'ढोलना' मंगळसुत्राच्या जुन्या डिझाइनची नवी फॅशन, राजस्थानी राजघराण्यासारखा रॉयल लूक-पाहा सुंदर मंगळसूत्र...
Updated:May 16, 2026 19:05 IST2026-05-16T19:00:15+5:302026-05-16T19:05:02+5:30
Dholna Mangalsutra Design : latest dholna mangalsutra : traditional dholna mangalsutra : राजस्थानी थाट असणाऱ्या ढोलना मंगळसुत्राच्या सुंदर मनमोहक डिझाईन्स...

Dholna Mangalsutra Design
प्रत्येक काळानुसार मंगळसूत्राच्या डिझाईन्समध्ये अनेक बदल झाले, पण सध्या ज्या एका डिझाईनची महिलांमध्ये प्रचंड क्रेझ आहे, ते म्हणजे 'ढोलना' (Dholna) मंगळसूत्र. नावाप्रमाणेच या मंगळसूत्राचे पेंडंट 'ढोलाच्या' आकाराचे असते, त्यामुळे याला ढोलना असं म्हटलं जातं. पारंपरिक मंगळसूत्राला आधुनिक ट्विस्ट देणारा हा प्रकार महिलांमध्ये खास लोकप्रिय ठरत आहे.
latest dholna mangalsutra
राजस्थानी संस्कृतीतून आलेला हा दागिना आता (traditional dholna mangalsutra) महाराष्ट्रासह संपूर्ण देशात लोकप्रिय झाला आहे. सिल्क साडी असो वा इंडो - वेस्टर्न आऊटफिट, कोणत्याही लूकवर हे मंगळसूत्र अतिशय उठून दिसते.
ढोलना हे मुळात राजस्थान आणि हरियाणाच्या पारंपरिक दागिन्यांपैकी एक आहे. तिथल्या ग्रामीण भागात महिला शतकानुशतके सोन्याच्या किंवा चांदीच्या 'ढोलाच्या' आकाराचे पेंडंट गळ्यात घालतात. याला तिकडे 'ढोलना' किंवा 'ढोल' असेही म्हटले जाते.
काही भागांत याला 'तवेझ' (Tabeez) स्टाईल पेंडंट असेही म्हणतात, कारण याचा आकार काहीसा ताईतासारखा दिसतो. मात्र, फॅशनच्या भाषेत 'ढोलना' हे नाव अधिक लोकप्रिय झाले आहे.
अस्सल राजस्थानी ढोलना मंगळसूत्रावर सोन्याच्या बारीक मण्यांचे नक्षीकाम असते, जे त्याला एक विंटेज लूक देते.
ढोलाच्या आकारासारखे दिसणारे पेंडंट ही या मंगळसूत्राची खास ओळख असून, त्यातून एक वेगळाच रॉयल आणि ट्रेंडी लुक मिळतो.
गोल किंवा चौकोनी पेंडंटच्या तुलनेत ढोलना मंगळसूत्राचा आकार अतिशय वेगळा आणि आकर्षक दिसतो.
संपूर्ण सोन्यात बनवलेले हे पेंडंट अत्यंत साधे आणि सोबर दिसते. ज्यांना डेली वेअरसाठी हलके दागिने हवे आहेत, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.
ढोलाच्या आकारावर लाल, हिरवा किंवा निळा मीनाकारी रंग भरलेला असतो. हे मंगळसूत्र पारंपारिक पैठणी किंवा कांजीवरम साडीवर अतिशय रॉयल लूक देते.
जर तुम्हाला लग्नसमारंभासाठी हेवी लूक हवा असेल, तर कुंदन आणि बारीक मोत्यांची गुंफण असलेले ढोलना पेंडंट मंगळसूत्राची डिझाईन निवडा. हे दिसायला अतिशय महागडे आणि प्रीमियम वाटते.
सध्या लांब मंगळसूत्रापेक्षा शॉर्ट आणि सिंगल सर मंगळसूत्राचा ट्रेण्ड आहे. यामध्ये छोटेसे ढोलना पेंडंट ऑफिस वेअरसाठी किंवा वेस्टर्न ड्रेससाठी परफेक्ट ठरते.
तरुणींमध्ये ऑक्सीडाइज्ड ज्वेलरीची मोठी क्रेझ आहे. कॉटन साडी किंवा कुर्तीवर ऑक्सीडाइज्ड ढोलना मंगळसूत्र एक कूल लूक देते.
डबल चेन ढोलना डिझाईनचं हे दोन साखळ्यांचं मंगळसूत्र स्टायलिश आणि ट्रेंडी दिसतं.
मूळ राजस्थानी ढोलना हे सहसा साध्या दोऱ्यात किंवा सोन्याच्या साखळीत घातले जायचे. पण महाराष्ट्रात याला 'मंगळसूत्राचा' साज देण्यात आला आहे. सोन्याच्या ढोलाला काळ्या मण्यांच्या सरामध्ये गुंफल्यामुळे याला एक अनोखा 'मराठमोळा' टच मिळाला आहे.