भाजीपाल्यापासून दुधापर्यंत फ्रिजशिवाय सर्व काही राहील ताजं! उन्हाळ्यात अन्न खराब न होण्यासाठी ८ स्मार्ट ट्रिक्स...
Updated:May 5, 2026 20:00 IST2026-05-05T20:00:00+5:302026-05-05T20:00:06+5:30
how to store food without refrigeration during summer season : natural ways to preserve food without fridge : best ways to preserve food in hot weather naturally : रणरणत्या उन्हात अन्नपदार्थ ताजे ठेवण्याच्या ८ ट्रिक्स, लाईट गेली तरी टेन्शन नाही, फ्रिजशिवाय अन्नपदार्थ टिकतील दीर्घकाळ

natural ways to preserve food without fridge
सध्याच्या रणरणत्या उन्हाळ्यात अन्न लवकर खराब होणं ही प्रत्येक घरातील मोठी समस्या असते. विशेषतः फ्रिज उपलब्ध नसल्यास किंवा सतत वापर शक्य नसल्यास अन्न ताजं ठेवणं अधिकच अवघड होतं. उकाडा, आर्द्रता आणि जास्त तापमानामुळे अन्न पटकन बिघडतं, त्यामुळे आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो. पण काळजी करू नका! आपल्या पारंपारिक पद्धती आणि काही सोप्या घरगुती उपायांच्या मदतीने फ्रिजशिवायही अन्न बराच वेळ ताजं ठेवता येऊ शकतं. योग्य साठवण, नैसर्गिक उपाय आणि काही स्मार्ट ट्रिक्स वापरल्यास अन्नाची चव आणि गुणवत्ता दोन्ही टिकवून ठेवणं शक्य आहे(how to keep food fresh without refrigerator in summer).
how to store food without refrigeration during summer season
कडाक्याचा उन्हाळा सुरू झाला की गृहिणींची सर्वात मोठी डोकेदुखी असते ती म्हणजे 'अन्न खराब होणे'. दुपारची भाजी संध्याकाळपर्यंत टिकत नाही, दूध फाटतं आणि भाज्या सुकतात. पण प्रत्येक वेळी फ्रिज असलाच पाहिजे असं नाही. परंतु आपल्याकडे अशा काही सोप्या ट्रिक्स आहेत, ज्यांच्या मदतीने आपण फ्रिजशिवायही जेवण तासंतास ताजे, फ्रेश ठेवू शकतो(best ways to preserve food in hot weather naturally).
१. ओल्या सुती कपड्याचा वापर :-
पालेभाज्या आणि फळभाज्या सुती (कॉटन) कपड्यात गुंडाळून ठेवा. कपडा वाळल्यास त्यावर पाण्याचा शिडकावा करा. यामुळे भाज्यांचा टवटवीतपणा टिकून राहतो.
२. पाण्याच्या ताटाची पद्धत :-
शिजवलेलं अन्न (उदा. आमटी, भाजी) एका भांड्यात काढून ते भांडे पाण्याने भरलेल्या मोठ्या ताटात किंवा परातीत ठेवा. या पाण्यामुळे अन्नाला नैसर्गिक थंडावा मिळतो.
३. दूध वारंवार उकळणे :-
दुधाला दिवसातून किमान २ ते ३ वेळा चांगली उकळी आणा. याने दूध फाटत नाही आणि जास्त काळ टिकते.
४. कांदा-बटाटा वेगळा ठेवणे :-
बटाट्याचा पोत आणि चव टिकवण्यासाठी कांदे आणि बटाटे कधीही एकत्र ठेवू नका. ते नेहमी हवेशीर, कोरड्या आणि अंधाऱ्या जागी वेगवेगळ्या टोपल्यांमध्ये ठेवा.
५. कागदाचा वापर :-
कोथिंबीर, कढीपत्ता, आणि पुदिना वर्तमानपत्रात किंवा टिश्यू पेपरमध्ये गुंडाळून डब्यात ठेवा. कागद जास्तीचा ओलावा शोषून घेतो आणि पाने काळी पडत नाहीत.
६. लिंबांसाठी खास टीप :-
लिंबांना थोडं गोडेतेल (खाण्याचे तेल) लावून एका बरणीत किंवा डब्यात ठेवा. यामुळे लिंबांची साल सुकत नाही आणि लिंबू जास्त काळ रसाळ राहतात.
७. मीठ आणि तेलाचा वापर :-
कणिक मळताना त्यात थोडं तेल आणि मीठ जास्त घाला, कणिक लवकर आंबट होत नाही. तसेच, कापलेल्या फळांवर किंवा भाज्यांवर थोडं मीठ किंवा लिंबू पिळल्यास ते काळे पडत नाहीत.
८. मातीची भांडी :-
शक्य असल्यास भाज्या किंवा फळे ठेवण्यासाठी मातीच्या पसरट मडक्याचा वापर करा. मडक्याभोवती ओली वाळू किंवा पाण्याने ओलं केलेलं कापड गुंडाळून ठेवल्यास तो तुमचा नैसर्गिक 'कुलर' बनतो.