Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Social Viral > फ्रिजमधीलच एका वस्तूमुळे होत नाही नीट कुलिंग! मेकॅनिकला बोलवण्यापूर्वी करा १ काम - टाळा हजारो रुपयांचा भुर्दंड...

फ्रिजमधीलच एका वस्तूमुळे होत नाही नीट कुलिंग! मेकॅनिकला बोलवण्यापूर्वी करा १ काम - टाळा हजारो रुपयांचा भुर्दंड...

fridge not cooling properly : fridge cooling problem : why fridge is not getting cold : फ्रिजमध्ये वर्षानुवर्षे ठेवता ‘ही’ वस्तू, म्हणूनच होत नाही कुलिंग - पाहा नेमकी कोणती आहे ती वस्तू ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2026 11:05 IST2026-05-17T11:00:10+5:302026-05-17T11:05:01+5:30

fridge not cooling properly : fridge cooling problem : why fridge is not getting cold : फ्रिजमध्ये वर्षानुवर्षे ठेवता ‘ही’ वस्तू, म्हणूनच होत नाही कुलिंग - पाहा नेमकी कोणती आहे ती वस्तू ?

fridge not cooling properly common fridge cooling mistakes why fridge is not getting cold fridge cooling problem | फ्रिजमधीलच एका वस्तूमुळे होत नाही नीट कुलिंग! मेकॅनिकला बोलवण्यापूर्वी करा १ काम - टाळा हजारो रुपयांचा भुर्दंड...

फ्रिजमधीलच एका वस्तूमुळे होत नाही नीट कुलिंग! मेकॅनिकला बोलवण्यापूर्वी करा १ काम - टाळा हजारो रुपयांचा भुर्दंड...

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की घरात सर्वात जास्त वापरली जाणारी वस्तू म्हणजे फ्रिज...उन्हाळ्यात थंड पाणी, आईस्क्रीम, दूध, भाज्या ताज्या ठेवण्यासाठी फ्रिज २४ तास चालू असतो. पण अनेकदा असं होतं की, फ्रिज व्यवस्थित चालू असूनही त्यातील पाणी थंड होत नाही किंवा भाज्या सडू लागतात. अशावेळी आपल्याला वाटतं की फ्रिजचा गॅस संपला असेल किंवा कॉम्प्रेसर खराब झाला असेल आणि आपण हजारो रुपये खर्च करून मेकॅनिकला बोलावतो(fridge not cooling properly).

इतकंच नाही तर फ्रिज जुना झाला आहे किंवा त्यात काही मोठा तांत्रिक बिघाड झाला आहे असं आपण समजतो. पण तुम्हाला माहिती आहे का, कधीकधी फ्रिजमध्ये वर्षानुवर्षे ठेवलेली एक छोटीशी वस्तूही कूलिंग कमी होण्यामागचं मोठं कारण ठरू शकते. या वस्तूमुळे फ्रिजमधील हवा योग्य प्रकारे फिरत नाही आणि त्यामुळे थंडावा (fridge cooling problem) कमी होऊ लागतो. परिणामी वीज जास्त खर्च होते आणि अन्नपदार्थही लवकर खराब होऊ शकतात. जाणून घेऊया फ्रिजमधील (why fridge is not getting cold) ती नेमकी कोणती वस्तू आहे आणि योग्य कूलिंगसाठी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे, ते पाहूयात... 

या एका वस्तूमुळे फ्रिजच कुलिंग नीट होत नाही...

अनेकदा फ्रिज बिघडण्यामागे कोणतंही तांत्रिक कारण नसतं, तर फ्रिजच्या आत 'वर्षानुवर्षे' ठेवलेली एक साधी वस्तू कारणीभूत असते! होय, तुम्ही अगदी बरोबर वाचलंत. आपल्यापैकी ९०% लोक नकळतपणे फ्रिजमध्ये अशी एक गोष्ट वर्षानुवर्षे ठेवून देतात, जी फ्रिजची कुलिंग यंत्रणा (Cooling System) पूर्णपणे जाम करून टाकते. या एका चुकीमुळे कॉम्प्रेसरवर प्रचंड ताण येतो, फ्रिज थंड होत नाही आणि महिन्याचं लाईट बिल मात्र दुप्पट येतं!

आजच्या काळात तंत्रज्ञान खूप पुढे गेले आहे. त्यासोबतच लोकही खूप मॉडर्न झाले असून आपले घर सुंदर सजवण्याची आवड सर्वांमध्येच वाढली आहे. घर नेहमी व्यवस्थित ऑर्गनाईज्ड असावे, प्रत्येक गोष्ट परफेक्ट असावी आणि घरात कुठेही घाण दिसू नये, यासाठी लोक नवनवीन हॅक्स (Hacks) वापरत असतात. यातीलच एक फॅशनेबल हॅक म्हणजे - फ्रिजच्या शेल्फ्स (कप्पे) स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी त्यावर अंथरले जाणारे रंगीबेरंगी मॅट्स (Fridge Mats). आजकाल अनेक घरांमध्ये फ्रिजच्या आत मॅट्स अंथरून ठेवण्याचा ट्रेंड जोरात सुरू आहे. हे मॅट्स दिसायला खूप आकर्षक असतात आणि फ्रिजमध्ये काही सांडल्यास शेल्फ गलिच्छ होण्यापासून वाचवतात. फ्रिज स्वच्छ ठेवण्याच्या नादात जर तुम्ही चुकीच्या पद्धतीचे किंवा चुकीच्या मटेरिअलचे मॅट्स खरेदी केले असतील, तर ते तुमच्या फ्रिजच्या कुलिंगवर (Cooling) थेट परिणाम करू शकतात. 

