कोणताही खर्च न करता घरबसल्या वेटलॉस करण्यासाठी ८ टिप्स! जिम - डाएट विसरा, 'असं' घटवा वाढलेलं वजन...
Updated:May 4, 2026 17:52 IST2026-05-04T17:42:04+5:302026-05-04T17:52:48+5:30
8 habits to lose weight without gym and dieting : simple daily habits for weight loss : daily routine habits for quick weight loss : वेटलॉससाठी आता जिम किंवा घाम गाळण्याची गरज नाही, 'या' ८ सवयी बदलतील तुमचं आयुष्य...

8 habits to lose weight without gym and dieting
अनेकदा आपण वजन कमी करायचं असं मनाशी ठरवतो, पण जिमसाठी वेळ नसणे किंवा डाएट पाळणं न जमल्यामुळे आपण तो मध्येच सोडून देतो. वजन कमी करण्यासाठी जिमला जाणं किंवा कठोर डाएट फॉलो करणं अनेकांना अवघड वाटतं. पण खरं सांगायचं तर, वजन कमी करण्यासाठी नेहमीच कठोर मेहनत किंवा उपासमारीची गरज नसते.
simple daily habits for weight loss
दररोजच्या लाईफस्टाईल मध्ये काही छोटे बदल केले, तर सहज आणि नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करता येऊ शकतं. काही सोप्या सवयी वेळीच स्वतःला लावून घेतल्या तर शरीराचा मेटाबॉलिझम सुधारतो, अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात आणि हळूहळू वजन नियंत्रणात येऊ लागतं. विशेष म्हणजे या सवयी पाळण्यासाठी ना जिमची गरज आहे, ना कठीण डाएट प्लॅनची.
how to lose weight naturally at home without diet & exercise
जर तुम्हीही “कमी कष्टात जास्त परिणाम” मिळवण्याचा विचार करत असाल, तर या ८ सोप्या सवयी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. या सवयी केवळ वजन कमी करण्यातच मदत करत नाहीत, तर एकूणच आरोग्य सुधारण्यासाठीही फायदेशीर ठरतात. जिम किंवा डाएटची मदत न घेता वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर असणाऱ्या ८ सवयीं नेमक्या कोणत्या ते पाहूयात.
१. जंक फूड पूर्णपणे बंद करु नका :-
वेटलॉस करताना जंक फूड पूर्णपणे बंद करण्याची चूक करू नका. जर तुम्हाला बर्गर खाण्याची इच्छा झाली, तर तो खा. परंतु योग्य प्रमाणांत खा. एकावेळी एक पूर्ण बर्गर खाण्याऐवजी अर्धाच बर्गर खा, असे केल्याने खाण्याची इच्छा पूर्णपणे मारली जात नाही. याउलट जर जंक फूड खाण्याची इच्छा दाबून टाकली तर नंतर जेव्हा आपण काही जंक फूड खातो तेव्हा ते दुप्पट किंवा जास्त प्रमाणात खाल्ले जाते आणि वजन वाढते असे होऊ नये म्हणून योग्य प्रमाणात क्वचित कधीतरी जंक फूड खा.
२. दररोज किमान चालण्याचा व्यायाम करावा :-
आपल्या वेळेनुसार दररोज किमान चालण्याचा व्यायाम तरी न चुकता करावा. मग ते फक्त १५ मिनिटे का असेना. दररोज किमान १०,००० पावले चालण्याचा प्रयत्न करावा हळूहळू हे प्रमाण वाढवत न्यावे.
३. रात्रीच्या जेवणात प्रोटीनयुक्त पदार्थांचा समावेश करा :-
रात्रीच्या जेवणात भात आणि चपातीऐवजी पनीर, डाळ खाणे अधिक फायदेशीर ठरते. शा प्रकारे जेवल्यामुळे सकाळी उठल्यावर शरीराला खूप हलके वाटते. शरीरातील कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी केल्यामुळे वजन वेगाने घटण्यास मदत होते.
४. सावकाश जेवणे :-
अनेक लोक घाईघाईने जेवून आपली प्लेट लवकर रिकामी करतात, ज्यामुळे अन्नाचे प्रमाण लक्षात येत नाही. जेव्हा आपण सावकाश जेवतो, तेव्हा मेंदूला पोट भरल्याचा संकेत मिळण्यास पुरेसा वेळ मिळतो, परिणामी आपण कमी प्रमाणात अन्न खातो. घास नीट चावून आणि सावकाश खाल्ल्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होते. घाईत जेवल्यामुळे अनेकदा जास्त कॅलरीज शरीरात जातात, याउलट सावकाश जेवल्याने 'ओव्हरईटिंग' टाळता येते आणि वजन कमी करण्यास मदत होते.
५. प्रत्येक जेवणापूर्वी पाणी पिणे :-
जेवणापूर्वी पाणी पिणे ही कमी आहार घेण्याची एक सर्वोत्तम पद्धत आहे. वजन कमी करण्यासाठी जेवणापूर्वी एक पूर्ण ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. ही साधी सवय वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. जेवणाआधी पाणी प्यायल्याने पोट आधीच थोडे भरलेले वाटते, ज्यामुळे आपण गरजेपेक्षा जास्त अन्न खात नाही आणि पर्यायाने कॅलरीजचे प्रमाण कमी होते. पाण्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते आणि चयापचय क्रिया वेगवान होते, ज्यामुळे चरबी जाळण्यास मदत मिळते.
६. दररोज वजन मोजणे बंद करा :-
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक अनेकदा दररोज वजन मोजतात, ज्यामुळे वजन कमी न दिसल्यास ते त्रस्त होतात किंवा त्यांना टेन्शन येते. दररोज वजन पाहण्याऐवजी आठवड्यातून फक्त एकदाच वजन मोजल्यास प्रगतीचा अंदाज घेणे सोपे जाते. वारंवार वजन मोजल्याने नैराश्य येऊ शकते, त्यामुळे दररोज वजन मोजणे बंद करा. वजन रोज कमी-जास्त होत असते, त्यामुळे आकड्यांपेक्षा आपल्या प्रयत्नांतील सातत्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक फायदेशीर ठरते.
७. पुरेशी झोप :-
अपुऱ्या झोपेमुळे तुमची इच्छाशक्ती कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे अनहेल्दी पदार्थ खाण्याची शक्यता वाढते. झोप पूर्ण न झाल्यामुळे भूक वाढवणारे हार्मोन्स ॲक्टिव्ह होतात आणि जास्त खाण्याची इच्छा होते. दररोज किमान ७ तासांची शांत झोप घेतल्यास शरीराच्या चयापचय क्रियेत आणि वजनात मोठा सकारात्मक बदल दिसून येतो. पुरेशी झोप घेतल्यामुळे मेंदूला आराम मिळतो आणि दुसऱ्या दिवशी व्यायामासाठी किंवा आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी उत्साह टिकून राहतो.
८. पुन्हा सुरुवात करण्याची वाट पाहणे सोडून देणे :-
अनेकदा एखादा तेलकट किंवा गोड पदार्थ खाल्ले की, आपल्याला वाटते की आता आपले डाएट पूर्णपणे बिघडले आहे. असा विचार करून आपण पूर्ण आठवडा चुकीचा आहार घेतो आणि 'आता पुढच्या सोमवारपासून नव्याने सुरुवात करू' अशी वाट पाहतो. एकदा चीट मील खाल्ल्याने संपूर्ण आठवड्याचे डाएट खराब होत नाही. अशा वेळी निराश न होता, पुढच्याच जेवणापासून पुन्हा पौष्टिक आहार घेण्यास सुरुवात करणे आवश्यक आहे.