मनासारखी प्रगती होत नाही- बॉस सतत रागावतो? करा ७ गोष्टी, टार्गेट होईल पूर्ण- प्रमोशनही मिळेल
Updated:May 4, 2026 21:00 IST2026-05-04T21:00:00+5:302026-05-04T21:00:02+5:30
Career growth tips during appraisal season: How to increase your value in office: स्वत:मध्ये ७ बदल केल्यास ऑफिसमध्ये मानसन्मानही वाढेल आणि प्रमोशनही मिळेल.

बरेचदा ऑफिसमध्ये आपण जीव तोडून काम करतो, पण तरीही मनासारखी प्रगती होताना काही दिसत नाही. टार्गेट्स पूर्ण होऊनही बॉसची सतत किरकिर आणि कामावर असमाधान व्यक्त करण्याची वृतीत आपल्याला मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकवून टाकते. कामाचा ताण, मानसिक अस्वस्थता, टार्गेट यासगळ्यांमध्ये आपण इतके गुंतून जातो की समोरची परिस्थिती आपल्याला हाताळता येत नाही. (Career growth tips during appraisal season)
कॉर्पोरेट जगात केवळ 'हार्ड वर्क' करून चालत नाही, तर तिथे आपला 'स्मार्ट वर्क' आणि व्यक्तिमत्वाचाही मोठा वाटा असतो. सध्या अप्रेझल (Appraisal) काळ सुरू आहे, अशा वेळी जर आपल्याला आपले स्थान भक्कम करायचे असेल, तर स्वतःमध्ये काही जाणीवपूर्वक बदल करणे आवश्यक आहे. स्वत:मध्ये ७ बदल केल्यास ऑफिसमध्ये मानसन्मानही वाढेल आणि प्रमोशनही मिळेल. (How to increase your value in office)
बॉसशी संवाद साधताना नेहमी स्पष्ट आणि मुद्द्याच बोला. दिलेल्या कामाबद्दलचे अपडेट्स स्वत:हून कळवा. ज्यामुळे त्यांना ते सतत विचारण्याची गरज पडणार नाही.
ऑफिसला वेळेवर येणे म्हणजे वेळेचे नियोजन नव्हे, तर दिलेली कामे डेडलाईनच्या आता पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. कामाची प्राथमिकता ठरवा, यामुळे शेवटच्या क्षणी होणारी धावपळ थांबेल.
ज्यावेळी आपण बॉसकडे कोणतीही समस्या घेऊन जातो तेव्हा त्यासोबत किमान दोन उपायही सुचवा. यामुळे आपली 'प्रॉब्लेम सॉल्वर' अशी प्रतिमा तयार होईल.
आपलं दिसणं आणि वागणं हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. प्रोफेशनल पेहराव आणि सकारात्मक बॉडी लँग्वेजमुळे लोकांचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो.
आपल्या क्षेत्रात नवीन तंत्रज्ञान किंवा स्किल्स आत्मसात करा. यामुळे आपण इतरांपेक्षा नेहमी वेगळे आणि दोन पाऊल पुढे असू.
बॉसने केलेल्या टीकेकडे वैयक्तिक अपमान म्हणून न पाहता, सुधारणेची संधी म्हणून पाहा. आपल्यात झालेला बदल बॉसला दिसून आला की ते आपल्याशी नीट वागू लागतील.
फक्त स्वत:च्या प्रगतीचा विचार न करता टीमला देखील मदत करा. एक चांगला लीडर तोच असतो जो सर्वांना सोबत घेऊन काम करतो.