कचरा समजून फेकू नका! वापरलेल्या चहा पावडरने घरातील ८ कामं होतील चटकन - होईल हजारो रुपयांची बचत... 

जर तुम्हीही तुमच्या फ्रिजसाठी नवीन मॅट्स खरेदी केले असतील तर काही गोष्टींची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, फ्रिजसाठी कधीही जाड प्लास्टिकचे मॅट्स (Thick Plastic Mats) खरेदी करू नका. फ्रिजमधील अन्नपदार्थ थंड ठेवण्यासाठी त्याच्या आत सर्व बाजूंनी थंड हवा सतत फिरत (Air Circulation) असते. या थंड हवेच्या प्रवाहामुळेच फ्रिजमध्ये थंडावा तयार होतो आणि त्यामध्ये ठेवलेले अन्नपदार्थ, दूध किंवा भाज्या दीर्घकाळ ताज्या राहतात; कारण फ्रिजच्या प्रत्येक कोपऱ्यात समान प्रमाणात कूलिंग पोहोचत असते. परंतु, जर तुम्ही फ्रिजच्या शेल्फवर जाड प्लास्टिकचे मॅट्स आणून अंथरले, तर ते या थंड हवेचा प्रवाह (Air Flow) पूर्णपणे रोखून धरतात. यामुळे फ्रिजमध्ये ज्या पद्धतीने कूलिंग व्हायला हवे, तसे ते होत नाही आणि हवेचा मार्ग ब्लॉक होतो. हवेचा हा प्रवाह विस्कळीत झाल्यामुळे फ्रिजच्या प्रत्येक भागात सारखा गारवा पोहोचत नाही आणि अन्नपदार्थ लवकर खराब होऊ लागतात.

आठवड्यातून एकदा कमोडमध्ये बर्फाचे तुकडे का टाकावेत? फायद्याची आहे व्हायरल ट्रिक - विनामेहनत कमोड स्वच्छ... 

जेव्हा फ्रिजच्या आत थंड हवेचा प्रवाह व्यवस्थित फिरत नाही, तेव्हा फ्रिजला आतील तापमान संतुलित राखण्यासाठी नेहमीपेक्षा दुप्पट मेहनत करावी लागते. याचा थेट परिणाम विजेच्या जास्त वापरावर होतो, ज्यामुळे महिन्याचे लाईट बिल प्रचंड वाढते. जरी प्रत्येक फ्रिजमध्ये ही समस्या सारख्याच प्रमाणात जाणवत नसली, तरी चुकीच्या मॅटचा वापर केल्यामुळे हा धोका वाढतो. फ्रिजची कुलिंग कमी झाली की त्याचा पहिला फटका थेट आत ठेवलेल्या खाण्यापिण्याच्या पदार्थांना बसतो. गारवा योग्य प्रमाणात न मिळाल्यामुळे अन्नपदार्थ खराब होऊ लागतात. अनेकदा आपल्याला समजतच नाही की फ्रिज अगदी व्यवस्थित चालू असतानाही आतील पदार्थ इतक्या लवकर का सडत आहे? याचे मुख्य कारण म्हणजे मॅट्समुळे हवेच्या प्रवाहात आलेला अडथळा हेच असते. 

फ्रीजमध्ये सामान गच्च भरून ठेवू नका...

मॅट्स व्यतिरिक्त आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे— फ्रिजमध्ये गरजेशीरपेक्षा जास्त सामान कधीही कोंबून भरू नका. जेव्हा फ्रिजमध्ये डबे, भाज्या आणि भांडी ठसून किंवा गच्च भरली जातात, तेव्हा सुद्धा आतील थंड हवेचा प्रवाह (Air Flow) पूर्णपणे विस्कळीत होतो. त्यामुळे फ्रिजच्या आत नेहमी थोडी रिकामी जागा शिल्लक ठेवा, जेणेकरून थंड हवा सहजपणे सर्व बाजूंनी फिरू शकेल.

Web Title : फ्रिज ठंडा नहीं हो रहा? एक आसान उपाय बचा सकता है पैसे!

Web Summary : फ्रिज में प्लास्टिक की मोटी चटाई हवा के प्रवाह को रोक सकती है, जिससे ठंडक कम होती है और बिजली का बिल बढ़ता है। इन चटाइयों को हटाकर और फ्रिज को ज़्यादा भरने से बचकर हवा का संचार सुनिश्चित करें। इससे खाना ताज़ा रहता है और पैसे बचते हैं।

Web Title : Fridge not cooling? A simple fix can save you money!

Web Summary : Thick plastic mats in your fridge can block airflow, causing poor cooling and higher energy bills. Ensure proper air circulation by removing these mats and avoiding overfilling the fridge. This keeps food fresh and saves money.