Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Mental Health > गुड आणि बॅड स्ट्रेसमध्ये असतो मोठा फरक, पाहा कसा ओळखाल आणि तो दूर करण्याचे उपाय

गुड आणि बॅड स्ट्रेसमध्ये असतो मोठा फरक, पाहा कसा ओळखाल आणि तो दूर करण्याचे उपाय

Good and Bad Stress : गुड स्ट्रेस आणि बॅड स्ट्रेसमधला फरक समजून घेऊया आणि त्याचा हेल्दी पद्धतीने सामना करण्याचे ५ उपाय जाणून घेऊया.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:25 IST2026-05-07T11:25:08+5:302026-05-07T11:25:37+5:30

Good and Bad Stress : गुड स्ट्रेस आणि बॅड स्ट्रेसमधला फरक समजून घेऊया आणि त्याचा हेल्दी पद्धतीने सामना करण्याचे ५ उपाय जाणून घेऊया.

Difference between bad stress and harness good stress, 5 effective ways to manage it | गुड आणि बॅड स्ट्रेसमध्ये असतो मोठा फरक, पाहा कसा ओळखाल आणि तो दूर करण्याचे उपाय

गुड आणि बॅड स्ट्रेसमध्ये असतो मोठा फरक, पाहा कसा ओळखाल आणि तो दूर करण्याचे उपाय

Good and Bad Stress : मीटिंगपूर्वी छातीत जडपणा जाणवणे, पहिल्या डेटपूर्वी पोटात गडबड होणे किंवा एखाद्या डेडलाइनपूर्वी घाम येणे असा ताण तुम्हालाही कधी ना कधी जाणवला असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, असा थोडासा स्ट्रेस तुमचं नुकसान करत नाही, उलट फायदेशीर ठरू शकतो? कंट्रोलमध्ये राहणाऱ्या ताणाला “गुड स्ट्रेस” म्हटलं जातं. हा ताण तुमचं लक्ष केंद्रित ठेवतो, प्रेरणा देतो आणि दबावातही काम करण्याची सवय लावतो. मात्र, हाच स्ट्रेस खूप काळ सतत टिकून राहिला तर तो “बॅड स्ट्रेस” मध्ये बदलू शकतो आणि आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. अशात गुड स्ट्रेस आणि बॅड स्ट्रेसमधला फरक समजून घेऊया आणि त्याचा हेल्दी पद्धतीने सामना करण्याचे ५ उपाय जाणून घेऊया.

स्ट्रेस हेल्दी आहे की अनहेल्दी कसे ओळखाल?

हे जाणून घेण्यासाठी स्वतःला दोन प्रश्न विचारा. पहिला म्हणजे ताण तुम्हाला प्रेरणा देतो की थकवतो?, दुसरा म्हणजे काम पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला हलके वाटते की ताण कायम राहतो?

जर काम संपल्यानंतर ताण कमी झाला आणि तुम्हाला आनंद किंवा समाधान वाटले, तर तो हेल्दी स्ट्रेस आहे. पण कामाचा ताण संपल्यानंतरही मन सतत अस्वस्थ राहत असेल, तर तो बॅड स्ट्रेस मानला जातो.

बॅड स्ट्रेसशी 'असा' सामना करा

सर्वप्रथम स्ट्रेस ओळखा

डोकेदुखी, अंग हलके वाटणे, चिडचिड यांसारखी लक्षणे दिसेपर्यंत अनेकांना आपण तणावात आहोत हेच कळत नाही. त्यामुळे शक्य तितक्या लवकर स्वतःचा स्ट्रेस ओळखणे महत्त्वाचे आहे.

छोटे छोटे ब्रेक्स घ्या

ताण कमी करण्यासाठी पूर्ण दिवस विश्रांती घेण्याची गरज नसते. फक्त ५ मिनिटांचा छोटासा ब्रेकही स्ट्रेस कमी करू शकतो, मानसिक थकवा दूर करू शकतो आणि पुन्हा फोकस वाढवू शकतो.

शारीरिक हालचाल आवश्यक आहे 

व्यायाम किंवा कोणतीही शारीरिक हालचाल स्ट्रेस कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरते. यामुळे कोर्टिसोलसारखे स्ट्रेस हॉर्मोन्स कमी होतात आणि मेंदूमध्ये आनंद देणारी रसायने वाढतात.

स्ट्रेस एकट्याने सहन करू नका

एकटेपणामुळे ताण अधिक वाढू शकतो. त्यामुळे मित्र, कुटुंबीय किंवा जवळच्या लोकांशी संपर्क ठेवा. मनातील गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करा. त्यामुळे तुम्हाला जाणवेल की तुम्ही एकटे नाही आहात.

रूटीनमध्ये छोटे बदल करा

दैनंदिन जीवनात अशा गोष्टींचा समावेश करा ज्यामुळे तुम्हाला शांतता आणि आनंद मिळतो. उदाहरणार्थ, आवडती रेसिपी बनवणे, पुस्तक वाचणे किंवा झोपण्यापूर्वी डायरी लिहिणे.

Web Title : अच्छा बनाम बुरा तनाव: अंतर पहचानें और इसे प्रबंधित करने का तरीका

Web Summary : अच्छा तनाव प्रेरित करता है, जबकि बुरा तनाव स्वास्थ्य को नुकसान पहुंचाता है। तनाव के कारणों को पहचानें, छोटे ब्रेक लें, व्यायाम करें, प्रियजनों से जुड़ें और स्वस्थ तनाव प्रबंधन के लिए अपनी दिनचर्या में आनंददायक गतिविधियों को शामिल करें।

Web Title : Good vs. Bad Stress: Recognize the Difference and How to Manage It

Web Summary : Good stress motivates, while bad stress harms health. Identify stress triggers, take short breaks, exercise, connect with loved ones, and incorporate enjoyable activities into your routine for healthy stress management.