उन्हाळ्यात केसांना कोणतं तेल लावणं योग्य? केस चिकट, चिपचिपीत होऊ नये म्हणून खास उपाय
Updated:May 4, 2026 16:03 IST2026-05-04T15:56:44+5:302026-05-04T16:03:39+5:30

उन्हाळ्याच्या दिवसांत खूप घाम येतो. त्यामुळे मग केस खूप लवकर तेलकट, चिकट होतात. केस धुतले तरीही अगदी एका दिवसांतच ते चिपचिपीत होऊन जातात. हे टाळायचं असेल तर...
उन्हाळ्यात केसांना योग्य तेल लावलं गेलं पाहिजे. या दिवसांत केसांना कोणतं तेल लावावं आणि कोणतं टाळावं ते एकदा पाहुया..(which hair oil is best for summer?)
उन्हाळ्याच्या दिवसांत आधीच केसांना खूप घाम येत असल्याने ते चिकट, तेलकट होतात. त्यामुळे या दिवसांत खूप चिकट आणि जड असणारं कॅस्टर ऑईल केसांना लावणं टाळायला हवं.(which hair oil we should use to avoid sticky and oily hair?)
तुम्ही बदाम तेल किंवा खोबरेल तेल केसांना लावू शकता. पण कोणतंही तेल खूप जास्त प्रमाणात लावणं टाळा.
उन्हाळ्याच्या दिवसांत केसांना आवळ्याचं तेल लावणं जास्त योग्य. कारण या तेलामुळे केसांना, डोक्याच्या त्वचेला थोडा थंडावा मिळतो.
उन्हाळ्यात घामामुळे डोक्याला खूप खाज येते. कोंडाही होऊ शकतो. हे टाळायचं असेल तर उन्हाळ्यात केसांना नीम ऑईल लावावं असं म्हणतात. त्यात असणाऱ्या ॲण्टीबॅक्टेरियल, ॲण्टीफंगल गुणधर्मांमुळे डोक्याला खाज येत नाही.
उन्हाळ्यात जोजोबा इसेंशियल ऑईलही लावू शकता. ते हलकं असल्याने केसांना चिकटून राहात नाही. पण केसांमधलं मॉईश्चर मात्र व्यवस्थित टिकून राहाते.