बंगाली मिठाईची जादू पाडते प्रेमात, संदेश-चमचम-रसगुल्ला-७ मिठाया अतिशय चविष्ट आणि रसाळ
Updated:May 6, 2026 15:13 IST2026-05-06T15:05:28+5:302026-05-06T15:13:43+5:30
Bangali Sweet Special, Sandesh-Chamcham-Rasogulla-7 tasty and juicy recipes : बंगाली गोड पदार्थ म्हणजे कमी सामग्रीत चविष्ट रेसिपी.

बंगाली मिठाई म्हणजे जगभर प्रसिद्ध असलेली भारतीय खास पारंपरिक चव. अनेक प्रकारच्या मिठाई असतात. त्यापैकी ७ रेसिपी अशा आहेत ज्या घरी करणेही सहज शक्य आहे. फक्त प्रमाण आणि कृती व्यवस्थित शिकून घेणे गरजेचे.
रसगुल्ला ही बंगालमधील सर्वात प्रसिद्ध मिठाई मानली जाते. छेनापासून बनवलेले मऊ, पांढरे गोळे साखरेच्या पाकात भिजवलेले असतात. हलके आणि रसाळ असल्यामुळे प्रत्येक घासात गोडवा आणि ताजेपणा जाणवतो.
संदेश ही छेनापासून तयार होणारी आणखी एक लोकप्रिय मिठाई. ती साखरेसोबत हलक्या आचेवर बनवली जाते आणि साधारणपणे कोरडी व मऊसर असते. वेलची किंवा केशर घालून तिचा स्वाद अधिक वाढवला जातो.
मिष्टी दोई म्हणजे बंगाली गोड दही. दूध घट्ट करून त्यात साखर किंवा गूळ मिसळून सेट केलं जातं. याचा रंग थोडा तपकिरी आणि चव खूपच समृद्ध व गोडसर असते.
चमचम ही लांबट आकाराची मिठाई असून ती ही छेनापासून तयार केली जाते. साखरेच्या पाकात भिजवून त्यावर नारळाचा कीस किंवा मावा घातला जातो., त्यामुळे तिची चव आणि दिसणं दोन्ही आकर्षक असतं.
लंगचा ही मिठाई तळून तयार केली जाते आणि नंतर साखरेच्या पाकात भिजवली जाते. दिसायला गुलाबजामसारखी असली तरी तिची चव थोडी वेगळी आणि अधिक गोड असते.
पंतुआ ही मिठाई छेना आणि खवा एकत्र करून बनवली जाते. तळल्यानंतर साखरेच्या पाकात ठेवली जाते, त्यामुळे ती आतून मऊ आणि बाहेरून हलकी घट्ट अशी लागते.
खीर कदंब ही खास प्रकारची बंगाली मिठाई आहे. आतमध्ये रसगुल्ल्यासारखा मऊ आणि रसाळ गोळा असतो, तर बाहेरुन खव्याचा थर दिलेला असतो. त्यामुळे एकाच मिठाईत दोन वेगळ्या चवींचा अनुभव मिळतो.