शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "आता राजही सोबत आलेला आहे", उद्धव ठाकरे यांचं मोठं विधान; १९ जुलैला 'राज' उलगडणार?
2
शरद पवारांचे विश्वासू, कामगार चळवळीतील बडे नेते; नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची कारकीर्द
3
सगळीकडे 'ऑरा फार्मिंगची' चर्चा; नेमका हा काय प्रकार आहे? बोटीवर नाचणारा तो मुलगा कोण?
4
"ते आले, जबरदस्तीने पँट काढायला लावली आणि…’’ भाजपा नेत्यासोबत रंगेहात पकडल्या गेलेल्या महिलेचा दावा
5
‘’महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर खबरदार, काँग्रेसचा हिंदीला विरोध नाही तर…’, हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
6
“२६३३ दिवस अध्यक्ष, ७ वर्षांत एकही सुट्टी घेतली नाही, एक पाऊल मागे घेतोय, पण...”: जयंत पाटील
7
1 कोटी Facebook अकाउंट्स ब्लॉक, Meta ने का केली इतकी मोठी कारवाई?
8
शशिकांत शिंदे पवार गटाचे नवे प्रदेशाध्यक्ष होताच जयंत पाटलांचे ट्विट, म्हणाले- "मागच्या काळात..."
9
मुंबई: गेटवे ऑफ इंडिया परिसरात रेडिओ क्लब जेटी प्रकल्पाला उच्च न्यायालयाचा हिरवा झेंडा
10
"माझा मुलगा असता तर बदला घेतला..." भाजपा नेत्याने कानाखाली मारल्यावर ढसाढसा रडले BEO
11
चार पॅराशूटच्या मदतीने यान समुद्रात उतरले, भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर सुखरूप परतले
12
रोनाल्डोचा फॅन; सिराजनं बॅटिंग केली छान! पण फुटबॉल 'स्कील' जमलं नाही अन् चेंडू थेट... (VIDEO)
13
समोसे, जिलेबीवर हानिकारक असल्याचे लेबल लावण्याची माहिती खोटी; आरोग्य मंत्रालयाचे स्पष्टीकरण
14
बड्या प्रोडक्शन हाऊसमध्ये...,'पंचायत' फेम अभिनेत्रीला आला कास्टिंग काऊचचा अनुभव
15
भारतीय लष्कराच्या मानहानी प्रकरणात राहुल गांधी लखनौ न्यायालयात सरेंडर, तत्काळ मिळाला जामीन; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
छांगूर बाबाच्या बेनामी मालमत्तेवर ED ची कारवाई; पुण्यात आढळली २०० कोटी रुपयांची जमीन
17
Arijit Singh: गायक अरिजीत सिंहची नवी इनिंग, 'या' सिनेमातून करणार दिग्दर्शनात पदार्पण
18
उद्धव ठाकरेंपाठोपाठ शरद पवारांनाही धक्का! भाजपामध्ये 'इनकमिंग' सुरूच; अनेकांचा पक्षप्रवेश
19
ऑलिम्पिक क्रिकेटसाठी केवळ ६ संघांना संधी, कशी ठरणार पात्रता, कोण घेणार निर्णय? नीट समजून घ्या
20
शाळा सोडली, स्वप्न थांबली, पण हार नाही मानली; आव्हानांना तोंड देत पार पाडतेय कर्तव्य

सांगली जिल्ह्यातील १0१ गावांत ‘एक गाव एक गणपती’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 22:54 IST

सांगली : जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यंदाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावे या उपक्रमातून बाहेर पडली आहेत. यंदा केवळ जिल्ह्यातील १०१ गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ बसविला आहे

ठळक मुद्देआजची पिढी एकमेकांशी ईर्षा करण्यासाठी स्वतंत्रपणे मंडळाची स्थापना गतवर्षी हा आकडा ९६ होता. त्यामध्ये यंदा वाढ झाली आहे.लोकवर्गणीतून जमा झालेली रक्कम गावाच्या विधायक कामासाठी खर्च व्हावी,

सचिन लाड ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्ह्यात ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमास यंदाही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानाचे बक्षीस घेतल्यानंतर अनेक गावे या उपक्रमातून बाहेर पडली आहेत. यंदा केवळ जिल्ह्यातील १०१ गावांतील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन ‘एक गाव एक गणपती’ बसविला आहे.

जिल्हा प्रशासन व पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविला जात आहे. गणेशोत्सवातील खर्च कमी व्हावा, वर्गणीची कोणावर सक्ती होऊ नये, लोकवर्गणीतून जमा झालेली रक्कम गावाच्या विधायक कामासाठी खर्च व्हावी, गाव म्हटले की गट-तट आलेच, त्यातून गणेश आगमन व विसर्जन मिरवणुकीत मारामारी होऊ नये, पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी व्हावा, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ‘एक गाव एक गणपती’ हा उपक्रम राबविला जात आहे.

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव अभियान सुरु झाल्यानंतर या उपक्रमाचा अनेक गावांनी स्वीकार केला. मात्र याचे बक्षीस घेतल्यानंतर बहुतांश गावे या उपक्रमातून बाहेर पडल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. दोन वर्षापूर्वी १४० गावांत हा उपक्रम राबविला. गतवर्षी हा आकडा ९६ होता. त्यामध्ये यंदा वाढ झाली आहे.

तंटामुक्त अभियानात जिल्ह्याने २००८-०९ मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला होता. त्यावेळी २४५ गावांत ‘एक गणपती’ बसविला होता. २०१० मध्ये तब्बल ३०२ गावांनी या उपक्रमात सहभाग घेतला होता. पण त्यानंतर ही संख्या घटतच आहे. पोलिसांनी प्रबोधन करुनही आजची पिढी एकमेकांशी ईर्षा करण्यासाठी स्वतंत्रपणे मंडळाची स्थापना करुन गणेशाची प्रतिष्ठापना करीत आहे.