आर. माधवनच्या फिटनेसचं साधं सोपं सिक्रेट; प्रोटीनसाठी खातो 'हा' घरगुती शाकाहारी पदार्थ

Updated:May 4, 2026 00:12 IST2026-05-03T21:14:32+5:302026-05-04T00:12:33+5:30

Madhavan Is Vegetarian His Source Of Protein Is Quite A Simple Dish That's Perfect To Beat Summer : आर. माधवन रात्री लवकर जेवण्यावर भर देतो. शक्यतो सुर्यास्ताच्यावेळी किंवा त्यानंतर लगेच तो जेवतो.

आर. माधवनच्या फिटनेसचं साधं सोपं सिक्रेट; प्रोटीनसाठी खातो 'हा' घरगुती शाकाहारी पदार्थ

लोकप्रिय अभिनेता आर. माधवन आपल्या दमदरा अभिनयासोबतच फिटनेससाठीही ओळखला जातो. वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतरही तो अत्यंत फिट दिसतो. नुकत्याच समोर आलेल्या एका माहितीनुसार माधवन हा पूर्णपणे शाकाहारी असून प्रोटीन्ससाठी खूपच साध्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करतो.

आर. माधवनच्या फिटनेसचं साधं सोपं सिक्रेट; प्रोटीनसाठी खातो 'हा' घरगुती शाकाहारी पदार्थ

माधवनच्या आहारात सर्वाधिक महत्व दही-भात या पदार्थाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देण्यासाठी प्रोटीन्सची कमतरता भरून काढण्यासाठी तो दही-भाताचा पसंती देतो. हा पदार्थ पचायलाही हलका असतो.

आर. माधवनच्या फिटनेसचं साधं सोपं सिक्रेट; प्रोटीनसाठी खातो 'हा' घरगुती शाकाहारी पदार्थ

शाकाहारी लोकांसाठी ही हे प्रथिनांचा चांगला पर्याय आहे. दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात जे पोटाच्या आरोग्यासाठी आणि पचन सुलभ करण्यासाठी मदत करतात.

आर. माधवनच्या फिटनेसचं साधं सोपं सिक्रेट; प्रोटीनसाठी खातो 'हा' घरगुती शाकाहारी पदार्थ

दही भात शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. ज्यामुळे उन्हाळ्याचा त्रास कमी होतो.तांदळातील कार्बोहायड्रेट्समुळे शरीराला त्वरीत ऊर्जा मिळते.

आर. माधवनच्या फिटनेसचं साधं सोपं सिक्रेट; प्रोटीनसाठी खातो 'हा' घरगुती शाकाहारी पदार्थ

दह्यामध्ये असणारे लॅक्टोबॅसिलस हे जिवाणी आतड्यांचे आरोग्य सुधारतात. माधवन शाकाहारी असल्यानं त्याच्या स्नायूंच्या मजबूतीसाठी लागणारे अमिनो एसिड्स त्याला दह्यातून मिळतात.

आर. माधवनच्या फिटनेसचं साधं सोपं सिक्रेट; प्रोटीनसाठी खातो 'हा' घरगुती शाकाहारी पदार्थ

आर. माधवन रात्री लवकर जेवण्यावर भर देतो. शक्यतो सुर्यास्ताच्यावेळी किंवा त्यानंतर लगेच तो जेवतो.

आर. माधवनच्या फिटनेसचं साधं सोपं सिक्रेट; प्रोटीनसाठी खातो 'हा' घरगुती शाकाहारी पदार्थ

त्याने त्याच्या आहारातून साखर आणि मैद्याचे पदार्थ पूर्णपणे वगळले आहेत. तो दिवसभर भरपूर पाणी पितो. ज्यामुळे त्याची त्वचा तजेलदार राहते.

आर. माधवनच्या फिटनेसचं साधं सोपं सिक्रेट; प्रोटीनसाठी खातो 'हा' घरगुती शाकाहारी पदार्थ

थोडक्यात सांगायचे तर आर. माधवन हे सिद्ध करतो की शरीर फिट ठेवण्यासाठी महागड्या सप्लिमेंट्सची गरज नसते. आपल्या रोजच्या घरातील दही-भात यांसारखे साधे पदार्थ योग्य रितीनं खाल्ल्यास बदल घडवू शकतात.