कळतंय पण वळत नाही; विनाकारण स्क्रोलिंग करत बसण्याची सवय घालविण्यासाठी ५ साेपे उपाय
Updated:May 6, 2026 15:04 IST2026-05-06T14:57:40+5:302026-05-06T15:04:25+5:30

स्क्रोलिंग करत तासनतास स्क्रिन बघत बसण्याची सवय हल्ली खूप लोकांना आहे. यामध्ये लहान मुलांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळ्याच वयोगटातले लोकं आहेत.
बरं स्क्रिन बघण्याची सवय आपल्याला लागली आहे, ती कमी करायची आहे, हे आरोग्यासाठी चांगलं नाही.... हे सगळं या लोकांना कळत असतं. पण तरीही मोबाईल हातात आला की स्वत:वरचा ताबा सुटतो आणि मग विनाकारण स्क्रोलिंग करण्यात खूप वेळ वाया जातो.
तुम्हालाही ही सवय कमी करायची असेल तर पुढे सांगितलेल्या काही साध्या सोप्या टिप्स लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे मोबाईलवरचे सगळे नोटिफिकेशन्स बंद करून टाका. म्हणजे मग आपलं लक्ष विचलित होत नाही.
अनुलोम विलोम, कपालभाती, दिर्घश्वसन असे प्राणायाम आपलं मन शांत ठेवण्यासाठी मदत करतात. मन चंचल असलं की ते मोबाईलकडे आकर्षिलं जाण्याची शक्यता खूप वाढते.
एकदम मोबाईलची सवय कमी होणार नाही. त्यामुळे खूप जास्त वेळेच टार्गेट स्वत:ला देऊ नका. पण पुढचा १ तास मी मोबाईल पाहणार नाही हे ठरवून टाका आणि तो नियम पाळा. हळूहळू हा एक तासाचा वेळ वाढवत न्या. मोबाईलपासून आपोआप दूर व्हायला लागाल.
मोबाईल हातात घेतला तरी तो ५ मिनिटांच्या आत पुन्हा जागेवर ठेवून द्यायचा हा नियम स्वत:साठी आखून घ्या आणि तो काटेकोरपणे पाळा.
रिकामा वेळ असेल तर तुमच्या इतर छंदांना वेळ द्या. म्हणजे मग मोबाईलचं व्यसन आपोआप कमी होईल.