स्वयंपाकघरात पाऊल टाकलं की पहिलं काम असतं ते म्हणजे दूध उकळवणं. साधं - सोपं वाटणारं हे काम योग्य भांड्यात केलं, तर दूधाची चव, गुणवत्ता आणि सुरक्षितता टिकून राहते; पण याउलट चुकीचं भांडं वापरल्यास दूध पटकन करपणं, उतू जाणं किंवा त्यातील पोषक घटकांवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे “दूध उकळण्यासाठी नेमकं कोणतं भांडं सर्वोत्तम?” हा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. दुधाला आपण 'पूर्णान्न' मानतो, पण हे पूर्णान्न शरीराला तेव्हाच लाभतं जेव्हा ते योग्य पद्धतीने आणि योग्य भांड्यात उकळलं जातं. आपण बाजारातून चांगलं दूध तर आणतो, पण ते उकळण्यासाठी कोणतंही भांडं सर्रास वापरतो. चुकीच्या धातूच्या भांड्यात दूध उकळल्याने त्यामध्ये रासायनिक प्रक्रिया होऊन दुधाची चव आणि गुणधर्म दोन्ही बिघडू शकतात(best utensil for boiling milk).
स्टील, पितळ की मातीचं भांडं? आरोग्यासाठी 'वरदान' ठरणारं दूध 'विष' ठरू नये असं वाटत असेल तर दूध उकळवण्यासाठी योग्य भांड्याची निवड करणं देखील तितकंच (which vessel is best for boiling milk) गरजेच असतं. स्टेनलेस स्टील, अॅल्युमिनियम, नॉन-स्टिक किंवा पारंपारिक जाड बुडाचं भांडं - प्रत्येक पर्यायाचे काही फायदे आणि तोटे आहेत. योग्य भांड्याची निवड केल्यास दूध व्यवस्थित उकळतं, गॅसची बचत होते आणि साफसफाईही करणे सोपे होते. दूध उकळण्यासाठी (which utensil is best for boiling milk) कोणतं भांडं सर्वात योग्य आहे आणि निवड करताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात ते पाहूयात.
दूध उकळवण्यासाठी कोणतं भांड वापरावं ?
१. स्टेनलेस स्टील (Stainless Steel) :- आजकाल जवळपास प्रत्येक घरात स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांचा वापर केला जातो. दूध उकळवण्यासाठी हा सर्वात सुरक्षित आणि सोपा पर्याय मानला जातो, कारण स्टील दुधासोबत कोणतीही रासायनिक प्रक्रिया करत नाही आणि त्यामुळे दुधातील पोषक तत्वे सुरक्षित राहतात. जर योग्य पद्धतीने दूध गरम केले, तर ते जळण्याचा किंवा खाली लागण्याचा धोकाही कमी असतो. यासाठीच, दूध उकळवण्यासाठी स्टीलची भांडी सर्वोत्तम मानली जातात. रोजच्या वापरासाठी स्टेनलेस स्टील हे सर्वात उत्तम आणि सुरक्षित भांडं मानलं जातं. स्टील दुधासोबत कोणतीही रासायनिक प्रक्रिया करत नाही, ज्यामुळे दुधाचे नैसर्गिक गुणधर्म बदलत नाहीत. यामध्ये दूध उकळल्याने त्यातील पोषक तत्वे जशीच्या तशी राहतात. यासाठीच, दूध उकळवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचं भांडं सगळ्यांत उत्तम मानलं जातं.
ताज्या रसाळ आंब्याचे करा पिवळेधमक मँगो रवा लाडू, उन्हाळ्यातला सुपरहिट पदार्थ-पाहा लाडू रेसिपी...
२. मातीची भांडी (Clay Pots) :- स्टीलव्यतिरिक्त मातीच्या भांड्यात दूध उकळणे देखील आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. जुन्या काळी गावांमध्ये दूध प्रामुख्याने मातीच्या भांड्यातच उकळले जात असे. मातीच्या भांड्यात दूध हळूहळू गरम होते, ज्यामुळे त्याची चव अधिक चांगली राहते. तसेच, यामध्ये दूध जळण्याची किंवा खाली लागण्याची शक्यताही कमी असते. माती दुधाला पूर्णपणे नैसर्गिक बनवते आणि त्यामुळे ते पचायला सोपे जाते.
३. कांस्य आणि पितळ (Bronze and Brass) :- आयुर्वेदानुसार, कांस्य आणि पितळाची भांडी अन्नाचा समतोल राखण्यास मदत करतात. मात्र, या भांड्यांची स्वच्छता आणि योग्य निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे; अन्यथा, यातील धातू दुधावर परिणाम करू शकतात. म्हणूनच, दूध उकळण्यासाठी या भांड्यांचा वापर शक्यतो टाळावाचं.
४. ॲल्युमिनियमची भांडी (Aluminum Pots) :- जर तुम्ही दूध उकळण्यासाठी ॲल्युमिनियमच्या भांड्याचा वापर करत असाल, तर ही मोठी चूक ठरु शकते. हे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, कारण जास्त उष्णतेमुळे हा धातू दुधासोबत रासायनिक प्रक्रिया करतो. दीर्घकाळ याचा वापर करणे आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही. यासाठीच, ॲल्युमिनियमच्या भांड्यात दूध तापवणे टाळावे.
ना जिम ना फॅन्सी डाएट, घरीच करा ७ व्यायाम, ढेरी कमी होऊन महिनाभरात दिसू लागाल फिट...
५. नॉन-स्टिक भांडी (Nonstick Cookware) :- नॉन-स्टिक भांड्यांचा वापर आजकाल सोयीसाठी वाढला आहे, पण दूध उकळण्यासाठी ही भांडी वापरणे आरोग्यासाठी मोठे घातक ठरू शकते. या भांड्यांवर टेफ्लॉनसारख्या विशिष्ट रसायनांचा थर असतो. जेव्हा आपण ही भांडी जास्त तापमानावर गरम करतो, तेव्हा त्यातील घातक रसायने बाहेर पडू लागतात आणि ती थेट दुधात मिसळण्याचा धोका असतो. ही हानिकारक रसायनं वारंवार पोटांत जाण धोक्याचं ठरु शकतं, यासाठीच दूध उकळवण्यासाठी नॉन-स्टिक भांड्याचा वापर चुकूनही करु नये.
