कीड पडल्याने कुंडीतल्या रोपांची वाढच खुंटली? स्वयंपाकघरातले ४ पदार्थ शिंपडा- बुरशी आणि कीड विसरा..

Updated:May 5, 2026 14:49 IST2026-05-05T14:42:05+5:302026-05-05T14:49:56+5:30

कीड पडल्याने कुंडीतल्या रोपांची वाढच खुंटली? स्वयंपाकघरातले ४ पदार्थ शिंपडा- बुरशी आणि कीड विसरा..

बऱ्याचदा असं हाेतं की कुंडीत लावलेल्या रोपांवर काहीतरी रोग पडतो. रोग पडला की मग रोपांची वाढ चांगली होत नाही. रोपांची पानं कुरतडल्यासारखी दिसू लागतात. कळ्यांवर बारीक किडे दिसू लागतात. त्यामुळे मग कळ्याही नीट वाढून त्यांची फुलं होत नाहीत.

कीड पडल्याने कुंडीतल्या रोपांची वाढच खुंटली? स्वयंपाकघरातले ४ पदार्थ शिंपडा- बुरशी आणि कीड विसरा..

शिवाय बऱ्याचदा रोपांना लागलेली कीड एका रोपावरून दुसऱ्या रोपावरही जाते. त्यामुळे मग बऱ्याच रोपांचं नुकसानही होतं. हे सगळं टाळायचं असेल तर पुढे सांगितलेला एक सोपा घरगुती उपाय करून पाहा..

कीड पडल्याने कुंडीतल्या रोपांची वाढच खुंटली? स्वयंपाकघरातले ४ पदार्थ शिंपडा- बुरशी आणि कीड विसरा..

हा उपाय करण्यासाठी एका बादलीमध्ये १० लीटर पाणी घ्या. आणि त्यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण लीटर दूध घाला.

कीड पडल्याने कुंडीतल्या रोपांची वाढच खुंटली? स्वयंपाकघरातले ४ पदार्थ शिंपडा- बुरशी आणि कीड विसरा..

आता यामध्ये २ टेबलस्पून हळद आणि १ टीस्पून हिंग घाला. हिंग आणि हळदीमधले ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल घटक रोपांना निरोगी ठेवण्यास मदत करतात.

कीड पडल्याने कुंडीतल्या रोपांची वाढच खुंटली? स्वयंपाकघरातले ४ पदार्थ शिंपडा- बुरशी आणि कीड विसरा..

आता साधारण १०० ते १५० ग्रॅम गूळ घ्या आणि तो पाण्यात पुर्णपणे विरघळून घ्या. आता हे गुळाचं पाणीही त्यात मिसळा. आता हे झालं तुमचं घरगुती किटकनाशक तयार.

कीड पडल्याने कुंडीतल्या रोपांची वाढच खुंटली? स्वयंपाकघरातले ४ पदार्थ शिंपडा- बुरशी आणि कीड विसरा..

हे पाणी १५ दिवसांतून एकदा रोपांवर शिंपडा आणि थोडं थोडं कुंडीतल्या मातीतही घाला. रोपांवरची कीड निघून जाईल आणि ती छान निरोगी होतील.