आजच्या धावपळीच्या आणि सतत बदलत्या लाईफस्टाईल आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे वजन वाढणे ही एक कॉमन समस्या बनली आहे. अनेकजण वजन कमी करण्यासाठी डाएटची मदत घेतात, पण जोपर्यंत शरीरातील कॅलरीज जाळण्यासाठी योग्य एक्सरसाइज करत नाही, तोपर्यंत हवे तसे परिणाम दिसून येत नाही. वेटलॉस करण्यासोबतच फिट आणि ॲक्टिव्ह राहायचं असेल, तर फक्त डाएट पुरेसं नसतं - योग्य एक्सरसाइजही तितकीच महत्त्वाची असते. विशेषतः अशा एक्सरसाइज ज्या पटकन फॅट बर्न करतात आणि शरीराची ताकद व स्टॅमिना वाढवतात, त्या अधिक फायदेशीर ठरतात(best exercises to burn calories quickly at home).
नियमितपणे योग्य प्रकारचे वर्कआऊट केल्यास वजन लवकर कमी होण्यासोबतच शरीर टोन्ड आणि फिट दिसू लागतं. जर तुम्हाला जिममध्ये तासंतास न घालवता घरीच किंवा कमी वेळात 'फॅट बर्निंग' करायचे (fat burning exercises for weight loss) असेल, तर काही ठराविक व्यायाम अत्यंत फायदेशीर ठरतात. हे एक्सरसाइज केवळ तुमची चरबी जाळत नाहीत, तर तुमची चयापचय शक्ती वाढवून तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवतात. पटकन फॅट बर्न करण्यासाठी कोणत्या (best exercises to burn calories fast) एक्सरसाइज सर्वात उपयुक्त आहेत, ते पाहूयात...
पटकन फॅट बर्न करण्यासाठी कोणत्या एक्सरसाइज कराव्यात ?
१. माऊंटेन क्लाइंबर्स (Mountain Climbers) :- पोटाची चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम अत्यंत उत्कृष्ट आहे. हा व्यायाम म्हणजे कार्डिओ (Cardio) आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग (Strength training) यांचे एक उत्तम मिश्रण आहे. हा व्यायाम केल्याने तुम्ही एका मिनिटात साधारणपणे १० ते १२ कॅलरीज बर्न करू शकता. जमिनीवर दोन्ही हात टेकवून 'पुश-अप' (Push-up) करण्याच्या स्थितीत या. तुमचे हात खांद्यांच्या सरळ रेषेत असावेत आणि शरीराचा भार तळहातांवर असावा. आता तुमचा उजवा गुडघा दुमडून छातीपर्यंत जवळ आणा आणि पुन्हा मागे न्या, लगेच डावा गुडघा छातीपर्यंत आणा आणि मागे न्या. ही क्रिया एखाद्या डोंगरावर चढत असल्याप्रमाणे वेगाने करा. हा व्यायाम करताना तुमचे शरीर एका सरळ रेषेत असावे आणि पोटाच्या स्नायूंवर ताण येईल याची काळजी घ्या.
२. जंपिंग जॅक (Jumping Jacks) :- हा कार्डिओ एक्सरसाइज तुमच्या शरीरातील मेटाबॉलिझम त्वरित वाढवण्यास मदत करतो. हा व्यायाम करण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणाची गरज नाही, त्यामुळे तुम्ही तो कुठेही सहजपणे करू शकता. हा व्यायाम केल्यास दर मिनिटाला साधारण ८ ते १२ कॅलरीज बर्न होतात. ताठ उभे राहा, त्यानंतर उडी मारताना पाय पसरवा आणि हात डोक्याच्या वर न्या. पुन्हा उडी मारून मूळ स्थितीत परत या. ही क्रिया वेगाने केल्यास अधिक फायदा होतो.
३. स्विमिंग (Swimming) :- सांधेदुखीपासून बचाव आणि वजन कमी करण्यासाठी स्विमिंग हा सर्वोत्तम एक्सरसाइज आहे. पाण्याचा प्रतिरोध शरीराकडून जास्त ताकदीची मागणी करतो. रोज स्विमिंग करून तुम्ही एका मिनिटात १० ते १३ कॅलरीज जाळू शकता.
४. रनिंग (Running) :- शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्याचा रनिंग हा सर्वात जुना आणि असरदार असा सोपा उपाय आहे. एका ठराविक गतीने धावल्यामुळे शरीरातील फॅट वेगाने कमी होण्यास मदत होते. दररोज रनिंग करुन तुम्ही एका मिनिटात साधारण ११ ते १६ कॅलरीज जाळू शकता.
५. हाय नीज (High Knees) :- हाय नीज हा एक्सरसाइज 'कोअर' (Core) आणि पायांच्या स्नायूंवर काम करतो. हा एक्सरसाइज वेगाने केल्यामुळे शरीरातील मेटाबॉलिझमचा वेग वाढतो. हा एक इंटेन्स वर्कआऊट असून यामुळे प्रति मिनिट सुमारे १२ ते १५ कॅलरीज बर्न होतात. सर्वात आधी जमिनीवर ताठ उभे राहा आणि तुमचे दोन्ही पाय खांद्यांच्या रेषेत समांतर ठेवा. आता एकाच जागी धावल्याप्रमाणे तुमचा उजवा गुडघा वर उचलून छातीपर्यंत आणण्याचा प्रयत्न करा. उजवा पाय खाली नेताना लगेच डावा गुडघा वर उचला. ही प्रक्रिया वेगाने आणि लयबद्ध पद्धतीने करा. पाय वर उचलताना तुमचे हात देखील धावण्याच्या स्थितीत हालचाल करत असावेत, ज्यामुळे शरीराचा समतोल राखला जाईल. हा व्यायाम करताना तुमचे पोट आत ओढून ठेवा (Core engagement), ज्यामुळे पोटाच्या स्नायूंवर चांगला ताण येईल.
६. सायकलिंग (Cycling) :- वजन कमी करण्यासाठी सायकल चालवणे हा एक उत्तम पर्याय आहे. दररोज किमान ३० मिनिटे सायकल चालवून तुम्ही स्वतःला फिट ठेवू शकता. वेगाने सायकल चालवल्यास एका मिनिटात साधारण १२ ते १६ कॅलरीज जळतात.
७. बर्पीज (Burpees) :- बर्पीज हा एक सर्वोत्तम 'फुल बॉडी वर्कआऊट' मानला जातो. यामुळे स्नायू टोन्ड होतात आणि हृदयाचे ठोके वाढल्यामुळे कॅलरीज वेगाने बर्न होतात. या व्यायामामुळे प्रति मिनिट सुमारे १० ते १५ कॅलरीज बर्न होतात.
