Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > प्रोटीन हवंय-खर्च परवडत नाही? ५० रूपयांत ५ व्हेज पदार्थ खा, प्रोटीनची कमतरता कधीच नसेल

प्रोटीन हवंय-खर्च परवडत नाही? ५० रूपयांत ५ व्हेज पदार्थ खा, प्रोटीनची कमतरता कधीच नसेल

Top 5 Veg Protein Food (What To Eat For Protein In Veg) : शाकाहारी लोकांना प्रोटीन कसं मिळवावं याबाबत शंका असतात.  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 16:44 IST2026-05-10T14:31:24+5:302026-05-10T16:44:58+5:30

Top 5 Veg Protein Food (What To Eat For Protein In Veg) : शाकाहारी लोकांना प्रोटीन कसं मिळवावं याबाबत शंका असतात.  

Top 5 Veg Protein Food : Which Veg Food Are Best Source Of Protein | प्रोटीन हवंय-खर्च परवडत नाही? ५० रूपयांत ५ व्हेज पदार्थ खा, प्रोटीनची कमतरता कधीच नसेल

प्रोटीन हवंय-खर्च परवडत नाही? ५० रूपयांत ५ व्हेज पदार्थ खा, प्रोटीनची कमतरता कधीच नसेल

आजकालच्या धावपळीच्या जीवनात लोकांकडे हेल्दी  खाण्यासाठी आणि तब्येतीकडे लक्ष देण्यासाठी जराही वेळ नसतो. यामुळेच अनेकांमध्ये प्रोटीनची कमतरता उद्भवते. फक्त मासांहारातूनच जास्त प्रोटीन मिळतं. व्हेज अन्नपदार्थांमध्ये प्रोटीन जास्त नसते, असा अनेकांचा समज असतो. शाकाहारी लोकांना प्रोटीन कसं मिळवावं याबाबत शंका असतात. असे काही  शाकाहारी पदार्थ पाहूया जे तुम्ही रोजच्या आहारात घेतले तर प्रोटीन्सची कमतरता भरून निघण्यास मदत होईल आणि शरीरही निरोगी-फिट राहील. (Which Veg Food Are Best Source Of Protein)

प्रोटीनची कमतरता पूर्ण करता हे ५ प्रकारचे व्हेज पदार्थ (Top 5 Veg Protein Food)

1) सोयाबीन (Soyabean)

नॅशनल लायब्रेरी ऑफ मेडिसिन्सच्या रिपोर्टनुसार जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल आणि व्हेज पदार्थ खाऊन तुम्हाला शरीरातील प्रोटीन वाढवायचं असेल तर तुम्ही सोया बीन्सचं सेवन करू शकता.   सोयाबीनची भाजी चवीला खूप टेस्टी लागते. सोयाबीन खाल्ल्यानं शरीर मजबूत राहण्यास मदत होते. यात कमीत कमी कॅलरीज असतात ज्यामुळे वजनही वाढत नाही.  (Ref)

2) मूग डाळ (Moong Dal)

मूग डाळीत सर्व डाळींपेक्षा जास्त प्रोटीन असते. तुमच्या आरोग्यासाठी मूग डाळ उत्तम मानली जाते. ज्यामुळे शरीरात प्रोटीन्सची कमतरता भासत नाही. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही मूग डाळीचे सेवन करू शकते. यात फायबर, आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटामीन बी अशी बरीच पोषक तत्व असतात.

3) पनीर (Paneer)

 तुम्ही रोजच्या आहारात पनीरचा समावेश करायलाच हवा.  यातून फक्त प्रोटीनच नाही तर कॅल्शियम, फॉस्फरस, व्हिटामीन बी-१२ आणि गुड फॅट्स मिळतात. पनीर खाल्ल्यानं हाडं मजबूत होतात तुम्ही रोज पनीरच्या हेल्दी रेसिपीज ट्राय करू शकता.

4) दूध (Milk)

आहारात दुधाचा समावेश करणं हा साधा-सोपा प्रोटीन मिळवण्याचा मार्ग आहे. १ ग्लास दूध तुमच्या तब्येतीसाठी फायदेशीर ठरू शकतं. यातून कॅल्शियम आणि प्रोटीन दोन्ही मिळते जे तुमची हाडं, दात आणि इम्यून सिस्टिमसाठी चांगले ठरते.  म्हणूनच दुधाचा आहारात समावेश करावा.

5) ग्रीक योगर्ट (Greek Yogurt)

 ग्रीक योगर्टचा तुम्ही आपल्या आहारात समावेश करू शकता. ग्रीक योगर्ट चवीला उत्तम असते तसंच पचनासाठीही चांगले असते.  यातून शरीराला भरपूर प्रोटीन मिळते. याशिवाय पोटाशी संबंधित समस्यांही उद्भवत नाहीत. वेगवेगळ्या सॅलेड रेसिपीजमध्ये तुम्ही ग्रीक योगर्ट घालू शकता.

Web Title: Top 5 Veg Protein Food : Which Veg Food Are Best Source Of Protein