वय ३० पण दिसता मात्र पन्नाशीच्या काकू? ५ गोष्टी आजपासून करा, तरच टिकेल तारुण्य- राहाल फिट म्हातारपणीही..

Updated:May 5, 2026 13:11 IST2026-05-05T13:02:45+5:302026-05-05T13:11:07+5:30

वय ३० पण दिसता मात्र पन्नाशीच्या काकू? ५ गोष्टी आजपासून करा, तरच टिकेल तारुण्य- राहाल फिट म्हातारपणीही..

काही साध्या सोप्या सवयी तरुण वयातच स्वत:ला लावून घेतल्या तर त्याचा निरोगी दिर्घायुष्य मिळण्यासाठी नक्कीच फायदा होऊ शकतो.(5 simple habits for healthy long life)

वय ३० पण दिसता मात्र पन्नाशीच्या काकू? ५ गोष्टी आजपासून करा, तरच टिकेल तारुण्य- राहाल फिट म्हातारपणीही..

त्या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहुया.. सगळ्यात पाहिली गोष्ट म्हणजे आहारातली साखर शक्य तेवढी कमी करा. बिनसाखरेचा चहा, कॉफी घेता आली तर चांगलंच. गोड पदार्थ मर्यादित खा. कारण यामुळे एजिंग लवकर होत नाही असं एक्सपर्ट सांगतात.(5 golden rules for healthy life)

वय ३० पण दिसता मात्र पन्नाशीच्या काकू? ५ गोष्टी आजपासून करा, तरच टिकेल तारुण्य- राहाल फिट म्हातारपणीही..

ताजी फळं खाण्यावर भर द्या. फळांमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी असतात जे तुम्हाला तरुण आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे रोजच्या रोज एक तरी हंगामी फळ तुम्ही खायलाच हवं.

वय ३० पण दिसता मात्र पन्नाशीच्या काकू? ५ गोष्टी आजपासून करा, तरच टिकेल तारुण्य- राहाल फिट म्हातारपणीही..

फिटनेस टिकवून ठेवायचा असेल तर प्रोटीनयुक्त आहाराची खूप गरज आहे. त्यामुळे डाळी, कडधान्ये, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ आहारातून पुरेशा प्रमाणात मिळतील याची काळजी घ्या.

वय ३० पण दिसता मात्र पन्नाशीच्या काकू? ५ गोष्टी आजपासून करा, तरच टिकेल तारुण्य- राहाल फिट म्हातारपणीही..

काही ना काही व्यायाम होणं खूप गरजेचं आहे. एकाजागी बसून राहण्याची सवय सोडा. दररोज किमान १५ ते २० मिनिटे तरी व्यायाम करा. मग तुम्ही वॉकिंगला गेलात किंवा घरीच सुर्यनमस्कार केले तरी चालेल.

वय ३० पण दिसता मात्र पन्नाशीच्या काकू? ५ गोष्टी आजपासून करा, तरच टिकेल तारुण्य- राहाल फिट म्हातारपणीही..

कुठलाच लहानसा वाटणारा आजार अंगावर काढू नका. कारण कोणता आजार मोठं रूप घेतो हे सांगता येत नाही. त्यानंतर त्या आजारातून बरं होताना शरीराची बरीच झीज होत जाते. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि निरोगी राहा.