठ्या वाहनांची विमा पॉलिसी काढल्यानंतर त्याचा वर्षाचा हप्ता तीस ते पन्नास हजारापर्यंत येतो. मात्र एजंट तीन ते चार हजार रुपयांमध्ये नामांकित कंपनीच्या पॉलिसीची हुबेहूब पावती व प्रमाणपत्र देत आहेत.विशेष म्हणजे काही वाहन मालकांच्या सहमतीनेच किरकोळ किमतीत विमा पॉलिसीची विक्री होत आहे. मात्र संबंधित वाहनाचा अपघात झाल्यानंतरच हा धक्कादायक प्रकार उजेडात येतो. काही एजंट तर सरसकट वाहनधारकांच्या माथी अशी बोगस पावती-प्रमाणपत्र मारत आहेत. आरटीओ कार्यालयात या प्रमाणपत्रातील खरे-खोटेपणा तपासण्याची व्यवस्था नसल्याने ही बोगसगिरी खपून जात आहे. काही घटनांमध्ये वाहनधारकाच्या सहमतीने बोगस विमा कंपनीच्या पॉलिसीची विक्री होत असल्याचे दिसत आहे, तर काही घटनांमध्ये वाहनधारकाला कल्पना न देताच एजंट थर्ड पार्टी विम्याच्या नावाखाली बोगस विमा देत असल्याचे स्पष्ट होत आहे. अडचणीचा गैरफायदाबँकांचे हप्ते, डिझेलचे वाढते दर आणि त्या तुलनेत व्यवसाय नसल्यामुळे ट्रकचा धंदा आतबट्ट्यात आला आहे. असे अडचणीतील ट्रकचालक आरटीओ आणि पोलिसांना दाखविण्यासाठी किरकोळ किमतीमधील बोगस विमा पॉलिसींचा वापर करीत आहेत. ट्रक चालकांना सांगली, कोल्हापूर, पुणे येथील एजंटांकडून मोठ्याप्रमाणात बोगस विमा पॉलिसींची विक्री झाल्याचे विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले.असे आहेत बोगस दरवाहनवार्षिक हप्ता बोगस दर (रु.)ट्रक३०००० ते ३५०००४०००ट्रॅक्टर ८००० ते ९०००४०००कार७००० ते १३०००२०००टेम्पो१८००० ते २००००३०००दुचाकी ९०० ते १०००२००सर्वाधिक बोगस विमा ट्रॅक्टरचा साखर कारखान्याकडे ऊस वाहतुकीसाठी ट्रॅक्टर लावायचा असेल, तर विम्याची पावती जोडावी लागते. ट्रॅक्टरचा दोन टॉल्यांसह पूर्ण विमा उतरवायचा असेल, तर वार्षिक आठ ते नऊ हजार रुपये हप्ता आहे. एवढा हप्ता भरण्यापेक्षा दोन हजारात बोगस विमा घेतलेला बरा, म्हणून ट्रॅक्टर मालकच बोगस विमा घेत आहेत! ग्रामीण भागातील ट्रॅक्टर चालक बोगस विम्याच्या पावत्या ठेवत असल्याचे दिसत आहे. एजंटांकडून मोठ्याप्रमाणात बोगस विमा पॉलिसींची विक्री झाल्याचे जाणकारांचे मत आहे. याबद्दल नामांकित कंपन्यांचीही तक्रार आहे. परंतु, पोलिसांचा ससेमिरा नको, म्हणून त्याही उघड बोलण्यास तयार नाहीत.