शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बरसला ४६.६ टक्के जादा पाऊस

By admin | Updated: October 2, 2016 01:02 IST

दुष्काळी भागाला दिलासा : तीन वर्षात प्रथमच निसर्गाने आणले शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन

अशोक डोंबाळे ल्ल सांगली जिल्ह्यात आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने धरणे तुडुंब भरली आहेत. मागील तीन वर्षातील पावसाची आकडेवारी पार करून जिल्ह्यात सरासरी ५९५.८ मिलिमीटर पाऊस झाला असून, हे प्रमाण ११६.७ टक्के आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ५४.६ टक्के जादा पाऊस बरसल्याचे हवामान खात्याच्या आकडेवारीवरून दिसत आहे. दुष्काळी भागातही पावसाने हजेरी लावल्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याची आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली आहे. जिल्ह्यात २०१२ पासून सलग तीन वर्षे दुष्काळी भागातील शेतकऱ्यांच्या पदरात खरीप, रब्बी हंगामातील पिके पडली नाहीत. दुष्काळी भागातील पाझर तलावही पावसाळ्यातच कोरडे पडले होते. २०१५ वर्षात जिल्ह्यात जून ते आॅक्टोबर या कालावधित ७० टक्केच पाऊस झाला. कोयना, वारणा धरणातही पाण्याचा अत्यंत कमी साठा होता. शिराळा, वाळवा, पलूस या वारणा, कृष्णा नदीकाठच्या गावांनाही पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता. काही गावांमध्ये तर टँकरही सुरू करावे लागले होते. जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, खानापूर, मिरज पूर्व या तालुक्यात दुष्काळाचे भीषण चित्र होते. पिण्याच्या पाण्यासाठीच्या टँकरची आकडेवारी शंभरहून अधिक झाली होती. चारा छावण्या सुरू कराव्या लागल्या होत्या. यंदा मान्सूनपूर्व पाऊस फारसा बरसला नाही. मान्सूनचे केरळमध्ये वेळेत आगमन झाले. पण, महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पोहोचण्यासाठी अनेक अडथळे निर्माण झाल्यामुळे १५ जूनपर्यंत मान्सून दाखल झालाच नव्हता. जुलै संपला तरीही मान्सून पावसाचा जोर नसल्यामुळे शेतकरी चिंतेत होते. मात्र आॅगस्ट महिन्यात मान्सूनने झोडपून काढले. आॅगस्ट, सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीचे चित्रच बदलले. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी चांदोली (वारणा) आणि कोयना धरणे शंभर टक्के भरली. जिल्ह्यातील छोटे-मोठे पाझर तलावही भरले आहेत. जून ते ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत जिल्ह्यात ११६.७ टक्के पाऊस बरसला आहे. दिवाळी गोड पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकेही चांगली असल्यामुळे शेतकऱ्यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे. पाऊस आणि पाण्याचा साठा मुबलक असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकेही शेतकऱ्यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. पावसाची आकडेवारी चांगला पाऊस दाखवत असली तरी जत, कवठेमहांकाळ, तासगाव, आटपाडी तालुक्यातील अनेक भागात पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे तेथील शेतकरी चिंतेत आहेत. मागील चार वर्षातील उच्चांकी पाऊस सांगली जिल्ह्यात झाला आहे. उपलब्ध पाण्याचा शेतकऱ्यांनी काटकसरीने वापर केल्यास रब्बी हंगामातील पिके चांगली येणार आहेत. पुरेसा पाऊस आणि रब्बी हंगामातील पेरणीसाठीच्या पोषक वातावरणामुळे पिके चांगली येणार आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करून खते, बियाणांची शासनाकडून मागणी केली आहे. जिल्ह्यात सर्वत्र रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा, ज्वारीचे बियाणे उपलब्ध आहे. - आर. जे. भोसले, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, सांगली. तीन वर्षातील पावसाची टक्केवारी तालुका सरासरी २०१४ २०१५ २०१६ मिरज ४९२ १०७.६ ६३.४ १४४.२ जत ४५७.७ १०५.३ ५६.१ ८७.३ खानापूर ४९४.९ ९८.२ ६४.२ ८१.४ वाळवा ५५६.८ ९० ४०.९ १०९.३ तासगाव ४७६ ८८.२ ४५.०८ ११५.४ शिराळा ८८४.७ १२६.७ ६४.०० १५४.४ आटपाडी ३५५ १०७.५ ८३.३ १०७.२ क.महांकाळ ४५७ १००.६ ४८.६ १२२.३ पलूस ४७६ ९१.६ ५३.५ १०४.३ कडेगाव ४४७ ११९.४ ५४.२ १०६.६ सरासरी ५१०.६ १०३.५२ ५७.१ ११६.७