Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Health >Menstrual Cycle > मूड स्विंग-पोटदुखी, पिरेएड्समधील ७ समस्यांवर स्वयंपाकघरातील पदार्थच आहे रामबाण उपाय, मिळेल लगेच आराम...

मूड स्विंग-पोटदुखी, पिरेएड्समधील ७ समस्यांवर स्वयंपाकघरातील पदार्थच आहे रामबाण उपाय, मिळेल लगेच आराम...

kitchen ingredients for period problems : natural remedies for menstrual problems : मासिक पाळीतील कोणत्या त्रासासाठी नेमके कोणते पदार्थ खावेत, पहा आराम देणारे सोपे घरगुती उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2026 17:24 IST2026-05-07T17:17:51+5:302026-05-07T17:24:34+5:30

kitchen ingredients for period problems : natural remedies for menstrual problems : मासिक पाळीतील कोणत्या त्रासासाठी नेमके कोणते पदार्थ खावेत, पहा आराम देणारे सोपे घरगुती उपाय...

kitchen ingredients for period problems natural remedies for menstrual problems | मूड स्विंग-पोटदुखी, पिरेएड्समधील ७ समस्यांवर स्वयंपाकघरातील पदार्थच आहे रामबाण उपाय, मिळेल लगेच आराम...

मूड स्विंग-पोटदुखी, पिरेएड्समधील ७ समस्यांवर स्वयंपाकघरातील पदार्थच आहे रामबाण उपाय, मिळेल लगेच आराम...

स्त्रीच्या आरोग्यात मासिक पाळीचे चक्र अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, बदलती लाईफस्टाईल आणि चुकीचा आहार यामुळे आज बहुतांश महिलांना पाळीशी संबंधित कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागते. पाळी आली की अनेक स्त्रियांच्या मनात धडकी भरते. कुणाला पोटदुखीचा त्रास, कुणाला कंबरदुखी, तर कुणाला होणाऱ्या हेवी ब्लीडिंगमुळे घराबाहेर पडणंही कठीण होतं. आपण या त्रासासाठी अनेकदा पेनकिलर्स घेतो, पण त्याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. हार्मोन्समधील बदल, चुकीचा आहार आणि बदलती लाईफस्टाईल यामुळे या समस्या अधिक वाढू शकतात. अशावेळी योग्य आहार घेणं खूप महत्त्वाचं ठरतं. काही विशिष्ट पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात, हार्मोन्स संतुलित ठेवण्यास मदत करतात आणि पाळीशी संबंधित त्रास कमी करू शकतात(kitchen ingredients for period problems).

पाळी दरम्यान येणाऱ्या सर्व समस्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी आपल्या किचनमधील काही 'सुपरफूड्स' फायदेशीर ठरतात. पाळी दरम्यान येणाऱ्या कोणत्या समस्येसाठी कोणता पदार्थ औषधासारखं काम करतो याबद्दल अधिक माहिती इंस्टाग्रामवरील डॉक्टर अनुशी जैन यांनी एक पोस्ट शेअर करत सांगितली आहे. पिरेड्सदरम्यान होणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांपासून आराम हवा असेल, तर कोणत्या त्रासासाठी नेमके कोणते पदार्थ खावेत हे जाणून घेणं गरजेचं आहे. पाळीशी संबंधित ७ कॉमन समस्यांसाठी (natural remedies for menstrual problems) फायदेशीर ठरणारे पदार्थ कोणते आहेत ते पाहूयात. 

मासिक पाळीतील कोणत्या त्रासासाठी नेमके कोणते पदार्थ खावेत ? 

१. पोटदुखी, क्रॅम्ससाठी जिऱ्याचे पाणी :- मासिक पाळीच्या दरम्यान होणारा पोटदुखीचा त्रास (Cramps) कमी करण्यासाठी जिऱ्याचे पाणी हा एक अत्यंत फायदेशीर आणि नैसर्गिक उपाय आहे. मासिक पाळीच्या काळात गर्भाशयाचे स्नायू आकुंचन पावतात, ज्यामुळे तीव्र वेदना आणि क्रॅम्स येतात. जिऱ्यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मांमुळे या वेदना कमी होण्यास मोठी मदत होते. जिऱ्यामध्ये अँटी-स्पास्मोडिक गुणधर्म असतात. ते गर्भाशयाच्या स्नायूंना शिथिल करतात, ज्यामुळे पोटात येणारे गोळे किंवा क्रॅम्स त्वरित कमी होतात. पाळीच्या दरम्यान अनेक महिलांना गॅस, अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाचा जडपणा कमी होतो. जिरे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि वेदना कमी होतात. जिऱ्यामध्ये लोहाचे प्रमाण भरपूर असते. पाळीच्या काळात शरीरातील रक्त कमी झाल्यामुळे येणारा अशक्तपणा जिऱ्याच्या पाण्यामुळे कमी होऊ शकतो. एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे टाका. हे पाणी ५ ते १० मिनिटे चांगले उकळून घ्या. पाणी अर्धे झाल्यावर ते गाळून कोमट असताना प्या. किंवा रात्री एक ग्लास पाण्यात एक चमचा जिरे भिजत घाला. सकाळी हे पाणी थोडे गरम करून रिकाम्या पोटी प्या.

चिनी महिला चाळिशी ओलांडली तरी दिसतात विशीतल्या तरुणी! पाहा त्या काय करतात रोज...

