बंगाली महिलांच्या घनदाट केसांचे सिक्रेट, महिन्याभरात केस वेगाने वाढवणाऱ्या ५ गोष्टी, केस होतील गुडघ्यापर्यंत लांब- दाट
Updated:May 5, 2026 20:00 IST2026-05-05T20:00:00+5:302026-05-05T20:00:02+5:30
Home remedies for knee length hair: Natural ways to increase hair density: बंगाली स्त्रिया केसांना नेमके कोणते ५ पदार्थ लावतात आणि काय खातात पाहूया.

भारतीय संस्कृतीत केसांचे सौंदर्य हे स्त्रिच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग मानले जाते आणि त्यातही बंगाली स्त्रियांच्या घनदाट, काळ्याभोर आणि लांबसडक केसांची चर्चा सगळीकडे असते. सध्याच्या काळात आपण केसांसाठी केमिकल असलेल्या महागड्या उत्पादनांवर आणि पार्लर ट्रीटमेंटवर हजारो रुपये खर्च करतो, पण बंगाली स्त्रिया आजही त्यांच्या स्वयंपाकघरातील आणि निसर्गातील घटकांवर विश्वास ठेवतात. (Home remedies for knee length hair)
आपलेही केस नैसर्गिकरीत्या मजबूत, चमकदार आणि गुडघ्यापर्यंत लांब हवे असतील, तर बंगाली महिलांचे पारंपरिक उपाय आपल्यासाठी वरदान ठरू शकतात. बंगाली स्त्रिया केसांना नेमके कोणते ५ पदार्थ लावतात आणि काय खातात पाहूया. (Natural ways to increase hair density)
बंगाली महिला आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी नियमितपणे तेलाने मालिश करतात. नारळाचे तेल कोमट गरम करुन ते टाळूला लावतात. आठवड्यातून दोन ते तीन वेळा नारळाचे तेल केसांना लावतात. ज्यामुळे केसांना पोषण मिळते, ब्लड सर्क्युलेशन पण व्यवस्थित होते.
बंगाली महिला रासायनिक शाम्पूऐवजी शिकाकाई, आवळा आणि रिठासारखे नैसर्गिक घटक केसांना लावतात. यामुळे केस स्वच्छ होत नाहीत तर मजबूतही होतात. यामुळे केसातील नैसर्गिक ओलवा टिकून राहतो.
अनेकदा आपण काय खातो यामुळे देखील केसांवर चांगला वाईट परिणाम होतो. त्यासाठी बंगाली महिला आपल्याला आहारात मासे, दुग्धजन्य पदार्थ खातात. यात ओमेगा- ३ फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते. हे आपल्या केसांचा मुळांना आतून मजबूत करते. हिरव्या भाज्या, कडधान्ये आणि भात यांचा संतुलित आहार देखील ते खातात.
दही, मेथी, कोरफड आणि केळी यांसारख्या घरगुती घटकांपासून हेअर मास्क केसांना लावतात. हे मास्क केसांना खोलवर कंडिशनिंग करतात, ज्यामुळे केस मऊ, मुलायम आणि चमकदार बनवतात.
केसांमधील कोंडा घालवण्यासाठी आणि टाळूला थंडावा देण्यासाठी दह्यात कढीपत्त्याची पेस्ट मिसळून लावायला हवी. यामुळे केसांचे आरोग्य उत्तम राहते.