* शालिनी सिन्नरकर
बायका फार चिडचिड्या, कटकट्या असतात. सतत त्यांचे मूड जातात. काय रडू येतं. आता हसत असतात, पाच मिनिटांत घुम्या, उदास होतात. इतक्या का विचित्र वागतात, असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे?
त्याचं कारण आहे मेंटल लोड.
एकावेळी अनेक कामाचं ओझं त्यांच्यावर असतं. (Why women are moody? learn about mood swings psychology, understand women behaviour )म्हणजे ऑफिसात काम करत असताना सायंकाळी भाजी काय करायची, हा विचार डोक्यात असतोच.
भाजी करणं हे काम अवघड नसतं, त्यासाठीचे निर्णय करणं; कुणाला काय आवडेल, चालेल, कमी वेळात कसं होईल, जेवणाच्या वेळा कशा सांभाळल्या जातील, सकाळच्या शाळेच्या डब्याची तयारी कशी होईल, हे सगळं डोक्यात सुरूच असतं.(communication issues)
मल्टिटास्किंग केल्यानं मेंदूची ऊर्जा तर जास्त खर्च होतेच, तसेच मनावरचा ताण वाढत जातो.
महिलांवर असा मेंटल लोड प्रचंड असतो. घरातली कामं, त्यांचं नियोजन, मुलं, घरातले वडीलधारे, त्यांची काळजी, आजचं, उद्याचं, परवाचं नियोजन. कामाची यादी डोक्यातून संपतच नाही. एकामागून एक कामं, एकामागून एक विचार यांमुळे शीण येतो.
केवळ शरीर थकलं असं नाही, तर मनही थकलेलं असतं. मेंदू विचार करून, निर्णय घेऊन थकतो.
आता कुणाला वाटतंही की, एवढे काय जबाबदारीचे निर्णय घेतात? पण निर्णय लहान असो की मोठा मेंदूला तो घ्यावाच लागतो. त्यासाठी ताण येतो मनावर आणि आपला निर्णय चुकला तर काय, अशी भीतीही असतेच.
हे सतत होऊन होऊन दम लागतो आणि त्यामुळे चिडचिड वाढते. दुखणी-खुपणीही वाढते.
परिणामी अनेकींचे स्वभाव चिडचिडे, भुणभुणे होतात. (mental load)
खरं तर ती चिडचिड सांगत असते की, मला मदतीची गरज आहे. माझा लोड कमी करा; पण ती हाक कुणालाच ऐकू जात नाही, चिडचिड दिसते आणि थट्टेचा विषय होते.