२. हेवी ब्लिडींगसाठी मनुका, खजूर :- मासिक पाळीत होणाऱ्या अति-रक्तस्त्रावामुळे (Heavy Bleeding) शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होऊन अशक्तपणा जाणवतो अशावेळी खजूर आणि भिजवलेले मनुके खाणं फायदेशीर ठरते. जर खूप जास्त ब्लीडिंग होत असेल, तर आहारात खजूर आणि भिजवलेले मनुके  यांचा समावेश करा. हे पदार्थ शरीरातील लोहाची पातळी टिकवून ठेवण्यास आणि अशक्तपणा कमी करण्यास मदत करतात. रात्री ८ ते १० मनुके अर्धा ग्लास पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी ते पाणी प्या व मनुके चावून खा. दिवसातून २ ते ३ खजूर तुम्ही नाश्त्याच्या वेळी किंवा मधल्या वेळेत खाऊ शकता.

३. मूड स्विंगसाठी केळ आणि भाजलेले चणे :- पाळी येण्यापूर्वी किंवा त्या दरम्यान चिडचिड होणे, विनाकारण रडू येणे किंवा मूड खराब होणे (Mood Swings) हा त्रास अनेकींना होतो. अशावेळी केळी किंवा भाजलेले चणे खाणे खूप फायदेशीर ठरते. केळीमध्ये व्हिटॅमिन B6 आणि पोटॅशियम असते, जे मेंदूतील 'हॅप्पी हार्मोन्स' वाढवण्यास मदत करतात, तर भाजलेले चणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवून चिडचिड कमी करतात.

स्टिल - पितळ की माती...कोणत्या भांड्यात दूध तापवावं ? 'या' भांड्याचा करा उपयोग - साय येईल जाडजूड...

४. पाळी येण्यापूर्वी होणारे गोड खाण्याचे क्रेविंग्स :- पाळी सुरू होण्यापूर्वी अनेकींना गोड खाण्याची तीव्र इच्छा होते. अशा वेळी चॉकलेट किंवा मिठाईऐवजी डार्क चॉकलेट, खजूर, सुकामेवा, दही किंवा सीड्स खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. हे पदार्थ रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवतात आणि ऊर्जा देतात.

५. पाळी उशिरा येणे :- जर तुमची पाळी वेळेवर येत नसेल, तर तीळ आणि गूळ खाणे खूप फायदेशीर ठरते. तुम्ही 'तिळाचे लाडू' देखील खाऊ शकता. तीळ आणि गूळ दोन्ही उष्ण पदार्थ आहेत. जे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास आणि पाळी नियमित करण्यास मदत करतात.

६. पोट फुगणे किंवा गॅस होणे :- मासिक पाळी दरम्यान शरीरातील हार्मोन्समध्ये बदल झाल्यामुळे पचन संस्था मंदावते, ज्यामुळे गॅस आणि अपचनाचा त्रास होतो. ओव्यामध्ये 'थायमॉल' नावाचे घटक असते, जे पाचक रसांना सक्रिय करते आणि अन्न वेगाने पचण्यास मदत करते. यामुळे पोटात साठलेला गॅस बाहेर पडण्यास मदत होऊन पोटाचा जडपणा कमी होतो. एक ग्लास पाण्यात एक चमचा ओवा टाकून ते पाणी उकळून घ्या. हे पाणी गाळून कोमट असताना प्यायल्याने पोटाला त्वरित आराम मिळतो आणि पचनाच्या तक्रारी दूर होतात.

७. पाळी दरम्यान थकवा जाणवणे :- पाळीच्या दिवसात शरीराला ऊर्जेची जास्त गरज असते. मऊ शिजवलेली खिचडी आणि तूप पचायला हलके असते आणि शरीराला तात्काळ ताकद देते. मासिक पाळीच्या काळात जाणवणाऱ्या थकव्यावर 'खिचडी आणि तूप' हा उपाय फायदेशीर आहे. तांदूळ हा 'कार्बोहायड्रेट्स'चा उत्तम स्त्रोत आहे. मऊ शिजवलेली खिचडी शरीराला लगेच ग्लुकोज पुरवते, ज्यामुळे थकवा दूर होऊन तात्काळ ताकद मिळते. खिचडी हा एक 'कम्फर्ट फूड' प्रकार आहे जो पोटावर अजिबात ताण पडू देत नाही. शरीर ही वाचलेली ऊर्जा पचनाऐवजी थकवा भरून काढण्यासाठी वापरू शकते.

Web Title : मासिक धर्म की 7 समस्याओं के लिए रसोई सामग्री: प्राकृतिक उपचार, तुरंत राहत

Web Summary : रसोई सामग्री से मासिक धर्म की समस्याओं का स्वाभाविक रूप से प्रबंधन करें। जीरा पानी ऐंठन को आसान बनाता है, खजूर भारी रक्तस्राव में मदद करता है, और केले मूड स्विंग को संबोधित करते हैं। सामान्य मासिक धर्म के मुद्दों के लिए अधिक प्राकृतिक उपचार खोजें।

Web Title : Kitchen Ingredients: Natural Remedies for 7 Period Problems, Get Instant Relief

Web Summary : Manage period problems naturally with kitchen ingredients. Cumin water eases cramps, dates help with heavy bleeding, and bananas address mood swings. Discover more natural remedies for common menstrual issues.